Agriculture news in marathi; Waghur 60, girana 84 per cent full | Page 2 ||| Agrowon

वाघूर ६०, गिरणा ८४ टक्के भरले
टीम अॅग्रोवन
मंगळवार, 10 सप्टेंबर 2019

जळगाव  ः चाळीसगाव (जि. जळगाव) नजीकचे गिरणा ८४ टक्के, तर जामनेर (जि.जळगाव) येथील वाघूर धरण ६० टक्के भरले आहे. या प्रकल्पांमध्ये पाण्याची आवक कमी वेगात सुरू आहे. लाभक्षेत्रात जोरदार पाऊस झाल्यास गिरणा धरणातील साठा मोठ्या प्रमाणात वाढू शकतो, अशी स्थिती आहे.

जळगाव  ः चाळीसगाव (जि. जळगाव) नजीकचे गिरणा ८४ टक्के, तर जामनेर (जि.जळगाव) येथील वाघूर धरण ६० टक्के भरले आहे. या प्रकल्पांमध्ये पाण्याची आवक कमी वेगात सुरू आहे. लाभक्षेत्रात जोरदार पाऊस झाल्यास गिरणा धरणातील साठा मोठ्या प्रमाणात वाढू शकतो, अशी स्थिती आहे.

 मागील दोन दिवस खानदेशात अनेक भागांत भीज व मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला आहे. नद्या, नाल्यांना प्रवाही पाणी आले असून, प्रकल्पांमधील साठाही वाढत आहे. गिरणा धरण जळगावसाठी महत्त्वाचे आहे. सुमारे २१ हजार हेक्‍टर क्षेत्रावर रब्बी पिकांच्या सिंचनासाठी या धरणाच्या पाण्याचा आधार होतो. मागील वर्षी हे धरण ४७ टक्केच भरले होते. यामुळे रब्बीसाठी आवर्तन कुठेही मिळू शकले नव्हते. यंदा धरणातील साठा ८४ टक्‍क्‍यांपर्यंत पोचल्याने रब्बीसाठी आवर्तन मिळण्याची अपेक्षा वाढली आहे. तसेच लाभक्षेत्रात जोरदार पाऊस झाला तर गिरणा धरण अनेक वर्षानंतर १०० टक्‍के भरू शकते, असा विश्‍वासही वाढला आहे. कारण पावसाचे अधिकृतपणे २१ दिवस अद्याप राहिले आहेत. 

जळगाव जिल्ह्याच्या पश्‍चिम भागातील बोरी प्रकल्प अनेक वर्षानंतर १०० टक्के भरला आहे. तर अंजनी, हिवरा, बहुळामध्येही जलसाठा वाढला आहे. पण या भागातील अग्नावती, मन्याड व भोकरबारी या प्रकल्पात मृतसाठ्यापेक्षा कमी साठा आहे. 

विविध प्रकल्पांमधील जलसाठ्याची टक्केवारी ः जळगाव ः गिरणा ८४, वाघूर ६०, मोर ९१.१४, हिवरा ३३.५९, अंजनी ३१.९०, बगुळा ७६.६०, गूळ ७२.१०. धुळे - अमरावती ९५.७५, कनोली ५१.७६. नंदुरबार- शिवन ९४.४३. 

इतर बातम्या
साताऱ्यातील तीन तालुक्यांत पाणीटंचाई...सातारा : गेल्या दोन दिवसांत माण, खटाव, फलटण या...
चाळीसगाव तालुक्‍यात अद्यापही टॅंकर सुरूचजळगाव  ः जिल्ह्यात यंदा पावसाने नाबाद ११५.५...
पुणे जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे ४२ कोटींचे...पुणे : गेल्या जुलै व ऑगस्ट महिन्यांत...
नाशिक जिल्ह्यात लाल कांद्याची लागवड...नाशिक  : महाराष्ट्रात होणारी खरीप कांद्याची...
मराठवाड्यात २७१ मंडळांमध्ये बरसला पाऊसऔरंगाबाद, नांदेड : मराठवाड्यातील आठ जिल्ह्यांतील...
सरपंच ग्रामसंसद महासंघाच्या...अकोला  ः शेगाव येथे नुकत्याच झालेल्या राज्य...
सातारा जिल्ह्यातील चार साखर...सातारा  : गाळप हंगामातील ऊस उत्पादकांची...
‘आदिनाथ'च्या कामगारांचे पगारासाठी ‘...सोलापूर : आदिनाथ साखर कारखान्याकडून ४१ महिने...
उजनी कालवा फुटला, पिके उद्‌ध्वस्तमोहोळ, जि. सोलापूर : उजनी धरणाचा डावा कालवा मोहोळ...
आधुनिक तंत्रांचा वापर करून स्मार्ट शेती...अकोला : ऊतिसंवर्धित हळद रोपांची निर्मिती आणि...
सांगली जिल्ह्यात अजूनही ९१ टॅंकर सुरूचसांगली  ः जिल्ह्यात एप्रिल महिन्यापासूनच...
सिंधुदुर्गातील वृद्ध दाम्पत्यावर...सिंधुदुर्ग  ः पाळीव कुत्र्याला वाचविण्यासाठी...
पुणे जिल्ह्यात २१ ऑक्टोबर रोजी मतदानपुणे : ‘‘विधानसभा निवडणुकीत पुणे जिल्ह्यात शहरी...
अखेर बगाजी सागर ‘ओव्हर फ्लो’धामणगाव रेल्वे, जि. अमरावती  : अमरावती आणि...
सरकी ढेपेचे दर कडाडल्याने दूध उत्पादक...अकोला : दुधाळ जनावरांना पोषक खाद्य म्हणून खाऊ...
'स्मार्ट' मुख्यालयाला मिळाली नवी जागापुणे :  राज्याच्या स्मार्ट प्रकल्पाच्या...
सोलापूर जिल्ह्यात मका लष्करी अळीने केला...सोलापूर ः दुष्काळातही जेमतेम पाण्यावर यंदा...
लष्करी अळीपासून कपाशीला धोका नाहीः कृषी...पुणे: राज्याच्या कापूस पिकाला अमेरिकन लष्करी...
खानदेशातही कापसावर लष्करी अळीजळगाव  : खान्देशात जळगाव, धुळे जिल्ह्यांतील...
विधानसभेचा बिगुल वाजलामुंबई: चौदाव्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचे...