कोल्हापूर जिल्ह्यात ७४.०८ टक्के मतदान

कोल्हापूर जिल्ह्यात चुरशीने मतदान
कोल्हापूर जिल्ह्यात चुरशीने मतदान

कोल्हापूर ः गेल्या महिन्याच्या कालावधीतील झालेल्या जोरदार प्रचारानंतर सोमवारी (ता. २१) जिल्ह्यातील दहा विधानसभा मतदारसंघासाठी सायंकाळी  ६ वाजेपर्यंत सरासरी ७४.०८ टक्के मतदान झाले. जिल्ह्यात विधानसभेच्या दहा जागांसाठी १०६ उमेदवार रिंगणात आहेत. या उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद झाले. 

करवीर विधानसभा मतदारसंघात सर्वाधिक म्हणजे ८३.९३ टक्के मतदानाची नोंद झाली, तर सर्वात कमी कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघात ६०.८७ टक्के मतदान झाले.

चंदगड विधानसभा मतदार संघ-६८.५९ टक्के.  राधानगरी -७५.१४, कागल - ८१,  कोल्हापूर दक्षिण-७४.५७,  करवीर -८३.९३, कोल्हापूर  उत्तर  -६०.८७,  शाहूवाडी -७९.९०, हातकणंगले -७३.१०,  इचलकरंजी - ६८.३८  आणि शिरोळ विधानसभा मतदार संघात ७४.४१ टक्के मतदान झाले आहे.

जिल्ह्यातील एकूण १५ लाख ८५ हजार ३८६ पुरूष मतदारांपैकी ११ लाख ९४ हजार ५६३ जणांनी  मतदान केले. १५ लाख ७ हजार ५७६ महिला मतदारांपैकी १० लाख ९६ हजार ६२५ मतदारांनी आपला हक्क बजावला. तर एकूण ८१ इतर मतदारांपैकी २१ जणांनी मतदान केले.  मतदारसंघनिहाय पुरूष, महिला आणि इतर मतदारांनी केलेले मतदान पुढीलप्रमाणे- चंदगड- पुरूष १ लाख ७ हजार ८३९, महिला १ लाख १० हजार ९९७, इतर १. राधानगरी पुरूष १ लाख २६ हजार ५४४, महिला १ लाख १८ हजार १५८. कागल - पुरूष १ लाख ३२ हजार ८२७, महिला १ लाख २८ हजार ६६३. कोल्हापूर दक्षिण- पुरूष १ लाख २६ हजार ६४, महिला १ लाख १५ हजार ८९८, इतर २. करवीर- पुरूष १ लाख ३४ हजार ९९३, महिला १ लाख १९ हजार ६५३, इतर १. कोल्हापूर उत्तर- पुरूष ९२ हजार ८४०, महिला ८१ हजार ३५६, इतर २. शाहूवाडी- पुरूष १ लाख १९ हजार ३५२, महिला १ लाख १० हजार ४५८, इतर १. हातणंगले- पुरूष १ लाख २५ हजार ६०९, महिला १ लाख ६ हजार ६८४, इतर ४. इचलकरंजी- पुरूष १ लाख ६ हजार ४१४, महिला ९४ हजार १३४, इतर ९ आणि शिरोळ-  पुरूष १ लाख २२ हजार ८१, महिला १ लाख १० हजार ६२४, इतर १. 

जिल्ह्यातील एकूण ३० लाख ९३ हजार ४३ मतदारांपैकी २२ लाख ९१ हजार २०९ मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला.

निवडणुकीपूर्वी दोन अगोदर मतदारांपेक्षा पावसाने चिंता वाढविली. परंतु सोमवारी सकाळपासून केवळ ढगाळ हवामान राहिल्याने उमेदवार समर्थकांनी सुटकेचा नि:श्‍वास टाकला. जिल्हा प्रशासनाने दुपारी पावसाची शक्‍यता असल्याने सकाळी लवकरच मतदान करावे, असे आवाहन केले होते. सकाळी अकरा वाजेपर्यंत जिल्ह्यात सरासरी २० टक्के मतदान झाले होते. तर एक वाजेपर्यंत ही आकडेवारी चाळीस टक्क्‍यांवर गेली. दुपारी चारपर्यंत पावसाच्या सरी कुठेच झाल्या नाहीत, याचा सकारात्मक परिणाम मतदारांवर झाला. चार वाजेपर्यंत पन्नास टक्केपेक्षा जास्त मतदान झाले. दुपारी चारपर्यंत करवीरमध्ये ६२, शाहूवाडीत ६१ तर कोल्हापूर दक्षिणमध्ये ५३ टक्के मतदान झाले होते. दुपारपर्यंत पावसाचा अंदाज घेत पाऊस येणार नसल्याची खात्री झाल्याने शेवटच्या तासाभरात पुन्हा मतदारांची गर्दी झाल्याचे चित्र ग्रामीण भागातील मतदान केंद्रावर होते.

अत्यंत चुरशीच्या मतदारसंघात इर्षेने मतदान झाले. अनेक मतदारसंघात दुरंगी, तिरंगी आणि चौरंगीच आहेत. विद्यमान दहाही आमदारांसमोर विरोधकांनी तगडे आव्हान उभे केल्याने शेवटच्या क्षणापर्यंत निवडणुकीतील चुरस पाहायला मिळत आहे. राष्ट्रवादीने दोन जागा जिंकत कशीबशी लाज राखली, तर शिवसेनेने षटकार ठोकून आपणच जिल्ह्यात एक नंबर पक्ष असल्याचे दाखवून दिले. भाजपनेही दोन जागा जिंकून खाते उघडले. आता कॉंग्रेस-राष्ट्रवादीची आघाडी तर भाजप-शिवसेना युती रिंगणात आहे. युतीच्या विद्यमान आठ आमदारांसमोर आघाडीसह ‘जनसुराज्य’ व अपक्षांनी आव्हान उभे केले आहे. निवडणुकीनंतर आता सगळ्यांच्या नजरा निकालाकडे लागल्या आहेत.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com