Agriculture news in marathi, Voting on 21 October in Pune district | Agrowon

पुणे जिल्ह्यात २१ ऑक्टोबर रोजी मतदान
टीम अॅग्रोवन
रविवार, 22 सप्टेंबर 2019

पुणे : ‘‘विधानसभा निवडणुकीत पुणे जिल्ह्यात शहरी आणि ग्रामीण २१ मतदारसंघांमध्ये २१ ऑक्टोबर रोजी मतदान होणार आहे. एकूण ७६ लाख ८६ हजार ६३६ मतदारांची नोंदणी झाली आहे. यामध्ये  ४० लाख १९ हजार ६६४ पुरुष, तर ३६ लाख ६६ हजार ७४४ महिला मतदारांचा समावेश आहे’’, अशी माहिती जिल्हाधिकारी नवलकिशोर राम यांनी शनिवारी (ता. २१) पत्रकार परिषदेमध्ये दिली. या वेळी जिल्हा पोलिस अधीक्षक संदीप पाटील उपस्थित होते. 

पुणे : ‘‘विधानसभा निवडणुकीत पुणे जिल्ह्यात शहरी आणि ग्रामीण २१ मतदारसंघांमध्ये २१ ऑक्टोबर रोजी मतदान होणार आहे. एकूण ७६ लाख ८६ हजार ६३६ मतदारांची नोंदणी झाली आहे. यामध्ये  ४० लाख १९ हजार ६६४ पुरुष, तर ३६ लाख ६६ हजार ७४४ महिला मतदारांचा समावेश आहे’’, अशी माहिती जिल्हाधिकारी नवलकिशोर राम यांनी शनिवारी (ता. २१) पत्रकार परिषदेमध्ये दिली. या वेळी जिल्हा पोलिस अधीक्षक संदीप पाटील उपस्थित होते. 

जिल्हाधिकारी राम म्हणाले,‘‘ जिल्‍ह्यात एकूण ७ हजार ९२३ मतदान केंद्रावर मतदान होईल. यासाठी १३ हजार ६७५ इलेक्ट्रॉनिक मतदान मशिन उपलब्ध आहेत. अतिरिक्त ४ हजार मशिन्सची मागणी करण्यात आली आहे. या निवडणुकीत १ लाख १३ हजार ६०६ नव मतदारांची संख्या असून, लोकसभा निवडणुकीच्या तुलनेत ५९ हजार नवमतदारांची संख्या वाढली आहे. जिल्ह्यात १९० संवेदनशील मतदान केंद्रे आहेत. यामधील ३९ मतदान केंद्रे शहरात आहेत. तसेच, पोस्टल मतदानासाठी ७० हजार मतपत्रिकांची तयारी करण्यात आली आहे.’’

ज्या मतदान केंद्रांवर ३० टक्क्यांपेक्षा कमी मतदान झाले आहेत, एकाच उमेदवाराला ८० टक्क्यांपेक्षा जास्त मतदान होईल, अशा मतदान केंद्रांवर विशेष लक्ष केंद्रित केले जाणार आहे.

८० टक्क्यांपेक्षा जास्त मतदान एकाच उमेदवाराला होणाऱ्या मतदान केंद्रांची संख्या बारामती आणि इंदापूरमध्ये चार-पाच असल्याचे देखील जिल्हाधिकारी राम यांनी या वेळी सांगितले.

जिल्ह्यात २ हजार ७००, तर शहरात ७ हजार ५०० पोलिसांची कुमक मतदानाच्या दिवशी पाठविण्यात येणार असल्याचे पोलिस अधीक्षक संदीप पाटील यांनी सांगितले. 

इतर ताज्या घडामोडी
एकात्मिक कीड नियंत्रणासाठी स्वयंचलित...किडीच्या एकात्मिक नियंत्रणासाठी विविध प्रकारच्या...
दिंडोरी, नाशिक भागांत डाऊनीचा...नाशिक   : जिल्ह्यात दिंडोरी, नाशिक...
इंदापुरात १२०० एकर द्राक्ष बागा उद्‌...भवानीनगर, जि. पुणे  : इंदापूर तालुक्‍यातील...
सांगली जिल्ह्यात २० टक्के क्षेत्रावर...सांगली  ः गेल्या आठवड्यात झालेला पाऊस,...
पुणे जिल्ह्यात सर्वदूर पावसाची हजेरीपुणे : जिल्ह्याच्या सर्वच भागांत दोन-तीन...
अमेरिकेमध्ये कपाशीवर विषाणुजन्य ब्ल्यू...अमेरिकेमध्ये कपाशीवर प्रथमच विषाणूजन्य ब्ल्यू...
नगर जिल्ह्यात अजूनही १४२ टॅंकर सुरूचनगर ः पावसाळा संपला असला तरी अजूनही जिल्ह्यातील...
पावसामुळे लांबला कापसाचा हंगामराळेगाव, जि. यवतमाळ ः अति पावसामुळे कापसाचा हंगाम...
जळगाव, पुणे जिल्ह्यात ईव्हीएम, ...जळगाव  ः जिल्ह्यात सोमवारी मतदानाच्या दिवशी...
सोलापूर जिल्ह्यात पावसाचा पहिल्यांदाच...सोलापूर ः सोलापूर जिल्ह्यात गेल्या दोन...
कोयनेसह पाच धरणांतून विसर्गसातारा  ः जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांत...
जिल्हा बँकांबाबत अनास्कर यांनी ...पुणे  : राज्यातील शेतकऱ्यांच्या घामाच्या...
कपाशीवरील दहिया रोगाचे एकात्मिक...कपाशीचे पीक हे साधारणतः सहा महिने किंवा...
गुलटेकडीत गाजर, पावट्याच्या दरात सुधारणापुणे ः गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार...
कृषी सल्लाकापूस अवस्था ः फुले उमलणे ते बोंडे धरणे फुलकिडे...
जळगावात केळी दरात सुधारणा; आवक रोडावलीजळगाव ः केळीची आवक गेल्या आठवड्यात रोडावलेलीच...
कळमणा बाजारात नव्या सोयाबीनची आवक वाढलीनागपूर : जुन्यानंतर आता हंगामातील नव्या सोयाबीनची...
नाशिकमध्ये हिरवी मिरची १२०० ते २५००...नाशिक : नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये चालू...
मराठवाड्यातील ३७१ मंडळांमध्ये पाऊसऔरंगाबाद/ परभणी ः मराठवाड्यातील आठ जिल्ह्यांतील...
पुणे जिल्ह्यात संततधार पाऊसपुणे : पुणे जिल्ह्यात सर्वदूर शनिवारपासून (ता. १९...