झेडपी, पंचायत समित्यांसाठी अकोला, वाशीम जिल्ह्यात आज मतदान

झेडपी, पंचायत समित्यांसाठी अकोला, वाशीम जिल्ह्यात आज मतदान
झेडपी, पंचायत समित्यांसाठी अकोला, वाशीम जिल्ह्यात आज मतदान

अकोला ः जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीअंतर्गत मंगळवारी (ता. ७) अकोला तसेच वाशीम जिल्ह्यात मतदान होणार आहे. या निवडणुकीसाठी रविवारी (ता. ५) प्रचार तोफा थंडावल्या असून आता सर्वांच्या नजरा मतदान किती होते व निकाल कसे लागतात याकडे वेधलेले आहे.  जिल्हा परिषद, पंचायत समितीची निवडणूक जाहीर झाल्यानंतर ३१ डिसेंबर पासून प्रचाराला सुरुवात झाली होती. रविवारी हा प्रचार थंडावला. या वेळी दोन्ही जिल्ह्यांत अत्यंत चुरशीच्या लढती होत आहेत. भाजप, शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, वंचित बहुजन आघाडी या प्रमुख पाच पक्षांसाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची झालेली आहे. अकोला जिल्ह्यात मागील दहा वर्षांपासून सत्तेत असलेल्या वंचितला आपले स्थान टिकविण्यासाठी मोठी कसरत करावी लागत आहे. या वेळी भाजप पूर्ण ताकदीने या निवडणुकीत उतरला. केंद्रीय राज्यमंत्री, माजी मुख्यमंत्री, भाजपचे विविध ठिकाणचे आमदार या प्रचारात सक्रिय होते. शेवटपर्यंत महाविकास आघाडीची शक्यता बाळगून असलेल्या कार्यकर्त्यांना नेत्यांच्या आग्रहामुळे स्वतंत्रपणे लढावे लागले. शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांमध्ये ठिकठिकाणी मैत्रीपूर्ण लढती होणार आहेत. याशिवाय पक्षांनी उमेदवारी न दिलेले दिग्गजही निवडणुकीच्या रिंगणात आहेत. अकोला जिल्ह्यात ५३ जिल्हा परिषद गट आणि १०६ पंचायत समिती गणांसाठी तर वाशीम जिल्ह्यात ५२ गट व १०४ गणांसाठी मतदान होणार आहे. या निवडणुकीत विकासाच्या मुद्यांपेक्षा जातीय समीकरणांवर सर्वांनी जोर दिला. संबंधित गट, गणात ज्या जातींचे प्राबल्य आहे, उमेदवाराला पाठबळ मिळेल, आर्थिक बाजू प्रमुख बाबींकडे लक्ष देत तिकिटे वाटण्यात आली. पक्षांच्या या समीकरणांना मतदार किती पाठबळ देतात हे बुधवारी (ता. ८) मतमोजणीतून बाहेर येणार आहे. मतदानासाठी प्रशासनाने पगारी सुटी जाहीर केली तर शाळा दोन दिवस बंद ठेवण्यात आल्या. मतपेट्या घेऊन अधिकारी गावागावांत दाखल झालेले आहेत. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com