लोकसभा २०१९ : विदर्भात पहिल्या टप्प्यासाठी आज मतदान

विदर्भात पहिल्या टप्प्यासाठी आज मतदान
विदर्भात पहिल्या टप्प्यासाठी आज मतदान

नागपूर : लोकसभा निवडणूक २०१९करिताच्या पहिल्या टप्प्याकरिता आज (ता.११) मतदान होत आहे. महाराष्ट्रात विदर्भातील सात मतदारसंघांसाठी ११६ उमेदवार आज आपले भवितव्य अजमाविणार आहे. भाजपचे नितीन गडकरी, हंसराज अहिर यांच्यासह काँग्रेसचे माणिकराव ठाकरे, नाना पटोले, शिवसेनेच्या भावना गवळी यांचा यात समावेश आहे. पहिल्या टप्प्यासाठी सुमारे १ कोटी २२ लाख मतदार आपला हक्क बजावणार आहेत. मतदान वेळ सकाळी ८ ते सायंकाळी ६ दरम्यान असून, वाढत उकाडा, संवेदनशिल मतदारसंघ आणि नक्षलग्रस्त भाग ही आव्हाने आहेत. 

नागपूर तसेच यवतमाळ-वाशीममधील माणिकराव ठाकरे आणि भावना गवळी यांच्यातील लढत चुरशीची ठरणार आहे. विकास झाला नसल्याचा दावा इतर उमेदवार करीत असताना भाजप-शिवसेनेचे उमेदवार विकास झाल्याचा दावा करून जनतेसमोर जात आहेत. या वेळी स्थानिक प्रश्‍न आणि शेतीच्या समस्या या सर्वच पक्षांच्या अजेंड्यातून गायब असल्याचे चित्र अनुभवता आले. 

पूर्व विदर्भातील बहुतांश जिल्हे धान उत्पादक आहेत. त्यांना वाढीव हमीभाव, बोनस हे मुद्दे प्रचारात नव्हते. याऐवजी जातीय समीकरणेच या निवडणुकीत प्रभावी ठरणार असल्याची स्थिती आहे. त्यामुळे शेती आणि शेतकऱ्यांचे प्रश्‍न पुन्हा एकदा मागे पडणार आहेत. शेतकरी नेत्यांनीदेखील याबाबत तीव्र नाराजी व्यक्‍त केली आहे. निवडून येणाऱ्या सत्ताधाऱ्यांना या संदर्भाने जाब विचारू, अशी भूमिका विदर्भातील काही शेतकरी संघटनांनी घेतली आहे. पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त असून प्रशासनाची निवडणुकीची तयारीदेखील पूर्णत्वास गेली आहे.

गडकरी-पटोलेंच्या लढतीकडे लक्ष्य भाजपचे ज्येष्ठ नेते नितीन गडकरी आणि काँग्रेसच्या शेतकरी आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष नाना पटोले यांच्यात तुल्यबळ लढतीचे संकेत आहेत. नाना पटोले यांच्या माध्यमातून कुणबी कार्ड येथे काँग्रेसने खेळले आहे. या दोन नेत्यांसाठी दिग्गज नेत्यांच्या सभाही झाल्या. त्यामध्ये राहुल गांधी, अमित शहा यांचा समावेश आहे.

असे होणार मतदान मतदान वेळ ः सकाळी ७ ते सायं. ६ दरम्यान एकूण मतदान केंद्र ः १४ हजार १८९ एकूण मतदार : सुमारे १ कोटी २२ लाख

पहिल्या टप्प्यातील प्रमुख लढती नागपूर ः नितीन गडकरी (भाजप) विरुद्ध नाना पटोले (काँग्रेस) वर्धा ः चारुलता टोकस (वर्धा) विरुद्ध रामदास तडस (भाजप) रामटेक ः कृपाल तुमाने (शिवसेना) विरुद्ध किशोर गजभिये (काँग्रेस) भंडारा-गोंदिया ः नाना पंचबुद्धे (राष्ट्रवादी काँग्रेस), सुनील मेंढे (भाजप) गडचिरोली-चिमूर ः अशोक नेते (भाजप) विरुद्ध डॉ. नामदेव उसेंडी (काँग्रेस) चंद्रपूर ः हंसराज अहिर (भाजप) विरुद्ध बाळू धानोरकर (काँग्रेस) यवतमाळ-वाशीम ः भावना गवळी (शिवसेना) विरुद्ध माणिकराव ठाकरे (काँग्रेस)

मतदारसंघ : एकूण उमेदवार मतदार संख्या मतदान केंद्र
१) वर्धा : १४ १७ लाख ४३ हजार २०६ २०२६
२) रामटेक : १६ १९ लाख २१ हजार ०४७ २०८२
३) नागपूर : ३० २१ लाख ६० हजार २७९ २०६५
४) भंडारा-गोंदिया : १४ १८ लाख ३७ हजार २१७७
५) गडचिरोली-चिमूर : ५ ७ लाख ६९ हजार ७४६ १८७१
६) चंद्रपूर : १३ १८ लाख ८९ हजार ८८८ २१९३
७) यवतमाळ-वाशीम : २४ १९ लाख १४ हजार ७८५ २१८१

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com