वाघूर ६०, गिरणा ८४ टक्के भरले

वाघूर ६०, गिरणा ८४ टक्के भरले
वाघूर ६०, गिरणा ८४ टक्के भरले

जळगाव  ः चाळीसगाव (जि. जळगाव) नजीकचे गिरणा ८४ टक्के, तर जामनेर (जि.जळगाव) येथील वाघूर धरण ६० टक्के भरले आहे. या प्रकल्पांमध्ये पाण्याची आवक कमी वेगात सुरू आहे. लाभक्षेत्रात जोरदार पाऊस झाल्यास गिरणा धरणातील साठा मोठ्या प्रमाणात वाढू शकतो, अशी स्थिती आहे.  मागील दोन दिवस खानदेशात अनेक भागांत भीज व मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला आहे. नद्या, नाल्यांना प्रवाही पाणी आले असून, प्रकल्पांमधील साठाही वाढत आहे. गिरणा धरण जळगावसाठी महत्त्वाचे आहे. सुमारे २१ हजार हेक्‍टर क्षेत्रावर रब्बी पिकांच्या सिंचनासाठी या धरणाच्या पाण्याचा आधार होतो. मागील वर्षी हे धरण ४७ टक्केच भरले होते. यामुळे रब्बीसाठी आवर्तन कुठेही मिळू शकले नव्हते. यंदा धरणातील साठा ८४ टक्‍क्‍यांपर्यंत पोचल्याने रब्बीसाठी आवर्तन मिळण्याची अपेक्षा वाढली आहे. तसेच लाभक्षेत्रात जोरदार पाऊस झाला तर गिरणा धरण अनेक वर्षानंतर १०० टक्‍के भरू शकते, असा विश्‍वासही वाढला आहे. कारण पावसाचे अधिकृतपणे २१ दिवस अद्याप राहिले आहेत.  जळगाव जिल्ह्याच्या पश्‍चिम भागातील बोरी प्रकल्प अनेक वर्षानंतर १०० टक्के भरला आहे. तर अंजनी, हिवरा, बहुळामध्येही जलसाठा वाढला आहे. पण या भागातील अग्नावती, मन्याड व भोकरबारी या प्रकल्पात मृतसाठ्यापेक्षा कमी साठा आहे.  विविध प्रकल्पांमधील जलसाठ्याची टक्केवारी ः जळगाव ः गिरणा ८४, वाघूर ६०, मोर ९१.१४, हिवरा ३३.५९, अंजनी ३१.९०, बगुळा ७६.६०, गूळ ७२.१०. धुळे - अमरावती ९५.७५, कनोली ५१.७६. नंदुरबार- शिवन ९४.४३. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com