agriculture news in marathi Vodka made from milk is popular in the United States | Agrowon

दुधापासून व्होडका होतेय अमेरिकेत लोकप्रिय

टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 20 मार्च 2020

दूध हे तुलनेने फारच कमी काळासाठी टिकवून ठेवता येते. या तुलनेमध्ये त्यापासून तयार केलेली व्होडका दीर्घकाळ टिकविणे शक्य आहे. यामुळे दुग्ध उत्पादक शेतकऱ्यांसाठी एक नवे दालन उपलब्ध होणार आहे. अमेरिकेतील ओरेगॉन राज्यामधील एका शेतकऱ्याने काऊकोहोल हा व्होडकाचा एक ब्रॅंड तयार केला आहे.

दूध हे तुलनेने फारच कमी काळासाठी टिकवून ठेवता येते. या तुलनेमध्ये त्यापासून तयार केलेली व्होडका दीर्घकाळ टिकविणे शक्य आहे. यामुळे दुग्ध उत्पादक शेतकऱ्यांसाठी एक नवे दालन उपलब्ध होणार आहे. अमेरिकेतील ओरेगॉन राज्यामधील एका शेतकऱ्याने काऊकोहोल हा व्होडकाचा एक ब्रॅंड तयार केला आहे.

दुधाच्या प्रक्रियेमध्ये आंबवलेल्या पेयांना मोठा इतिहास आहे. अगदी १३ व्या शतकामध्ये चेंगीझखानाच्या लष्करामध्ये घोडीचे दूध आंबवून बनवलेले पेय पिले जाई. जॉर्जिया आणि रशिया या दरम्यानच्या कौकॅसस पर्वतीय प्रदेशातील भटके मेंढपाळ दूध धान्यांसोबत आंबवून त्यापासून केफीर नावाने पेय तयार करत. त्याचा वापर शेकडो वर्षापासून केला जातो.  

  • पारंपरिक व्होडका बटाटा किंवा मोहरीसारख्या धान्यापासून बनवली जाते. दुधाच्या निवळीपासून व्होडका तयार करण्याची प्रक्रिया ही एकापेक्षा अधिक पायऱ्यांची आहे. विशेषतः प्रत्येक पौंड चीज निर्मितीमागे सुमारे ९ पौंड निवळी तयार होते. ही वेगळी केलेली निवळी विशिष्ट अशा यिस्टच्या साह्याने आंबवली जाते. त्यानंतर त्याचे ऊर्ध्वपातन केले जाते. परिणामी तयार होणारे पेय पारंपरिक व्होडकापेक्षा अधिक मलईदार आणि गोड असते. दुधापासूनच्या व्होडकाची चव अत्यंत चांगली असून, त्यामुळे चीज उद्योगातून शिल्लक राहणाऱ्या व्हे किंवा निवळीची विल्हेवाट लावण्याच्या समस्येवर मात करता येऊ शकते. या कारणामुळेही ती अधिक पर्यावणपूरक ठरते.  
     
  • उत्तर अमेरिकेमध्ये दुधाच्या निवळी आंबवून त्याचे डिस्टिलेशन केल्यानंतर तयार केलेली व्होडका लोकप्रिय होत आहे. दुधापासून स्पिरीट तयार करण्यासाठी विविध दुग्ध उद्योगांनी परिसरातील आसवणी किंवा ऊर्ध्वपतन केंद्रासोबत (डिस्टिलरीज) करारही केले आहेत. ओरेगॉन राज्यातील टॉड कोच यांचे कुटुंब गेल्या वीस वर्षापासून २० गायींचे पालन करतात. या गायींपासून उपलब्ध होणाऱ्या दुधापासून विविध उत्पादन तयार करतात. त्याची डेअरी टीएमके क्रिमरी ही २०१७ पासून चीज उत्पादन करत आहे. यातून सध्या वाया जाणाऱ्या निवळीपासून व्होडका तयार केला आहे. या व्होडकाचा काऊकोहोल हा ब्रॅंड विकसित केला आहे.
     
  • निवळीपासून व्होडका तयार करण्याबाबतचे ओरेगॉन राज्य विद्यापीठामध्ये झालेले संशोधन एकदा कोच यांच्या वाचनात आले. त्यांनी विद्यापीठातील सहायक प्रा. पॉल ह्युजेस यांच्याशी संपर्क साधला. एकूण माहिती घेत उत्पादनाला सुरुवात केली.

तज्ज्ञांचे मत...

  • पॉल ह्युजेस यांनी निवळीपासून व्होडका तयार करण्याबाबत परिसरातील १० दुग्ध प्रक्रिया केंद्रांशी याबाबत चर्चा केली असून, पुढील वर्षामध्ये त्यांची ही उत्पादने बाजारात येऊ शकतील. या प्रकल्पाचे व्यावसायिक फायदे सांगताना ह्युजेस म्हणाले की, जर एखाद्या दुग्ध प्रक्रिया उद्योगातून ४० डॉलर प्रति पौंड इतक्या किमतीने चीज विकले जाते, अशा केंद्रातून कोणत्याही अतिरिक्त खर्चाशिवाय व्होडका हे उत्पादन तयार करणे शक्य आहे. उलट अशा केंद्रातून शिल्लक राहणाऱ्या निवळीची शास्त्रीय पद्धतीने विल्हेवाट लावण्यासाठी जितका खर्च तो कमी करणे शक्य होते.

आम्ही त्याच दुधापासून आणखी एक उत्पादन बनवत आहोत. एखाद्या कच्च्या मालापासून शक्य तितके उपयुक्त भाग मिळवत असल्याने डेअरी अधिक फायदेशीर करणे शक्य होत आहे.
- टॉड कोच, डेअरी व दुग्ध प्रक्रिया उद्योजक, ओरेगॉन.


इतर कृषी शिक्षण
पीक अवस्थेनुसार जाणून घ्या तापमानमहाराष्ट्र राज्य हे भौगोलिक क्षेत्रानुसार देशात...
पाण्याचे महत्त्व जाणून संवर्धनासाठी...जागतिक हवामान संघटनेने २०२० हे वर्ष ‘जागतिक...
पूर्व विदर्भ, पश्‍चिम महाराष्ट्रात...महाराष्ट्रासह संपूर्ण भारतावरील हवेचा दाब कमी होत...
दुधापासून व्होडका होतेय अमेरिकेत...दूध हे तुलनेने फारच कमी काळासाठी टिकवून ठेवता...
नत्रयुक्त खतांचा वापर व्हावा अधिक...पर्यावरण आणि हरितगृह वायू म्हटले की आपल्याला...
आहारातील अंड्याचे महत्त्व..मानवी आहारामध्ये हजारो वर्षांपासून अंड्यांचा...
बहुगुणी नारळपूजाअर्चा, सणवार, लग्नकार्य, बारसे, डोहाळेजेवण...
मिथेन उत्सर्जन कमी करण्यासाठी दक्ष...गेल्या भागामध्ये विविध हरितगृह वायू कोठून येतात,...
ऊर्जेशिवाय शीतकरणाचे तंत्रकोणत्याही ऊर्जेच्या वापराशिवाय शीतकरणाची एक...
हरितगृह परिणाम म्हणजे काय..पर्यावरणाचा विषय आला की, हरितगृह वायू किंवा...
..अशी ओळखा दुधातील भेसळवाढत्या महागाईमुळे अनेकदा अन्नपदार्थांमध्ये भेसळ...
एल निनो म्हणजे नेमके काय ?हवामानाविषयी माहितीमध्ये सातत्याने ऐकू येणाऱ्या...
भविष्यात मोबाईल बनतील ‘शेतीचे डॉक्टर’ पुणेः शेतातील कीड-रोग-हवामान-माती यातील बदलत्या...
तणनिर्मूलनाचा थोडक्यात इतिहास माणसाने शेतीला सुरवात केल्यानंतर काही काळात अन्य...
हरिभाऊ जावळे यांनी स्वीकारला कृषी...पुणे ः कृषी शिक्षण व संशोधन परिषदेच्या उपाध्यक्ष...
रंगीत कापड उत्पादनासाठी ‘पंदेकृवि’चा...अकोला  ः केंद्रीय कापूस संशोधन संस्था (...
कृषी अभियांत्रिकी क्षेत्रामध्ये विविध...कृषी क्षेत्रातील होत असलेले बदल, आर्थिक गुंतवणूक...
नत्र चक्राचे फायदे घेण्यासाठी...गेल्या भागापासून आपण मार्टीन ॲलेक्झांडर यांच्या...
आनंदशाळा अन् जैवविविधता संवर्धनाचे...आनंदशाळा शिबिरानंतर जवळपास सर्व शाळांत शिवार फेरी...
जीविधेची जाणीव करून देणारी आनंदशाळाशिक्षण गुणवत्तापूर्ण बनण्यासाठी शिक्षण...