सहा जिल्ह्यांमधील मतदान यंत्रे बदलणार

मतदान यंत्र
मतदान यंत्र

नगर : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यासाठी नव्याने ईव्हीएम व व्हीव्हीपॅट यंत्रे येणार आहेत. शुक्रवारी (ता. १५) जिल्हा निवडणूक शाखेने हैदराबाद येथून ही यंत्रे आणून दहा दिवसांत त्यांची प्राथमिक तपासणी प्रक्रिया पूर्ण करावी, असे अादेश केंद्रीय निवडणूक आयोगाने काढला आहे. त्यामुळे यापूर्वी बंगळूर येथून अाणलेली आणि तपासणी प्रक्रिया पूर्ण झालेली यंत्रे दुसऱ्या जिल्ह्यांना देण्यात येणार आहेत.  या प्रकारामुळे मात्र जिल्हा निवडणूक शाखेचा मनस्ताप वाढणार आहे. नगर, सातारा, सांगली, कोल्हापूर, ठाणे आणि सोलापूर या जिल्ह्यांना नवीन यंत्रे येणार आहेत. पूर्वीची यंत्रे शेजारच्या जिल्ह्यांना दिला जाणार आहेत. मतदान यंत्रे का बदलली जात आहेत, याची कारणे मात्र सांगितली जात नाहीत. केंद्रीय निवडणूक आयोगाकडून गुरुवारी (ता.७) जिल्हा निवडणूक शाखेला मतदान यंत्रे बदलण्याबाबतचा आदेश प्राप्त झाला. मतदान यंत्रे आणण्यासाठी जिल्हा निवडणूक शाखेचे पाच अधिकारी, कर्मचारी व १५ पोलिस कर्मचाऱ्यांचे पथक लवकरच हैदराबादला जाणार आहे. पंधरा गाड्यांमधून ही यंत्रे जिल्ह्यात येतील. दहा दिवसांत त्यांची प्राथमिक तपासणी करायची आहे.  ऑगस्ट २०१८ च्या अखेरीस बंगळूर येथून आठ हजार २० बॅलेट युनिट (बीयू), चार हजार ६६३ कंट्रोल युनिट (सीयू), चार हजार ६६३ यंत्रे येथील निवडणूक शाखेकडे आली. त्या यंत्रांची जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी, उपजिल्हा निवडणूक अधिकारी अरुण आनंदकर यांच्या मार्गदर्शनाखाली तपासणी करण्यात आली. सहा महिन्यांच्या कालावधीत सुमारे ५० लाखांचा खर्च त्यावर झाला. बेल (भारत इलेक्‍ट्रॉनिक लिमिटेड) कंपनीचे तंत्रज्ञ व निवडणूक शाखेचे कर्मचारी अडीच महिन्यांपासून या प्रक्रियेसाठी तैनात होते. विधानसभा मतदारसंघनिहाय प्रात्यक्षिक दाखवण्यासाठी दोन यंत्रे देण्यात आली. नव्याने येणाऱ्या मशिन इलेक्‍ट्रॉनिक कॉर्पोरेशन इंडिया लिमिटेड कंपनीच्या आहेत.  प्रशासनाचा ताण वाढणार मतदान यंत्रबाबतच्या शंकाचे निरसण करण्यासाठी गेल्या दोन महिन्यांपासून गावागावांत जाऊन लोकांना त्याच प्रात्यक्षिके दाखवली गेली. मात्र आता प्रात्यक्षिके दाखवलेली मतदान यंत्रे बदलणार असून नव्याने आलेल्या मतदान यंत्राचेही प्रात्यक्षिके करावी लागणार आहेत. त्यामुळे प्रशासनाचा ताण पुन्हा वाढणार आहे. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com