agriculture news in marathi, The wages of the 'Roho' laborers in tears of tears were tired | Agrowon

मंगळवेढ्यातील 'रोहयो' मजुरांचे वेतन थकले
टीम अॅग्रोवन
शनिवार, 1 डिसेंबर 2018

दुष्काळी परिस्थितीत मजुरांचे वेतन वेळेत मिळाले पाहिजे. प्रशासनाच्या उदासीन धोरणाचा फटका आमच्यासह मजुरांना बसला.
 - सुनील शिंदे, अध्यक्ष, ग्रामरोजगार सेवक संघटना

जिल्ह्यातील कामांचे मजुरांचे वेतन करण्याबाबत एफटीओ नागपूर कार्यालयास यापूर्वीच कळविले आहे. तिथून मजुरांचे वेतन ई-एफएस प्रणालीद्वारे थेट बँक खात्यात जमा होईल.
              -प्रसन्ना जाधव, समन्वयक, रोहयो विभाग

सोलापूर : महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेच्या कामावरील मजुरांचे वेतन १५ दिवसांच्या आत देण्याचा नियम आहे. मात्र मंगळवेढ्यातील मजुरांना तब्बल महिन्यापेक्षा अधिक कालावधी होऊनही मजुरीचे वेतन मिळाले नाही. त्यामुळे दुष्काळात मजुरांना काम उपलब्ध करून देण्याबाबत प्रशासनाची उदासीनता पहिल्या महिन्यातच दिसून येत आहे.

याबाबत महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेतून तालुक्यात पंचायत, कृषी, सामाजिक वनीकरण खात्यातर्फे कामे सुरू आहेत. पंचायत समितीतर्फे घरकुल, तर कृषी विभागातर्फे फळबाग, शेततळ्यांची कामे करण्यात येत आहेत. सामाजिक वनीकरण विभागाने रस्त्याच्या कडेला दुतर्फा वृक्ष लागवड केली.

त्यासाठी काम केलेल्या मजुरांचे वेतन हे हजरीपत्रक भरल्यानंतर पंधराव्या दिवशी थेट बँक खात्यावर जमा करणे आवश्यक आहे, परंतु अद्यापही ते जमा झालेले नाही. पंचायत समिती, कृषी विभाग, जिल्हाधिकारी कार्यालयाने नागपूरच्या कार्यालयाला कळवूनही अजूनही १ आॅक्टोबरपासूनचे वेतन बँक खात्यावर जमा नाही.

इतर ताज्या घडामोडी
सुप्रसिद्ध पैलवान दादू चौगुले यांचे निधनकोल्हापूर : हिंदकेसरी, रुस्तुम ए हिंद, महाराष्ट्र...
उजनी धरणातून भीमा नदीत पुन्हा ३० हजार...सोलापूर  ः पुणे जिल्ह्यात पावसाने पुन्हा...
राजापूर, रत्नागिरी, संगमेश्‍वर...रत्नागिरी  ः राजापूर, रत्नागिरीसह संगमेश्‍वर...
कापूस उत्पादकता वाढीसाठी शासनाने...अकोला : महाराष्ट्रात कापूस लागवड क्षेत्र...
पुणे जिल्हयात हलक्या ते मध्यम पावसाची...पुणे : गेल्या दोन दिवसांपासून पावसासाठी पोषक...
मंगळ, चंद्रसदृश मातीमध्ये पिकांचे...नासा या अमेरिकन अवकाश संशोधन संस्थेने चंद्र आणि...
पुणे जिल्ह्यात तीन लाख हेक्टरवर रब्बी...पुणे : मॉन्सूनच्या अंतिम टप्प्यातील पावसाने...
नगर जिल्हा परिषदेमध्ये दूरध्वनीवरील...नगर  : पाणी येत नाही. शिक्षक शाळेत उशिरा...
विधानसभा निवडणुकीसाठी प्रचारतोफा...मुंबई : चौदाव्या विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी...
घाटशीळ पारगाव प्रकल्प कोरडानगर : जिल्ह्यात यंदा पावसाळा संपत आला तरी अजून...
उमेदवारी देऊन केलेली चूक सुधारा : पवारसातारा : ‘‘वरुणराजानेही आपल्याला आशीर्वाद दिले...
काकडा परिसरात सोयाबीन काढणीच्या...काकडा, अमरावती ः परिसरात सोयाबीन...
अकोला येथे पावसाळी वातावरणाने...अकोला ः गेल्या २४ तासांपासून या भागात...
सिंधुदुर्ग जिल्ह्यात वावडिंग खरेदी सुरू सिंधुदुर्ग  ः बहुउपयोगी वावडिंग खरेदीला...
पट्टणकोडोलीला ‘इट्टल-बिरोबाच्या नावानं...पट्टणकोडोली, जि. कोल्हापूर  : ‘इट्टल-...
विश्रांतीनंतर सोलापुरात पुन्हा सर्वदूर...सोलापूर  ः गेल्या काही दिवसांच्या...
शेतकरी, जनतेच्या प्रश्नांची उत्तरे...नगर  : राज्यात पाच वर्षांत १६ हजार शेतकरी...
महायुतीला ऐतिहासिक विजय मिळेल ः...मुंबई ः केंद्र आणि महाराष्ट्रातील भाजप-शिवसेना...
आपण विजयाचा जल्लोष साजरा करू ः...नागपूर : मतदानाचा दिवस युद्धदिन समजून...
भाजप-शिवसेनेने पाच वर्षे  फक्त थापा...मुंबई : पाच वर्षे ज्यांनी विविध आश्वासने...