मतदानाचा टक्का घसरल्याने उमेदवार चिंतेत

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात राज्यातील सात मतदारसंघात अपेक्षित मतदान न झाल्याने उमेदवार चिंताग्रस्त आहेत. उन्हाचा कडाका आणि मतदारांचा निरुत्साह यामुळे २०१४ च्या निवडणुकीच्या तुलनेत कमी मतदान झाल्याचे बोलले जाते. वर्धा, नागपूर, भंडारा-गोंदिया या तीन लोकसभा मतदारसंघात तीन ते चार टक्क्यांनी कमी मतदान झाल्याने सत्ताधाऱ्यांच्या गोटात अस्वस्थता आहे.

वर्धा, रामटेक, नागपूर, भंडारा-गोंदिया, गडचिरोली-चिमूर, चंद्रपूर आणि यवतमाळ-वाशीम लोकसभा मतदारसंघासाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. गडचिरोली-चिमूर वगळता सहाही मतदारसंघांतील विधानसभा मतदारसंघनिहाय मतदानाची आकडेवारी प्राप्त झाली आहे. निवडणूक आयोगाने पहिल्या टप्प्यात सरासरी ६० ते ६२ टक्के मतदानाचा अंदाज वर्तवला आहे. गडचिरोली-चिमूरमध्ये झालेल्या मतदानाची आकडेवारी उपलब्ध झालेली नाही. ही आकडेवारी प्राप्त झाल्यानंतर मतदानाचे चित्र स्पष्ट होईल. तथापि २०१४ च्या निवडणुकीत येथे सरासरी ६३.७१ टक्के मतदान झाले होते. हे लक्षात घेता यंदाच्या निवडणुकीत कोणतीही लाट नसल्याचे स्पष्ट दिसते.

लोकसभा निवडणुकीत मतदानाचा टक्का वाढावा, प्रत्येक मतदाराने मतदानाचे कर्तव्य पार पाडावे यासाठी निवडणूक आयोगाकडून जनजागृती मोहीम राबविण्यात आली होती. शहरी आणि ग्रामीण भागात विविध उपक्रम घेऊन मतदारांमध्ये जागृती करण्यात आली होती. तरीही या वेळी मतदानाची टक्केवारी अपेक्षेप्रमाणे वाढली नाही. 

उन्हाच्या झळा आणि मतदारांमधील उदासीनता यामुळे कमी मतदान झाल्याचे बोलले जाते. पहिल्या टप्प्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजप अध्यक्ष अमित शहा, काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आदींनी सभा घेऊन मतदारांना मतदान करण्याचे आवाहन केले होते. तरीही मतदार मोठ्या प्रमाणात मतदानासाठी बाहेर पडले नसल्याचे दिसते.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com