परभणी जिल्हा बँकेसाठी चुरशीने मतदान

परभणी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीत सत्तेसाठी काँग्रेसचे आमदार सुरेश वरपुडकर आणि भाजप नेते रामप्रसाद बोर्डीकर यांच्या नेतृत्वाखालील पॅनेलमध्ये मोठी चुरस दिसून आली.
जिल्हा बँकेसाठी चुरशीने मतदान Voting for Parbhani District Bank
जिल्हा बँकेसाठी चुरशीने मतदान Voting for Parbhani District Bank

परभणी : परभणी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीत सत्ता काबीज करण्यासाठी काँग्रेसचे आमदार सुरेश वरपुडकर आणि माजी आमदार, भाजप नेते रामप्रसाद बोर्डीकर यांच्या नेतृत्वाखालील पॅनेलमध्ये मोठी चुरस दिसून आली.

रविवारी (ता. २१) सोनपेठ येथील मतदान केंद्रावर दोन गटांमधील वादानंतर झालेल्या दगडफेकीत दोन गाड्यांचे नुकसान झाले आहे. अन्य केंद्रावर शांततेत मतदान पार पडले. दोन जिल्ह्यांतील १४ केंद्रावर दुपारी दोन वाजेपर्यंत १ हजार ५७४ पैकी १ हजार ४३५  मतदारांनी (९१.२३ टक्के) मतदान केले.

जिल्हा बॅंकेच्या २१ पैकी ७ जागांवर बिनविरोध निवड झाल्याने रविवारी (ता.२१) परभणी जिल्ह्यातील १४ जागांसाठी मतदान घेण्यात आले. विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था सोनपेठ मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राजेश विटकेर आणि गंगाधर बोर्डीकर यांच्यातील लढत चुरशीची ठरली आहे. विटेकर, बोर्डीकर समर्थकातील वादानंतर मतदान केंद्राबाहेर दगडफेक झाल्यामुळे काहीकाळ तणाव निर्माण झाला होता. मंगळवारी (ता. २३) मतमोजणी होऊन निकाल जाहीर होईल.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com