ग्रामपंचायतीसाठी आज मतदान 

गाव पातळीवरील राजकारणाला अन्यन्य महत्त्व असलेल्या राज्यातील साधारण चौदा हजार ग्रामपंचायतीसाठी आज (ता.१५) मतदान होत आहे.
grampancha
grampancha

नगर : गाव पातळीवरील राजकारणाला अन्यन्य महत्त्व असलेल्या राज्यातील साधारण चौदा हजार ग्रामपंचायतीसाठी आज (ता.१५) मतदान होत आहे. सोमवारी (ता.१८) मतमोजणी होईल. राजकीय पक्षांच्या अधिकृत चिन्हावर या निवडणूका लढवल्या जात नसल्या तरी प्रत्येक नेत्यांनी आपल्या अस्तित्वासाठी प्रतिष्ठा पणाला लावली आहे. 

राज्यात कोरोना संसर्गामुळे स्थगित झालेल्या १४ हजार २३४ ग्रामपंचायतीच्या निवडणूका होत आहेत. ग्रामपंचायत निवडणुकांबाबत जिल्हा पातळीवर जिल्हाधिकारी या निवडणुकांचे नियोजन करत असल्याने राज्य निवडणूक आयोगाकडून कोणतीही अधिकृत माहिती दिली जात नाही. मात्र मिळालेल्या माहितीनुसार राज्यात सुमारे एक लाख १० हजाराच्या जवळपास सदस्यसंख्येसाठी निवडणूक होत आहे. दीड लाखाहून अधिक कर्मचारी या प्रकियेत काम करत आहेत. साधारण चाळीस हजार मतदान केंद्रे आहेत. यंदा पहिल्यांदाच राज्यातील कामांतून आदर्श निर्माण करणाऱ्या गावांत निवडणूका होत आहेत. राजकीय पक्षांच्या चिन्हावर निवडणूक लढवली जात नसली तरी नेते अधिक सक्रिय आहेत. राज्यात पाचशेपेक्षा अधिक ग्रामपंचायतीच्या निवडणूका बिनविरोध झाल्या आहेत. मात्र हा अधिकृत आकडा मतमोजणी नंतरच कळणार आहे. 

सर्वाधिक नांदेडला १०१५, साताऱ्यात ८७९, नगरला ७६७, जळगावला ७८३, पुण्यात ७४८, यवतमाळला ९८०, औरंगाबादला ६१८, परभणीला ५६६, हिंगोलीला ४९५, बुलडाण्याला ५२७, अमरावतीला ५५३, जालन्याला ४७५ निवडणूक होत असलेल्या ग्रामपंचायतीचा समावेश आहे.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com