लोकसभेच्या सहाव्या टप्प्यासाठी आज मतदान

मतदान
मतदान

नवी दिल्ली ः लोकसभा निवडणुकीच्या सहाव्या टप्प्यासाठी आज (ता. १२) मतदान होईल. चार केंद्रीय मंत्री, तीन माजी मुख्यमंत्री, दोन प्रदेशाध्यक्ष आणि पश्‍चिम बंगाल, उत्तर प्रदेशमधील दोन मंत्री या टप्प्यात भाग्य आजमावत आहेत. अंतिम टप्प्यासाठी १९ मे रोजी मतदान होणार असून, २३ मे रोजी मतमोजणी होईल. या सहाव्या टप्प्यात भाजपपुढे उत्तर प्रदेशात समाजवादी पक्ष-बहुजन समाज पक्षाच्या महाआघाडीचे, बिहारमध्ये राष्ट्रीय जनता दल आणि कॉंग्रेस आघाडीचे आव्हान आहे. पश्‍चिम बंगालमध्ये तृणमूल कॉंग्रेसशी भाजपचा संघर्ष आहे, तर राष्ट्रीय राजधानी दिल्लीमध्ये सत्ताधारी आम आदमी पक्ष, भाजप आणि कॉंग्रेस अशी तिरंगी लढत आहे. सरकारमधील नरेंद्रसिंह तोमर (मुरैना, मध्य प्रदेश), मेनका गांधी (सुलतानपूर, उत्तर प्रदेश), राधामोहनसिंह (पश्‍चिम चंपारण्य, बिहार), डॉ. हर्ष वर्धन (चांदणी चौक, दिल्ली) हे चार मंत्री उद्या मतदारांना सामोरे जाणार आहेत. उत्तर प्रदेशातल्या योगी सरकारमधील मंत्री रिटा बहुगुणा अलाहाबाद मतदारसंघातून, तर पश्‍चिम बंगालच्या बॉंकुरामध्ये मुख्यमंत्री ममता बॅनर्जींचे विश्‍वासू मंत्री आणि कोलकत्याचे माजी महापौर असलेले सुब्रतो मुखर्जी हे लढत आहेत. दिल्लीच्या ईशान्य दिल्ली मतदारसंघात कॉंग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा आणि माजी मुख्यमंत्री शीला दीक्षित यांची भाजपचे प्रदेशाध्यक्ष मनोज तिवारी यांच्याशी लढत आहे. समाजवादी पक्षाचे अध्यक्ष आणि माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांना भाजपचे उमेदवार आणि भोजपुरी अभिनेते निरहुआ यांनी आझमगडमधून आव्हान दिले आहे. हरियानामध्ये कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक तंवर (सिरसा), त्याचप्रमाणे माजी मुख्यमंत्री भूपिंदरसिंह हुडा (सोनिपत) यांच्या लढतीकडेही लक्ष लागले आहे. पश्‍चिम बंगालमध्ये घाटल मतदारसंघात बंगाली चित्रपटसृष्टीतले आघाडीचे अभिनेते देव अधिकारी तृणमूल कॉंग्रेसतर्फे मैदानात आहेत, तर ममता बॅनर्जींच्या नेतृत्वाविरुद्ध बंडाचा झेंडा फडकविणारे तृणमूल कॉंग्रेसचे खासदार सौमित्र खान या वेळी विष्णुपूरमधून भाजपतर्फे लढत आहेत. याखेरीज कॉंग्रेस नेते ज्योतिरादित्य शिंदे (गुणा, मध्य प्रदेश), अजय माकन (नवी दिल्ली), राजदप्रमुख लालूप्रसाद यादव यांचे निकटवर्ती असलेले माजी मंत्री डॉ. रघुवंशप्रसाद (वैशाली) यांचीही प्रतिष्ठा पणाला लागली आहे. सहाव्या टप्प्यात...

एकूण मतदारसंघ  ५९
राज्ये  
एकूण मतदार  १०,१६,४७,६२४
पुरुष मतदार  ५,४१,९८,०९०
महिला मतदार    ४,७४,४६,२२७
तृतीयपंथी मतदार  ३३०७
एकूण उमेदवार ९७९
केंद्रे   १,१३,१६७

राज्यनिहाय जागा

दिल्ली   ७
हरियाना    १०
उत्तर प्रदेश १४
मध्य प्रदेश
बिहार   ८
झारखंड   ४
पश्‍चिम बंगाल  ८ 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com