ऊसभुषण : २०१७-१८
रविवार, 16 डिसेंबर 2018मांजरी, जि.पुणे : येथे वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट अर्थात व्हीएसआयच्या ४२ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत वसंतदादा साखऱ संस्थेच्या (व्हिएसआय) वती वार्षिक पारितोषिक वितरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आणि संस्थेचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत झाले. यावेळी २०१७-१८ या वर्षचा यशवंतराव चव्हाण (पूर्व हंगामी राज्यात पहिला) राज्यस्तरीय ऊस भूषण चवगोंडा पाटील (दानोळी,ता.शिरोळ, कोल्हापुर) यांना प्रदान करण्यात आला. कै.
मांजरी, जि.पुणे : येथे वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट अर्थात व्हीएसआयच्या ४२ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत वसंतदादा साखऱ संस्थेच्या (व्हिएसआय) वती वार्षिक पारितोषिक वितरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आणि संस्थेचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत झाले. यावेळी २०१७-१८ या वर्षचा यशवंतराव चव्हाण (पूर्व हंगामी राज्यात पहिला) राज्यस्तरीय ऊस भूषण चवगोंडा पाटील (दानोळी,ता.शिरोळ, कोल्हापुर) यांना प्रदान करण्यात आला. कै. वसंतराव नाईक (सुरु हंगाम राज्यात पहिला) राज्यस्तरीय ऊस भूषण पुरस्कार सौरभ विनयकुमार कोकीळ (धामणेर, ता.कोरेगाव, सातारा) यांना प्रदान करण्यात आला.या वर्षीचा कै. आण्णासाहेब शिंदे (खोडवा, हंगाम राज्यात पहिला) राज्यस्तरीय ऊस भूषण पुरस्कार मारुती ज्ञानु शिंदे (वाठार, ता.हातकणंगले, कोल्हापुर) यांना प्रदान करण्यात आला. कै. वसंतदादा पाटील सर्वोत्कृष्ट साखऱ कारखाना पुरस्कार रेणा सहकारी साखऱ कारखाना (रेणापूर, जि. लातूर) यांना प्रदान करण्यात आला.