Agriculture news in Marathi, Voting by election in Kolhapur district | Page 2 ||| Agrowon

कोल्हापूर जिल्ह्यात ७४.०८ टक्के मतदान

टीम अॅग्रोवन
बुधवार, 23 ऑक्टोबर 2019

कोल्हापूर ः गेल्या महिन्याच्या कालावधीतील झालेल्या जोरदार प्रचारानंतर सोमवारी (ता. २१) जिल्ह्यातील दहा विधानसभा मतदारसंघासाठी सायंकाळी  ६ वाजेपर्यंत सरासरी ७४.०८ टक्के मतदान झाले. जिल्ह्यात विधानसभेच्या दहा जागांसाठी १०६ उमेदवार रिंगणात आहेत. या उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद झाले. 

करवीर विधानसभा मतदारसंघात सर्वाधिक म्हणजे ८३.९३ टक्के मतदानाची नोंद झाली, तर सर्वात कमी कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघात ६०.८७ टक्के मतदान झाले.

कोल्हापूर ः गेल्या महिन्याच्या कालावधीतील झालेल्या जोरदार प्रचारानंतर सोमवारी (ता. २१) जिल्ह्यातील दहा विधानसभा मतदारसंघासाठी सायंकाळी  ६ वाजेपर्यंत सरासरी ७४.०८ टक्के मतदान झाले. जिल्ह्यात विधानसभेच्या दहा जागांसाठी १०६ उमेदवार रिंगणात आहेत. या उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद झाले. 

करवीर विधानसभा मतदारसंघात सर्वाधिक म्हणजे ८३.९३ टक्के मतदानाची नोंद झाली, तर सर्वात कमी कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघात ६०.८७ टक्के मतदान झाले.

चंदगड विधानसभा मतदार संघ-६८.५९ टक्के.  राधानगरी -७५.१४, कागल - ८१,  कोल्हापूर दक्षिण-७४.५७,  करवीर -८३.९३, कोल्हापूर  उत्तर  -६०.८७,  शाहूवाडी -७९.९०, हातकणंगले -७३.१०,  इचलकरंजी - ६८.३८  आणि शिरोळ विधानसभा मतदार संघात ७४.४१ टक्के मतदान झाले आहे.

जिल्ह्यातील एकूण १५ लाख ८५ हजार ३८६ पुरूष मतदारांपैकी ११ लाख ९४ हजार ५६३ जणांनी  मतदान केले. १५ लाख ७ हजार ५७६ महिला मतदारांपैकी १० लाख ९६ हजार ६२५ मतदारांनी आपला हक्क बजावला. तर एकूण ८१ इतर मतदारांपैकी २१ जणांनी मतदान केले. 
मतदारसंघनिहाय पुरूष, महिला आणि इतर मतदारांनी केलेले मतदान पुढीलप्रमाणे- चंदगड- पुरूष १ लाख ७ हजार ८३९, महिला १ लाख १० हजार ९९७, इतर १. राधानगरी पुरूष १ लाख २६ हजार ५४४, महिला १ लाख १८ हजार १५८. कागल - पुरूष १ लाख ३२ हजार ८२७, महिला १ लाख २८ हजार ६६३. कोल्हापूर दक्षिण- पुरूष १ लाख २६ हजार ६४, महिला १ लाख १५ हजार ८९८, इतर २. करवीर- पुरूष १ लाख ३४ हजार ९९३, महिला १ लाख १९ हजार ६५३, इतर १. कोल्हापूर उत्तर- पुरूष ९२ हजार ८४०, महिला ८१ हजार ३५६, इतर २. शाहूवाडी- पुरूष १ लाख १९ हजार ३५२, महिला १ लाख १० हजार ४५८, इतर १. हातणंगले- पुरूष १ लाख २५ हजार ६०९, महिला १ लाख ६ हजार ६८४, इतर ४. इचलकरंजी- पुरूष १ लाख ६ हजार ४१४, महिला ९४ हजार १३४, इतर ९ आणि शिरोळ-  पुरूष १ लाख २२ हजार ८१, महिला १ लाख १० हजार ६२४, इतर १. 

जिल्ह्यातील एकूण ३० लाख ९३ हजार ४३ मतदारांपैकी २२ लाख ९१ हजार २०९ मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला.

निवडणुकीपूर्वी दोन अगोदर मतदारांपेक्षा पावसाने चिंता वाढविली. परंतु सोमवारी सकाळपासून केवळ ढगाळ हवामान राहिल्याने उमेदवार समर्थकांनी सुटकेचा नि:श्‍वास टाकला. जिल्हा प्रशासनाने दुपारी पावसाची शक्‍यता असल्याने सकाळी लवकरच मतदान करावे, असे आवाहन केले होते. सकाळी अकरा वाजेपर्यंत जिल्ह्यात सरासरी २० टक्के मतदान झाले होते. तर एक वाजेपर्यंत ही आकडेवारी चाळीस टक्क्‍यांवर गेली. दुपारी चारपर्यंत पावसाच्या सरी कुठेच झाल्या नाहीत, याचा सकारात्मक परिणाम मतदारांवर झाला. चार वाजेपर्यंत पन्नास टक्केपेक्षा जास्त मतदान झाले. दुपारी चारपर्यंत करवीरमध्ये ६२, शाहूवाडीत ६१ तर कोल्हापूर दक्षिणमध्ये ५३ टक्के मतदान झाले होते. दुपारपर्यंत पावसाचा अंदाज घेत पाऊस येणार नसल्याची खात्री झाल्याने शेवटच्या तासाभरात पुन्हा मतदारांची गर्दी झाल्याचे चित्र ग्रामीण भागातील मतदान केंद्रावर होते.

अत्यंत चुरशीच्या मतदारसंघात इर्षेने मतदान झाले. अनेक मतदारसंघात दुरंगी, तिरंगी आणि चौरंगीच आहेत. विद्यमान दहाही आमदारांसमोर विरोधकांनी तगडे आव्हान उभे केल्याने शेवटच्या क्षणापर्यंत निवडणुकीतील चुरस पाहायला मिळत आहे. राष्ट्रवादीने दोन जागा जिंकत कशीबशी लाज राखली, तर शिवसेनेने षटकार ठोकून आपणच जिल्ह्यात एक नंबर पक्ष असल्याचे दाखवून दिले. भाजपनेही दोन जागा जिंकून खाते उघडले. आता कॉंग्रेस-राष्ट्रवादीची आघाडी तर भाजप-शिवसेना युती रिंगणात आहे. युतीच्या विद्यमान आठ आमदारांसमोर आघाडीसह ‘जनसुराज्य’ व अपक्षांनी आव्हान उभे केले आहे. निवडणुकीनंतर आता सगळ्यांच्या नजरा निकालाकडे लागल्या आहेत.
 


इतर ताज्या घडामोडी
सांगली जिल्ह्यात खते, बियाण्यांच्या ६९...सांगली :‘कृषी विभागाने जिल्ह्यातील ६९ किटकनाशके,...
परभणी जिल्ह्यात आधार प्रमाणिकरणाचे २९...परभणी : महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती...
सजीव प्रजातींची सर्वमान्य यादी...पृथ्वीवरील सर्व ज्ञात प्रजातींची जागतिक पातळीवर...
नाशिक जिल्ह्यात सोयाबीन बियाणे न...नाशिक : खरिपाच्या सुरुवातीला चांगला पाऊस झाला....
वऱ्हाडात कृषी विक्रेत्यांचा कडकडीत बंदअकोला : सोयाबीन बियाणे न उगवल्या प्रकरणी...
नाशिक जिल्ह्यात कृषी निविष्ठा...नाशिक : कृषी निविष्ठा विक्री केंद्रांवरील...
विदर्भात दहा हजार कृषी केंद्रांना टाळेनागपूर : कृषी विक्रेत्यांच्या न्याय्य...
पुणे जिल्ह्यात कृषी सेवा केंद्रे बंदपुणे : महाराष्ट्र फर्टिलायझर्स, पेस्टीसाईड्स...
सोलापुरात कृषी सेवा केंद्रांचा बंद...सोलापूर : बियाणे उगवणीबाबत झालेल्या तक्रारीच्या...
‘जिल्हा परिषद, ग्रामपंचायत अधिकारी, ...मुंबई : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी...
थेट विक्री बंदीची नोटीस मागे घ्या,...पुणे ः शेतकऱ्यांना पुणे शहरात थेट शेतमाल विक्रीला...
हमाल कोरोनाग्रस्त, जळगावात खतांचे रेक...जळगाव ः मालधक्क्यावर रेल्वे रेक रिकामे करणाऱ्या...
भात रोपवाटिकेत खोडकिडीचा प्रादुर्भावऑक्टोबर, नोव्हेंबरमध्ये खरिपातील भात पीक...
परभणीत भेंडी १२०० ते २००० रुपये...परभणी : ‘‘येथील पाथरी रस्त्यावरील फळे, भाजीपाला...
केळीवरील करपा रोगाचे नियंत्रणसध्या केळी पिकाच्या पील बागेत करपा रोगाचा...
वऱ्हाडातील शेतकऱ्यांचा सोयाबीनकडे अधिक...अकोला ः खरिपातील पेरण्या अंतिम टप्प्यात पोचल्या...
औरंगाबादमध्ये निम्म्याच शेतकऱ्यांची मका...औरंगाबाद  : जिल्ह्यात आधारभूत किमतीने भरड...
नांदेड, परभणी, हिंगोलीतील १२४ मंडळांत...नांदेड  ः नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यातील...
औरंगाबाद जिल्ह्यात आठवड्यात १५१ खत कृषी...औरंगाबाद : ‘‘कृषी विभाग व जिल्हा परिषद...
दुभत्या जनावरांच्या किमतीतही चाळीस...नगर ः दुधाचे दर कमी-जास्ती झाले की दुभत्या...