राज्यसभेच्या निवडणुकीसाठी २६ मार्चला मतदान

Voting for Rajya Sabha elections on March 7
Voting for Rajya Sabha elections on March 7

मुंबई ः राज्यसभेच्या ५५ जागांसाठी येत्या २६ मार्च रोजी मतदान होणार आहे. भारत निवडणूक आयोगाने मंगळवारी (ता. २५) राज्यसभेच्या द्वैवार्षिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला. राज्यसभेच्या निवडणुका घोषित झाल्याने राजकीय हालचालींना वेग आला आहे.

देशातील १७ राज्यांतून राज्यसभेवर निवडून गेलेल्या ५५ सदस्यांची मुदत एप्रिल महिन्यात संपत आहे. यात महाराष्ट्रातील सात सदस्यांचा समावेश आहे. महाराष्ट्रातील सदस्यांची मुदत २ एप्रिल २०२० रोजी संपुष्टात येत आहे. राज्यसभेसाठी खुले मतदान असल्याने राज्यसभेची निवडणूक बिनविरोध होण्याची दाट शक्यता आहे.

राज्यात शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने एकत्र येत महाराष्ट्र विकास आघाडी स्थापन केल्याने राजकीय समीकरण बदलले आहे. राज्यसभेवर निवडून येण्यासाठी पहिल्या पसंतीची ३७ मते आवश्यक आहेत. विधानसभेत आघाडीचे १७० तर भाजप आणि मित्र पक्षाचे ११४ असे संख्याबळ आहे. चार सदस्य तटस्थ आहेत. विधानसभेतील आघाडीचे आणि भाजपचे संख्याबळ लक्षात घेता आघाडीचे चार तर भाजपचे तीन उमेदवार राज्यसभेवर निवडून जाऊ शकतात. परंतु, आघाडीतील तीन पक्षात अजून जागांचे वाटप झालेले नाही. तथापि, राष्ट्रवादी दोन तर काँग्रेस आणि शिवसेना प्रत्येकी एक जागा लढू शकते.

राज्यसभेतून निवृत्त होणारे सदस्य राष्ट्रवादी काँग्रेस : शरद पवार, माजिद मेमन, काँग्रेस : हुसेन दलवाई, शिवसेना : राजकुमार धूत, भाजप : अमर साबळे, आरपीआय : रामदास आठवले, अपक्ष : संजय काकडे

राज्यसभेचे संभाव्य उमेदवार  राष्ट्रवादी काँग्रेस : शरद पवार भाजप : रामदास आठवले, उदयनराजे भोसले काँग्रेस : हुसेन दलवाई, अविनाश पांडे, मुकुल वासनिक, राजीव सातव शिवसेना : अनंत गीते, चंद्रकांत खैरे, प्रियांका चतुर्वेदी

निवडणुकीचा कार्यक्रम
६ मार्च अधिसूचना जारी होणार
१३ मार्च अर्ज दाखल करण्याची शेवटची मुदत
१६ मार्च उमेदवारी अर्जांची छाननी
१८ मार्च अर्ज माघारीची अंतिम मुदत
२६ मार्च मतदान आणि मतमोजणी

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com