Agriculture news in marathi; Wadding shopping started in Sindhudurg district | Page 2 ||| Agrowon

सिंधुदुर्ग जिल्ह्यात वावडिंग खरेदी सुरू

टीम अॅग्रोवन
रविवार, 20 ऑक्टोबर 2019

सिंधुदुर्ग  ः बहुउपयोगी वावडिंग खरेदीला जिल्ह्यात प्रारंभ झाला आहे. सध्या प्रतिकिलो ४५० रुपये दर मिळत असल्यामुळे लोकदेखील जंगलांत जाऊन वावडिंग गोळा करण्यात गुंतल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. सुकलेली आणि ओली अशा दोन्ही प्रकारची वावडिंग वेगवेगळे दर देऊन आठवडे बाजारात खरेदी केली जात आहेत.

सिंधुदुर्ग  ः बहुउपयोगी वावडिंग खरेदीला जिल्ह्यात प्रारंभ झाला आहे. सध्या प्रतिकिलो ४५० रुपये दर मिळत असल्यामुळे लोकदेखील जंगलांत जाऊन वावडिंग गोळा करण्यात गुंतल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. सुकलेली आणि ओली अशा दोन्ही प्रकारची वावडिंग वेगवेगळे दर देऊन आठवडे बाजारात खरेदी केली जात आहेत.

बहुउपयोगी असलेले वावडिंग सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सह्याद्री पट्ट्यात मोठ्या प्रमाणात आढळून येते. जंगली वनस्पती म्हणून वावडिंगाकडे पाहिले जाते. साधारणपणे एक वर्ष आड या झाडांना फळधारणा होते. या वर्षी वावडिंगाच्या झाडांना चांगली फळधारणा झाली आहे. या वावडिंग फळांच्या खरेदी हंगामाला जिल्ह्यात सुरुवात झाली आहे. विविध आठवडे बाजारात व्यापारी सुकलेली आणि ओली अशी दोन्ही प्रकारची वावडिंग खरेदी करीत आहेत. सुकवलेल्या वावडिंगाला साधारणपणे प्रतिकिलो ४५० रुपये; तर ओल्या वावडिंगाला प्रतिकिलो १०० रुपये प्रतिकिलो दर व्यापाऱ्यांकडून दिला जात आहे.

काट्याकुट्यात वावडिंगाला ही वनस्पती आढळून येते. वावडिंगाचे झाड स्वतंत्र असले तर त्यांची उंची सहा ते सात फूट असते; परंतु ते एखाद्या इतर झाडाच्या मुळात असेल तर त्यांची उंची पंधरा ते वीस फूटदेखील असते. मात्र अशा झाडांना फळधारणा कमी होते असा वावडिंग विक्री करणाऱ्या लोकांचा अनुभव आहे. 


इतर ताज्या घडामोडी
वीजबिल माफ करा, अन्यथा असहकार आंदोलन ः...बुलडाणा ः कोरोनामुळे सुरू असलेल्या लॉकडाउनमुळे...
बुलडाणा, वाशीम जिल्ह्यात जोरदार पाऊसअकोला ः गेल्या २४ तासांपासून वऱ्हाडात पावसाची झड...
नांदुरा तालुक्यातील ‘त्या’ कृषी...बुलडाणा ः या हंगामात चार शेतकऱ्यांच्या नावावर...
रत्नागिरी जिल्ह्यात मुसळधार पावसाची...रत्नागिरी ः संततधार पावसाने सोमवारी (ता. १०)...
उडीद पिकावर किडींचा हल्लाबोलरोपळे बुद्रूक, जि. सोलापूर : जिल्ह्यात सततच्या...
कीटकनाशकांवरील बंदीचे लिंबूवर्गीय...लिंबूवर्गीय फळबागांमध्ये येणाऱ्या बहुतांश किडी व...
भाज्यांमध्ये ‘३ जी कटिंग’ पद्धतीने अधिक...वनस्पतीच्या तिसऱ्या पिढीतील शाखेपासून रोपे...
जळगावात आले २८०० ते ४२०० रुपये...जळगाव : कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मंगळवारी (...
सार्वजनिक पैदास कार्यक्रमांचे प्रमाण...फळपिकातील नव्या जातींच्या पैदास कार्यक्रमांचे...
नगरमध्ये पीककर्ज वितरणात जिल्हा बॅंकच...नगर ः नगर जिल्ह्यात खरीप हंगामात आत्तापर्यंत खरीप...
`रानभाज्या खा, रोगप्रतिकार शक्ती वाढवा`सोलापूर : माहिती असलेल्या पालेभाज्या, फळभाज्या...
वेळीच ओळखा टोमॅटोमधील विकृतीभाजीपाला पिके ही अन्य पिकांच्या तुलनेत नाजूक...
गिरणा नदीवरील बलून बंधारे प्रकल्पाला...जळगाव  : केंद्र सरकारचा प्रायोगीक प्रकल्प...
परभणी जिल्ह्यात ऊस लागवडीत दुपटीने वाढपरभणी  ः जिल्ह्यात सन २०१९-२० मध्ये ३० हजार...
सहकारी साखर कारखान्यांनी रुग्णालय...कऱ्हाड, जि. सातारा : कोरोनाचे संकट हे अख्या जगावर...
शेतीच्या डेटा विज्ञानाबाबत जागृकतेची...परभणी :  डेटा विज्ञान तसेच कृत्रिम...
कृषी सल्ला (कोकण विभाग)हवामान अंदाज ः मुंबई येथील प्रादेशिक हवामान...
सांगलीत डाळिंब उत्पादक पीकविम्याच्या...सांगली : जिल्ह्यात पाच मंडळांत अतिपावसाने...
खानदेशातील अनेक भागात तुरळक पाऊसजळगाव  ः जिल्ह्यात रविवारी (ता.९) अनेक भागात...
रानभाज्यांकडे नागरिकांचा वाढता कलयवतमाळ : जिल्ह्याच्या डोंगररांगा व शेतशिवारात...