Agriculture news in marathi Vitthalrao Shinde Sugar from Madha Factory election unopposed | Agrowon

विठ्ठलराव शिंदे साखर कारखान्याची निवडणूक बिनविरोध 

टीम अॅग्रोवन
मंगळवार, 23 फेब्रुवारी 2021

पिंपळनेर (ता. माढा) येथील विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखान्याच्या नवीन २१ संचालकांची बिनविरोध निवड झाल्याची घोषणा निवडणूक निर्णय अधिकारी कुंदन भोळे यांनी सर्वसाधारण सभेत केली. 

सोलापूर : पिंपळनेर (ता. माढा) येथील विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखान्याच्या नवीन २१ संचालकांची बिनविरोध निवड झाल्याची घोषणा जिल्हा उपनिबंधक तथा निवडणूक निर्णय अधिकारी कुंदन भोळे यांनी सर्वसाधारण सभेत केली. 

कारखानास्थ‌ळी नूतन संचालक मंडळाची सर्वसाधारण सभा नुकतीच झाली. सभेत कारखान्याचे चेअरमन तथा नूतन संचालक आमदार बबनराव शिंदे यांनी कारखान्याच्या कामगिरीचा आढावा घेतला.

शिंदे म्हणाले, ‘‘कारखाना अडीच हजार टनांवरून ११ हजार टन क्षमतेपर्यंत कारखान्याने विस्तार केला आहे. कारखान्याने गणेश पाणीपुरवठा योजना व हरित क्रांती पाणीपुरवठा योजना उत्कृष्ट पद्धतीने चालवून शेतकऱ्यांना आर्थिक प्रगतीत महत्त्वाची भूमिका पार पाडली. शून्य प्रदूषण करण्याचा निर्णय कारखान्याने घेतला आहे.

पुढच्या काळात कारखाना परिसरात कुठलेही प्रदूषण होणार नाही. गोरगरिबांसाठी सामुदायिक विवाह सोहळा, नेत्ररोग निदान व नेत्र शस्त्रक्रिया शिबिर, आरोग्य शिबिर, काशी यात्रा हे मोफत उपक्रम राबवले. वीस वर्षांत सर्वांच्या सहकार्याने चौथ्यांदा बिनविरोध निवडीची पंरपरा राखली, या बद्दल सर्वांचे आभार’’ प्रभारी कार्यकारी संचालक सुहास यादव यांनी आभार मानले. 

बिनविरोध निवडलेले संचालक 
आमदार बबनराव शिंदे, रमेश येवले-पाटील, वामनराव उबाळे, सुरेश बागल, पोपट गायकवाड, अमोल चव्हाण, निळकंठ पाटील, शिवाजी डोके, लक्ष्मण खुपसे, विष्णू हुंबे, प्रभाकर कुटे, भाऊराव तरंगे, रणजितसिंह शिंदे, लाला मोरे, वेताळ जाधव, सचिन देशमुख, विक्रमसिंह शिंदे, पांडुरंग घाडगे, पोपट चव्हाण, सिंधूताई नागटिळक, संदीप पाटील.


इतर ताज्या घडामोडी
शहरातील आठवडे बाजारांवर महापालिका...पुणे ः शेतकऱ्यांच्या शेतमालाला मध्यस्थाशिवाय थेट...
अखाद्य वस्तूंमुळे जनावरांना होणारे अपाय जनावरांना होणारे सर्वसामान्य संसर्गजन्य आजार हे...
परभणी जिल्ह्यात कृषी, पशुसंवर्धनासाठी...परभणी ः ‘‘परभणी जिल्हा परिषदेच्या यंदाच्या...
काबुली हरभऱ्याचा दर आठ हजार रुपयांवरजळगाव  ः  खानदेशात काबुली हरभऱ्याची आवक...
‘रोटेशनप्रमाणे धरणाच्या पाण्याचे वाटप...सातारा :  ‘‘या वर्षी चांगला पाऊस पडला....
सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर ...अकोला : इतर मागासप्रवर्गासाठी (ओबीसी) असलेल्या २७...
‘भरड धान्य खरेदी केंद्रांसाठी तातडीने...जळगाव  ः जिल्ह्यात रब्बी हंगामात फक्त मका...
तापमानात वाढ होण्यास सुरुवातमार्च महिन्याच्या सुरुवातीपासूनच महाराष्ट्रावरील...
तेलकट डाग रोग व्यवस्थापनाच्या सहा...तेलकट डाग रोग (बॅक्टेरियल ब्लाइट किंवा बीबीडी)...
‘जलयुक्त’च्या कामाची धारवाडी, चिचोंडीत...नगर : जलयुक्त शिवार अभियानातील तक्रारी असलेल्या...
अकोला जिल्हा परिषदेत ओबीसी सदस्यांवर...अकोला : इतर मागास प्रवर्गासाठी (ओबीसी) असलेल्या...
उत्तर सोलापुरात २३ गावांचे होणार...सोलापूर : ‘‘गावठाणातील जमिनींचे ड्रोनद्वारे...
सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योगांना...औरंगाबाद : ‘‘असंघटित क्षेत्रातील सूक्ष्म अन्न...
खानदेशात जलसाठा मुबलक जळगाव : खानदेशात विविध प्रमुख सिंचन...
हरभरा दर सुधारल्याने नांदेडचे शेतकरी...नांदेड : ‘‘केंद्र शासनाच्या किमान हमी दरानुसार...
परभणी जिल्ह्यात तुती लागवडीसाठी ५८५...परभणी ः ‘‘महारेशीम अभियानांतर्गत रेशीम शेती...
साताऱ्यात ४३१ कुटुंबांच्या घराचे स्वप्न...कऱ्हाड : ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी १००...
सामूहिक गट शेतीतील ऊस तोडणीस सुरुवात नाशिक : सटाणा तालुक्यातील शेवरे येथील द्वारकाधीस...
परभणी जिल्ह्यातील हरभऱ्याचा पीकविमा...परभणी ः लिमला (ता. पूर्णा) तसेच परिसरात यंदा...
ओबीसी आरक्षणाच्या संरक्षणासाठी शासनाची...मुंबई : राज्यातील धुळे, नंदुरबार, नागपूर, अकोला,...