चार हजार शेतकऱ्यांना र्दृष्टीदोष दूर करणारे विवेक गोनपल्लीवार

Vivek Gonpalliwar, who re-views four thousand farmers
Vivek Gonpalliwar, who re-views four thousand farmers

गोंडपिपरी, जि. चंद्रपूर : व्यवसाय करताना बेरीज-वजाबाकीचे गणित मांडले जाते. पण, काही सामाजिक संवेदना जोपासणारे व्यवसायापलीकडे विचार करतात. पैशांपेक्षा ते माणसांना किंमत देतात. भंगाराम तळोधी येथील विवेक गोनपल्लीवार हे त्यापैकीच एक. आपल्या आईच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी त्यांनी सुरू केलेल्या विनामूल्य मोतिबिंदू डोळे तपासणी शिबिराच्या उपक्रमाची सामाजिक मोहीम निर्माण झाली अन्‌ बघता बघता चार हजार गरीब शेतकऱ्यांतील र्दृष्टीदोष दूर झाला आहे...

चंद्रपूर जिल्ह्याच्या सीमेवर असणाऱ्या गोंडपिपरी तालुक्यात कुठलाच उद्योग नसल्याने निवळ शेतीवरच तालुक्यातील ९० टक्के लोकांचे जीवनमान अवलंबून आहे. तालुक्याला लागून तेलंगणाची सीमा आहे. याच परिसरातील भंगाराम तळोधी येथे गोनपल्लीवार यांचे किराणा दुकान आहे. सोबतच त्यांची राईस मिलदेखील आहे. या भागात शेतकऱ्यांना मदत करणारे अशी त्यांची वेगळी ओळख निर्माण झाली आहे. 

गरीब वयोवृद्ध शेतकरी बांधवांच्या वेदना जाणून त्यांनी सुमारे बारा वर्षांपूर्वी तळोधीत विनामूल्य मोतिबिंदू डोळे तपासणी शिबिराचे आयाेजन केले. लायन्स क्लब व प्रशासनातील तज्ज्ञ वैद्यकीय अधिकाऱ्यांचे सहकार्य घेतले. संपूर्ण आर्थिक भार मात्र विवेक गोनपल्लीवार यांनी उचलला.

पहिल्यांदाच होत असलेल्या या उपक्रमाला मोठा प्रतिसाद मिळाला. समाजसेवेचे हे प्रभावी माध्यम असल्याचे त्यांना समजले. या उपक्रमाला आतापर्यंत अकरा वर्ष पूर्ण झाली आहेत. आतापर्यंत त्यांनी स्वतः आर्थिक सहयोग करून परिसरातील साधारणतः चार हजार गरीब शेतकऱ्यांच्या डोळ्यांचे आपरेशन करून दिलेले आहे. 

सव्वादोन एकर जागा दान भंगाराम तळोधी परिसरात २५ लहान लहान गावे येतात. या गावात आरोग्यसेवा नाही. त्यामुळे मोठीच समस्या भेडसावत होती. अनेकदा उपचाराअभावी रुग्णांचे मृत्यू झाले. अशा स्थितीत विवेक गोनपल्लीवार यांनी प्राथमिक आरोग्य केंद्राची मागणी रेटून धरली. मागणी मान्य झाली, पण जागेचा प्रश्न आला तेव्हा त्यांनी प्रमुख मार्गावर आपल्या स्वतःच्या मालकीची जागा प्रशासनाला दान दिली. ही जागा आजघडीला कोट्यवधी रुपयांची आहे.

माझे वडील दरवर्षी न चुकता मोतीबिंदू तपासणी व आपरेशन शिबिर घेतात. यंदा या उपक्रमाची तपपूर्ती होत आहे. रविवारी (ता. २३) या वर्षीचा उपक्रम घेण्यात येणार आहे. - गौरव गोनपल्लीवार, भंगाराम तळोधी

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com