वर विठ्ठल, वधू रुक्मिणी..! देवविवाह सोहळा थाटात संपन्न !!!

वर विठ्ठल, वधू रुक्मिणी..! देवविवाह सोहळा थाटात संपन्न !!!
वर विठ्ठल, वधू रुक्मिणी..! देवविवाह सोहळा थाटात संपन्न !!!

सोलापूर  ः पंढरपूरच्या श्री विठ्ठल- रुक्मिणी मंदिरामध्ये रविवारी (ता. १०) वसंत पंचमीच्या पार्श्वभूमीवर श्री विठ्ठल- रुक्मिणीचा विवाह सोहळा मोठ्या भक्तिभावाने आणि जल्लोषात पार पडला. देवाच्या या विवाह सोहळ्याने वेगळाच उत्साह पंढरीत पाहायला मिळाला. श्रीकृष्ण आणि रुक्मिणी यांचा वसंत पंचमीला विवाह झाल्याची आख्यायिका सांगितली जाते. श्री विठ्ठल हा श्रीकृष्णाचा अवतार मानला जातो. त्यानुसार दरवर्षी वसंतपंचमीला हा उत्सव साजरा केला जातो. त्यामुळे दरवर्षी मंदिरामध्ये श्री विठ्ठल- रखुमाईचा विवाह सोहळा मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. हजारो भाविकांच्या उपस्थितीत दुपारी १२ वाजता हा अक्षता सोहळा पार पडला. लग्न बोहल्यावर देवाच्या प्रातिनिधिक मूर्ती उभ्या केल्या जातात व मध्ये अांतरपाट धरून मंगलाष्टिका म्हटल्या जातात. या विवाह सोहळ्याच्या निमित्ताने संपूर्ण मंदिर आकर्षक फुलांनी सजविण्यात आले होते. विवाहासाठी श्री रुक्मिणीमातेकडून देवाला पांढरा पोशाख आहेर म्हणून पाठविला जातो, तर श्री रुक्मिणीमातेला देवाकडून पैठणी पाठविली जाते. या सोहळ्यानंतर मंदिर समितीच्या वतीने वऱ्हाडींना दिवसभर जेवण ठेवलेले असते. लग्नाचे औचित्य साधून सायंकाळी पाच वाजता शहरातून मिरवणूक काढण्यात आली. या विवाह सोहळ्यातील विधी आणि भाविकांची झालेली गर्दी यामुळे वातावरण एकदम भारून गेले. एक वेगळाच उत्साह या वेळी अनुभवायला मिळाला.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com