Agriculture news in Marathi, Voting for the Legislative Assembly in Washim district today | Agrowon

वाशीम जिल्ह्यात विधानसभेसाठी आज मतदान

टीम अॅग्रोवन
सोमवार, 21 ऑक्टोबर 2019

वाशीम : विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी सोमवारी (ता. २१) मतदान होणार असून यासाठी जिल्हा निवडणूक यंत्रणा सज्ज झाली असल्याचे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी हृषीकेश मोडक यांनी सांगितले.

वाशीम : विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी सोमवारी (ता. २१) मतदान होणार असून यासाठी जिल्हा निवडणूक यंत्रणा सज्ज झाली असल्याचे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी हृषीकेश मोडक यांनी सांगितले.

जिल्ह्यात ५ लाख ४५१ पुरुष, ४ लाख ५८ हजार ९० महिला व १० तृतीयपंथी असे एकूण ९ लाख ५८ हजार ५५१ मतदार आहेत. यामध्ये ११ हजार २९० दिव्यांग मतदारांचा समावेश आहे. जिल्ह्यात सोमवारी १ हजार ५२ मतदान केंद्रांवर मतदान प्रक्रिया होणार आहे. महिलांकडून संनियंत्रण करणारी आणि व्यवस्थापनावर भर देणारी प्रत्येक विधानसभा मतदारसंघात दोन या प्रमाणे जिल्ह्यात ०६ ‘सखी मतदार केंद्रे’ स्थापन केली जाणार आहेत. 

तसेच प्रत्येक मतदारसंघात एक आदर्श मतदान केंद्र स्थापन केले जाईल. मतदानादिवशी जिल्ह्यातील १०५ मतदान केंद्रांवरील मतदान प्रक्रियेचे ‘वेब कास्टिंग’ होणार आहे. या मतदान केंद्रांवर ‘सीसीटीव्ही’द्वारे निवडणूक यंत्रणेची थेट नजर राहणार आहे, असे जिल्हाधिकारी श्री. मोडक यांनी सांगितले.

जिल्हाधिकारी म्हणाले, ‘‘मतदान केंद्रांवर पिण्याचे पाणी, विद्युतपुरवठा, ब्रेल भाषेतील मतपत्रिका, शौचालय, स्वयंसेवक आदी किमान सुविधा पुरविण्यात येणार आहेत.’’

मतदानासाठी आवश्यक ओळखपत्र
भारत निवडणूक आयोगाचे मतदान ओळखपत्र नसेल अशावेळी पासपोर्ट (पारपत्र), वाहनचालक परवाना, छायाचित्र असलेले कर्मचारी ओळखपत्र (राज्य/केंद्र शासन, सार्वजनिक उपक्रम, सार्वजनिक मर्यादित कंपन्यांचे ओळखपत्र), छायाचित्र असलेले बँकांचे/टपाल कार्यालयाचे पासबुक, पॅनकार्ड, राष्ट्रीय लोकसंख्या नोंदणी (नॅशनल पॉप्युलेशन रजिस्ट्रेशन) अंतर्गत महसूलनिर्मिती निर्देशांक (रेव्हेन्यू जनरेशन इंडेक्स) द्वारे दिलेले स्मार्टकार्ड, मनरेगा जॉबकार्ड, कामगार मंत्रालयाने दिलेले आरोग्य विमा स्मार्टकार्ड, छायाचित्र असलेले निवृत्तीवेतन दस्तावेज, खासदार/आमदार/विधान परिषद सदस्य यांना दिलेले ओळखपत्र अथवा आधारकार्ड यापैकी एक ओळखपत्र ग्राह्य धरण्यात येणार आहे.

मतदान केंद्राची माहिती अशी मिळवा
मतदारांना एका क्लिकवर मतदान केंद्र व मतदार यादीतील त्यांची माहिती मिळविण्याची सुविधा भारत निवडणूक आयोगाच्या https://electoralsearch.in या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आली आहे. या संकेतस्थळावर स्वतःची संपूर्ण माहिती नमूद केल्यास माहितीचा शोध घेता येतो. तसेच, मतदारांच्या मदतीसाठी ‘व्होटर हेल्पलाइन-१९५०’ या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधून मतदारांना माहिती मिळवता येईल. मतदारांसाठी निवडणूक आयोगाने ‘व्होटर हेल्पलाइन ॲप’ ही सुरू केले आहे.
 


इतर ताज्या घडामोडी
माजी मंत्री अनिल राठोड यांचे निधननगर, : नगर शहराचे माजी आमदार, तत्कालीन युती...
माजी मुख्यमंत्री शिवाजीराव पाटील...लातूर : काँग्रेसचे जेष्ठ नेते, माजी मुख्यमंत्री...
परभणी जिल्ह्यात तीन लाख ७२ हजार हेक्टर...परभणी : ‘‘पंतप्रधान पिकविमा योजनेअंतर्गंत...
लातूर विभागात विम्याचे २१ लाख हेक्टर...उस्मानाबाद : लातूर, उस्मानाबाद, नांदेड, परभणी,...
'रासाका' लवकर सुरू करा, शेतकऱ्यांची...नाशिक  : गेल्या काही दिवसांपासून निफाड...
खानदेशात कांदा रोपवाटिकांची स्थिती बिकट...जळगाव : खानदेशात कांदा रोपवाटिकांची स्थिती बिकट...
यावल, रावेरमध्ये मका पिकावर लष्करी अळी...जळगाव : यावल तालुक्यातील किनगाव, डांभुर्णी,...
नाशिक जिल्ह्यात लाल कांद्याच्या तुरळक...नाशिक : जिल्ह्यात खरीप हंगामातील कांदा लागवडीचा...
सोलापूर जिल्ह्यात सोयाबीनच्या निकृष्ट...सोलापूर : जिल्ह्यात सोयाबीनच्या निकृष्ठ...
अकोले तालुक्‍यात भात लागवडी रखडल्यानगर : जिल्ह्यातील अकोले तालुक्‍याच्या उत्तर...
गोंदियाची पीक कर्ज वाटपात आघाडीगोंदिया : पीक कर्ज वाटपात जिल्ह्याने आघाडी घेत...
जुन्नर, नारायणगावात टोमॅटोचे दर टिकूनपुणे ः जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या...
प्रतिबंधित कीटकनाशकांची विक्री करू नकाअकोला ः पिकांवर कीटकनाशक फवारणी करताना होणाऱ्या...
माळशिरस, करमाळ्यात मक्याची ३० हजार...सोलापूर  ः अकलूज कृषी उत्पन्न बाजार समिती...
रत्नागिरी जिल्ह्यात मुसळधार पाऊसरत्नागिरी : जिल्ह्यात वेगवान वाऱ्यासह पडणाऱ्या...
चंद्रपूर कृषी विभाग देणार रानभाज्यांची...गोंडपिपरी, जि. चंद्रपूर ः अळू, काटवल, सूरण, टरोटा...
कोल्हापूर जिल्ह्यात पावसाला सुरुवातकोल्हापूर : जिल्ह्यात सोमवारी सायंकाळपासून...
असे होते ग्लायफोसेट तणनाशकाचे निसर्गात...केंद्र सरकारकडून नुकताच मसुदा आदेश प्रसिध्द...
जळगावात गवार २००० ते ४२०० रुपये...जळगाव  ः कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
मराठवाड्यात पावसाच्या अंदाजानुसार ऑगस्ट...एकंदरीत या वर्षी मराठवाड्यात बहुतांश भागात...