विठ्ठल साखर कारखाना इथेनॉलनिर्मितीस प्राधान्य देणार

विठ्ठल साखर कारखाना इथेनॉलनिर्मितीस प्राधान्य देणार
विठ्ठल साखर कारखाना इथेनॉलनिर्मितीस प्राधान्य देणार

पंढरपूर, जि. सोलापूर : केंद्र शासनाने पेट्रोल व डिझेलचे भाव स्थिर राहण्यासाठी इथेनॉलनिर्मितीस प्राधान्य दिलेले आहे. आगामी काळात इथेनॉल प्रकल्प सुरू करण्याचा मानस आहे, असे श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष आमदार भारत भालके यांनी सांगितले.

कारखान्याच्या कार्यस्थळावर गुरुवारी (ता. २७) झालेल्या ४३ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत ते बोलत होते. भालके म्हणाले, ‘‘विठ्ठल कारखान्याकडून २०१७-१८ च्या गळितास आलेल्या उसाला प्रती मेट्रिक टन २ हजार २५० रुपयांप्रमाणे म्हणजे ‘एफआरपी''पेक्षा ४७६ रुपये जादा ऊसबिल देण्यात आले आहे, शेतकऱ्यांना कधीच आम्ही अडचणीत आणले नाही. त्यांच्या फायद्यासाठीच आम्ही सगळे करतो आहोत.``

‘‘कारखान्याच्या सहवीजनिर्मिती प्रकल्पाच्या माध्यमातून विक्री केलेल्या विजेपासून २३ कोटी ५२ लाख रुपये मिळाले. येत्या हंगामात वीज उत्पादन वाढवून तिच्या विक्रीतून ४० कोटी रुपये मिळवण्याचे उद्दिष्ट आहे. आसवनी प्रकल्पातून ८८ लाख सात हजार ३४४ लिटर आरएस आणि इएनएचे उत्पादन झाले. येत्या हंगामात ते वाढवून एक कोटी लिटरवर नेण्यात येईल. त्यातून ३५ ते ४० कोटी रुपये उत्पन्न मिळवण्याचा प्रयत्न आहे. सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांची शेवटची रक्कम दिवाळीपूर्वी देण्यात येणार आहे, असेही भालके यांनी सांगितले.

कारखान्याचे प्रभारी कार्यकारी संचालक बी. सी. कर्पे यांनी विषय पत्रिकेवरील विषयांचे वाचन केले. सर्व विषयांना सभासदांनी मंजुरी दिली. कामगार कल्याण अधिकारी बी. एल. रोडगे यांनी सूत्रसंचालन केले. संचालक दशरथ खळगे यांनी आभार मानले. या प्रसंगी उपाध्यक्ष लक्ष्मण आबा पवार, संचालक मोहन कोळेकर, ॲड. दिनकर पाटील, गोकूळ जाधव, सूर्यकांत बागल, भगीरथ भालके, विलास देठे, नेताजी सावंत, उत्तम नाईकनवरे, संतोषकुमार गायकवाड, नारायण जाधव, बाळासाहेब गडदे, बाळू लोंढे, महादेव देठे, राजाराम भिंगारे, तज्ज्ञ संचालक शांतिनाथ बागल, धनाजी घाडगे, पंढरपूर तालुका काॅँग्रेसचे अध्यक्ष प्रकाश पाटील, माजी नगराध्यक्ष सुभाष भोसले, जिल्हा काॅँग्रेसचे उपाध्यक्ष देवानंद पाटील उपस्थित होते.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com