agriculture news in Marathi, Wagdardi dam overlow after four years, Maharashtra | Agrowon

नाशिक जिल्ह्यातील वागदर्डी धरण चार वर्षांनंतर 'ओव्हरफ्लो'
टीम अॅग्रोवन
शनिवार, 12 ऑक्टोबर 2019

नाशिक : मागील महिन्यापासून होत असलेल्या पावसामुळे तब्बल ४ वर्षांनंतर वागदर्डी धरण ओव्हरफ्लो झाले असून, पाणीटंचाईने त्रस्त झालेल्या धरण परिसरातील नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. त्यामुळे चालू वर्षी शेतकरी व स्थानिक नागरिकांचा पाण्याचा प्रश्‍न सुटणार आहे.

नाशिक : मागील महिन्यापासून होत असलेल्या पावसामुळे तब्बल ४ वर्षांनंतर वागदर्डी धरण ओव्हरफ्लो झाले असून, पाणीटंचाईने त्रस्त झालेल्या धरण परिसरातील नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. त्यामुळे चालू वर्षी शेतकरी व स्थानिक नागरिकांचा पाण्याचा प्रश्‍न सुटणार आहे.

मनमाड शहराला पाणीटंचाईचा सामना दरवर्षी करावा लागतो. शहरातील नागरिकांना कधी ८ तर कधी २० दिवसांनंतर पाणी मिळते. गेल्या उन्हाळ्यात तर धरण कोरडे पडल्यामुळे टँकरने पाणीपुरवठा करण्याची वेळ पालिका प्रशासनावर आली होती. मात्र, यंदा पावसामुळे धरण पूर्ण भरून ओव्हरफ्लो झाले. याआधी २०१५ मध्ये धरण पूर्ण भरले. त्यानंतर तब्बल ४ वर्षांनंतर धरण ओव्हरफ्लो झाले आहे. मात्र, आता धरण भरल्याने मनमाडकरांनी सुटकेचा नि:श्वास सोडला आहे. तसेच, आता खरिपानंतर रब्बीसाठी पिकांना मोठा आधार होणार आहे, त्यामुळे येथील शेतकरीसुद्धा सुखावला आहे.

जिल्हाभर पावसाने सर्वत्र दमदार हजेरी लावल्यामुळे जवळपास सर्वच छोटे-मोठे बंधारे व धरणे तुडुंब भरली. तर दुसरीकडे मात्र मनमाड शहराला पाणीपुरवठा करणाऱ्‍या वागदर्डी धरणाच्या पाणलोटक्षेत्रात दमदार पाऊस न झाल्यामुळे धरणात पाणी पाहिजे तेवढे पाणी आले नव्हते. मात्र, झालेल्या पावसाने सलग जोरदार हजेरी लावल्यामुळे वागदर्डी धरण केवळ पूर्ण क्षमतेने भरून ओव्हरफ्लो होऊन झाले आहे. धरणाच्या सांडव्यावरून मोठ्या प्रमाणात विसर्ग होत असून आहे.

इतर ताज्या घडामोडी
नगर जिल्ह्यात उडदाचे उत्पादन यंदा ७०...नगर  ः जिल्ह्यात यंदा उडदाची उत्पादकता...
पीक उत्पादन खर्च कमी करून उत्पन्न...पुणे  ः  कृषी विद्यापीठांकडून शेतकरी...
दुष्काळी स्थितीत आश्‍वासक ठरणारे ‘...सध्याच्या दुष्काळी स्थितीत वा बदलत्या हवामानात...
महाराष्ट्र दुष्काळमुक्त करणार ः...मुंबई : आगामी पाच वर्षांत महाराष्ट्र दुष्काळमुक्त...
आम्ही सत्तेत आल्यास चार महिन्यांत...वणी, जि. यवतमाळ  ः शेतकऱ्यांना कर्जमाफी...
नाशिकमध्ये वांगी २७०० ते ५००० रुपये...नाशिक : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
बहुगुणी अन्‌ बहुपयोगी जवस जवसाच्या बियांचा वापर खाद्य तेल आणि औद्योगिक...
नंदुरबार जिल्ह्यात पीक काढणी वेगातनंदुरबार  : जिल्ह्यात खरिपाच्या हंगामातील...
राज्यात साडेचार हजार सावकार अनधिकृतपुणे : शेतकरी आत्महत्येच्या समस्येवर प्रभावी उपाय...
सोयाबीन सुडी पेटविण्याच्या घटनांमध्ये...बुलडाणा  ः वैयक्तिक मतभेद, आपापसातील वाद आदी...
बिगर नोंदणीकृत उत्पादनासाठी हवा कायदा...सध्या खते, कीटकनाशके उत्पादन व विक्रीसाठी दोन...
आपल्या मताची किंमत दाखवून देण्याची वेळ...शेती, शेतकऱ्यांचे प्रश्न आणि निवडणूक या विषयांचा...
भिवापूर येथे सोयाबीन खरेदीला सुरवातभिवापूर, नागपूर  : येथील कृषी उत्पन्न बाजार...
महायुतीत आमची अवस्था इकडे आड तिकडे...नाशिक  : ‘‘महायुतीच्या जागावाटपात नाराज असलो...
निवडणुकीत शेतकरी प्रश्न शोधावे लागतात...निवडणुकांतून शेतकरी सोडून सारे राजकीय घटक...
जळगाव बाजार समितीत धान्याचे लिलाव बंदचजळगाव  ः जिल्ह्यातील सर्वांत मोठ्या व...
बाजार सुधारणांपासून शेतकरी वंचितचशेतकरी आणि शेतीमालाला शोषित बाजार व्यवस्थेच्या...
कांदा खरेदी-विक्रीच्या व्यवहारांवर...धुळे  ः खानदेशात कांद्यासाठी प्रसिद्ध...
ग्रामविकासासाठी स्वतंत्र निधी, पाणी...महाराष्‍ट्रातील २८ हजार ग्रामपंचायतीपैकी २३ हजार...
मंडणगड : जंगली श्वापदांकडून भातशेतीचे...मंडणगड, जि. रत्नागिरी : शेतात तयार झालेल्या...