agriculture news in Marathi, vivah festival of vithhal rukmini, Maharashtra | Agrowon

वर विठ्ठल, वधू रुक्मिणी..! देवविवाह सोहळा थाटात संपन्न !!!
टीम अॅग्रोवन
रविवार, 10 फेब्रुवारी 2019

सोलापूर  ः पंढरपूरच्या श्री विठ्ठल- रुक्मिणी मंदिरामध्ये रविवारी (ता. १०) वसंत पंचमीच्या पार्श्वभूमीवर श्री विठ्ठल- रुक्मिणीचा विवाह सोहळा मोठ्या भक्तिभावाने आणि जल्लोषात पार पडला. देवाच्या या विवाह सोहळ्याने वेगळाच उत्साह पंढरीत पाहायला मिळाला.

सोलापूर  ः पंढरपूरच्या श्री विठ्ठल- रुक्मिणी मंदिरामध्ये रविवारी (ता. १०) वसंत पंचमीच्या पार्श्वभूमीवर श्री विठ्ठल- रुक्मिणीचा विवाह सोहळा मोठ्या भक्तिभावाने आणि जल्लोषात पार पडला. देवाच्या या विवाह सोहळ्याने वेगळाच उत्साह पंढरीत पाहायला मिळाला.

श्रीकृष्ण आणि रुक्मिणी यांचा वसंत पंचमीला विवाह झाल्याची आख्यायिका सांगितली जाते. श्री विठ्ठल हा श्रीकृष्णाचा अवतार मानला जातो. त्यानुसार दरवर्षी वसंतपंचमीला हा उत्सव साजरा केला जातो. त्यामुळे दरवर्षी मंदिरामध्ये श्री विठ्ठल- रखुमाईचा विवाह सोहळा मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. हजारो भाविकांच्या उपस्थितीत दुपारी १२ वाजता हा अक्षता सोहळा पार पडला. लग्न बोहल्यावर देवाच्या प्रातिनिधिक मूर्ती उभ्या केल्या जातात व मध्ये अांतरपाट धरून मंगलाष्टिका म्हटल्या जातात.

या विवाह सोहळ्याच्या निमित्ताने संपूर्ण मंदिर आकर्षक फुलांनी सजविण्यात आले होते. विवाहासाठी श्री रुक्मिणीमातेकडून देवाला पांढरा पोशाख आहेर म्हणून पाठविला जातो, तर श्री रुक्मिणीमातेला देवाकडून पैठणी पाठविली जाते. या सोहळ्यानंतर मंदिर समितीच्या वतीने वऱ्हाडींना दिवसभर जेवण ठेवलेले असते. लग्नाचे औचित्य साधून सायंकाळी पाच वाजता शहरातून मिरवणूक काढण्यात आली. या विवाह सोहळ्यातील विधी आणि भाविकांची झालेली गर्दी यामुळे वातावरण एकदम भारून गेले. एक वेगळाच उत्साह या वेळी अनुभवायला मिळाला.

इतर बातम्या
...अन् आमचं स्वप्नच पुरानं खरडून नेलं पटवर्धन कुरोली, पंढरपूर, जि. सोलापूर : आधीच दोन...
कृषी ‘एमएस्सी’ प्रवेशात भेदभाव नको:...पुणे  : गुणवत्ता यादीत असूनही पदव्युत्तर (...
जायकवाडी कालव्याच्या पाण्यामुळे पीक...परभणी : जिल्ह्यात गेल्या आठवड्यापासून...
एमएआयडीसी’च्या सक्षमीकरणासाठी...मुंबई : महाराष्ट्र कृषी उद्योग विकास...
उस्मानाबाद जिल्ह्यात राष्ट्रीयीकृत...उस्मानाबाद  ः खरीप हंगामासाठी पीककर्ज वाटपात...
गंगापूर धरण क्षेत्रात पावसाचे पुनरागमन...नाशिक  : गंगापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात...
जमीन मोजणीच्या नोटिसा झाल्या डिजिटल पुणे : राज्यातील तलाठी कार्यालयांकडील जमीन...
कृषी सहायकांच्या अडचणी न सोडविल्यास २०...अकोला ः अमरावती विभागातील कृषी सहायक ते कृषी...
हवामान बदलाचा शेती, शेतकऱ्यांच्या ...नांदेड  ः हवामान बदलामुळे येत असलेल्या...
अमरावती कृषी विभागातील ३२ टक्के पदे...अमरावती  :  रिक्‍त पदांमुळे...
शेतकरी राजकारण अन् जाती-धर्मात अडकला :...नाशिक ः शेतकऱ्यांचे प्रश्न कमी होण्यापेक्षा ते...
शिरसाईचे पाणी लाभार्थ्यांसाठी मृगजळचउंडवडी, जि. पुणे : पावसाळा सुरु होवून अडीच महिने...
सांगलीच्या दुष्काळी पट्ट्यात...सांगली ः जिल्ह्यातील आटपाडी, कवठेमहांकाळ आणि जत...
महापुराच्या पाण्याने कृष्णा-कोयनेचा...कऱ्हाड, जि. सातारा : कृष्णा-कोयना नद्यांना...
पन्नास हजारांवर पशुधन डोळ्यांदेखत गेले...कोल्हापूर/सांगली : शेतकऱ्यांच्या ...
सांगली : पूरबाधीत सहकारी सोसायट्यांना ‘...सांगली ः ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा असलेल्या...
राज्यात हलक्या पावसाचा अंदाजपुणे : पावसाने काहीशी उघडीप दिल्याने राज्यात...
कृत्रिम पावसाच्या नुसत्याच अवकाशात...सोलापूर : राज्यातील दुष्काळी परिस्थितीचा सामना...
विम्याचे दावे निकाली काढा; आयआरडीएआयचे...नवी दिल्ली : पुराचा फटका बसलेल्या कर्नाटक,...
उत्तर भारतात मुसळधार पाऊस सुरूचसिमला/धर्मशाला : उत्तर भारतात विशेषतः हिमालयाच्या...