agriculture news in Marathi, vote share of BJP increased, Maharashtra | Agrowon

लोकसभा निवडणुकीत भाजपच्या ‘व्होट शेअर’मध्ये वाढ
टीम अॅग्रोवन
शनिवार, 25 मे 2019

पुणे : यंदाच्या लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला देशभरात ३७.४ टक्के मते मिळाली आहेत. भाजपची १९८० मध्ये स्थापना झाल्यापासूनची ही सर्वोत्तम कामगिरी आहे. गेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपला ३१ टक्के मतांचा वाटा मिळाला होता.

भाजपप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीमध्ये शिवसेना, जनता दल (युनायटेड), शिरोमणी अकाली दल, अण्णा द्रमुक आदी प्रमुख पक्षांचा समावेश आहे. यंदाच्या लोकसभा निवडणुकीत या आघाडीला एकत्रितरीत्या ४५ टक्के मते मिळाली आहेत. गेल्या लोकसभा निवडणुकीत या आघाडीला ३८ टक्के मते मिळाली होती.

पुणे : यंदाच्या लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला देशभरात ३७.४ टक्के मते मिळाली आहेत. भाजपची १९८० मध्ये स्थापना झाल्यापासूनची ही सर्वोत्तम कामगिरी आहे. गेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपला ३१ टक्के मतांचा वाटा मिळाला होता.

भाजपप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीमध्ये शिवसेना, जनता दल (युनायटेड), शिरोमणी अकाली दल, अण्णा द्रमुक आदी प्रमुख पक्षांचा समावेश आहे. यंदाच्या लोकसभा निवडणुकीत या आघाडीला एकत्रितरीत्या ४५ टक्के मते मिळाली आहेत. गेल्या लोकसभा निवडणुकीत या आघाडीला ३८ टक्के मते मिळाली होती.

प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेसला मात्र या लोकसभा निवडणुकीत १९.५ टक्के मते मिळाली आहेत. गेल्या लोकसभा निवडणुकीच्या तुलनेत काँग्रेसच्या मतांच्या टक्केवारीत सुधारणा झालेली नाही.

भाजपप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीने गेल्या लोकसभा निवडणुकीच्या तुलनेत यंदा अधिक मते आणि जागा पटकावल्या. तसेच, देशातील बहुतांश राज्यांत अस्तित्व निर्माण करून देशव्यापी आघाडी बनण्याकडे तिची वाटचाल सुरू आहे. अपवाद केवळ दक्षिण भारतातील तीन प्रमुख राज्यांचा. 

तमिळनाडू, केरळ आणि आंध्र प्रदेश येथे या आघाडीचा वारू थांबवण्यात प्रतिस्पर्धी पक्षांना यश मिळाले आहे. आंध्र प्रदेशमध्ये भाजपला एक टक्काही मते मिळालेली नाहीत. केरळ, आंध्र प्रदेश, तमिळनाडू आणि पुद्दुचेरी या चार राज्यांमध्ये भाजपला एकही जागा जिंकता आलेली नाही.

भाजपला उत्तर प्रदेशात ५० टक्क्यांच्या आसपास मते मिळाली आहेत, तर हरियाना, मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगड, उत्तराखंड, गुजरात, झारखंड, हिमाचल प्रदेश, गोवा, कर्नाटक, दिल्ली, चंडीगड व अरुणाचल या १३ राज्यांत भाजपने पन्नास टक्क्यांहून अधिक मते प्राप्त केली आहेत. पश्चिम बंगालमध्ये भाजपला ४० टक्क्यांच्या जवळपास मते मिळाली आहेत. भाजपला जम्मू आणि काश्मीरमध्ये ४६ टक्के, तेलंगणमध्ये २० टक्के, केरळमध्ये १३ टक्के, तर ओडिशात ३८ टक्के मते मिळाली आहेत. महाराष्ट्रात भाजपला २७ टक्के, तर पंजाबमध्ये १० टक्के मतांवर समाधान मानावे लागले आहे. 

काँग्रेसला यंदाच्या लोकसभा निवडणुकीत उत्तर प्रदेशात केवळ सहा टक्के, तर बिहारमध्ये सात टक्के मते प्राप्त झाली. पंजाबमध्ये मात्र काँग्रेसला ४० टक्के मते मिळवता आली. काँग्रेसला तब्बल १७ राज्यांमध्ये एकही जागा मिळालेली नाही.

इतर अॅग्रो विशेष
राज्य बॅंकेच्या दारात जिल्हा बॅंकांचे...सोलापूर : राज्यात १९७२ ची आठवण करून देणारा भयावह...
विदर्भ, उत्तर महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी...पुणे  : कमी दाबाच्या क्षेत्रामुळे मध्य...
पूर संकटाचा नव्याने अभ्यास पुणे  : कृष्णा व भीमा खोऱ्यात यंदा आलेल्या...
शेतजमीन मोजणीचा गोंधळ सुरूचपुणे : ड्रोनच्या माध्यमातून गावांचे डिजिटल नकाशे...
तंत्रज्ञानाच्या अतिरेकी वापराने शेतकरी...नागपूर ः ‘संकरित बियाण्यांचा करा पेरा, लक्ष्मी...
जलसमस्येच्या आढाव्यासाठी औरंगाबादेत...औरंगाबाद  : मराठवाडा आणि संपूर्ण...
कृषिसेवक भरती प्रक्रियेवरील बंदी...अकोला ः कृषी खात्याने १४१६ जागांसाठी राबवलेल्या...
यंदा ५० साखर कारखाने बंद राहण्याची...पुणे ः राज्यातील उसाचे क्षेत्र आधीच्या...
पन्नास लाख शेतकऱ्यांच्या खात्यात २४...मुंबई : शेतकऱ्यांना दुष्काळाच्या चक्रातून बाहेर...
कोकण, मध्य महाराष्ट्र, विदर्भात तुरळक...पुणे  : ओडिशाच्या किनाऱ्यालगत तयार झालेल्या...
झाडांच्या गोलाईच्या आकारानुसार...पुणे: दुष्काळावर मात करण्यासाठी शेतातील आणि...
राज्य बँक घोटाळाप्रकरणी दोषींवर कारवाई...जळगाव  ः महाराष्ट्र राज्य सहकारी बँक...
पीकविमा योजनेतील झारीतील ...मुंबई : शेतकऱ्यांसाठीच्या पीकविमा योजनेवरून...
मध्य प्रदेश भावांतर योजना बंद करणारनवी दिल्ली : शेतीमालाचे दर कमी झाल्यानंतर...
वाशीम बाजारपेठेत डंका मापारी यांच्या...वाशीम जिल्ह्यातील सोमठाणा येथील विश्वनाथ मापारी...
बोगस खतप्रकरणी ‘लोकमंगल’वर गुन्हापुणे : राज्याचे सहकारमंत्री सुभाष देशमुख यांना...
कोकण, विदर्भात पावसाची शक्यतापुणे : तापमानात झालेली वाढ आणि ढगाळ हवामान...
डाळी, प्रक्रिया उद्योगातील ‘यशस्विनी’...बोरामणी (ता. दक्षिण सोलापूर) परिसरातील तब्बल ८८५...