Agriculture news in marathi; Waghur water to give cotton to cultivate cotton: MP Unmesh Patil | Agrowon

वाघूरचे पाणी कापूस लागवडीसाठी देणार ः खासदार उन्मेष पाटील
टीम अॅग्रोवन
शनिवार, 15 जून 2019

जळगाव : वाघूर धरणातून धरण लाभक्षेत्रात शेतीसाठी आवर्तन सोडण्याबाबत प्रशासन सकारात्मक असून, उपलब्ध जलसाठा व इतर बाबी लक्षात घेऊन कापूस लागवडीसाठी या धरणाचे आवर्तन सोडण्याचे आश्‍वासन खासदार उन्मेष पाटील यांनी शेतकऱ्यांना दिले आहे.

वाघूरच्या आवर्तनाच्या मागणीसाठी जळगाव तालुक्‍यातील नशिराबादसह परिसरातील ग्रामस्थांनी गुरुवारी (ता. १३) जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषण केले. काळ्या फिती लावून ग्रामस्थ व शेतकरी दिवसभर बसून होते. या उपोषणाची दखल प्रशासन व खासदार यांनी घेतली व आश्‍वासन दिल्यानंतर हे उपोषण मागे घेण्यात आले. 

जळगाव : वाघूर धरणातून धरण लाभक्षेत्रात शेतीसाठी आवर्तन सोडण्याबाबत प्रशासन सकारात्मक असून, उपलब्ध जलसाठा व इतर बाबी लक्षात घेऊन कापूस लागवडीसाठी या धरणाचे आवर्तन सोडण्याचे आश्‍वासन खासदार उन्मेष पाटील यांनी शेतकऱ्यांना दिले आहे.

वाघूरच्या आवर्तनाच्या मागणीसाठी जळगाव तालुक्‍यातील नशिराबादसह परिसरातील ग्रामस्थांनी गुरुवारी (ता. १३) जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषण केले. काळ्या फिती लावून ग्रामस्थ व शेतकरी दिवसभर बसून होते. या उपोषणाची दखल प्रशासन व खासदार यांनी घेतली व आश्‍वासन दिल्यानंतर हे उपोषण मागे घेण्यात आले. 

गेल्या मे महिन्यात वाघूर लाभधारक समितीच्या सदस्यांनी जिल्हाधिकाऱ्यांची दोनवेळा भेट घेऊन वाघूरमधून उन्हाळी कापूस व अन्य पिकांसाठी आवर्तन सोडण्याची मागणी केली होती. पिण्यासाठी साठा आरक्षित ठेवूनही आवर्तन सोडता येऊ शकते, असे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी पाटबंधारे विभागाच्या अहवालानंतर त्याबाबत निर्णय घेण्यात येईल, असे सांगितले होते. मात्र, आवर्तन सोडण्याबाबत आधी सकारात्मक अहवाल आला, नंतर तो नकारात्मक देण्यात आल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. 

वाघूर धरण लाभधारक समिती सदस्य, पदाधिकारी व नशिराबादसह आसोदा, तरसोद, भादली व अन्य परिसरातील ग्रामस्थांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषण केले. या वेळी जिल्हा परिषद सदस्य लालचंद पाटील, पंचायत समिती सभापती यमुनाबाई रोटे, किशोर चौधरी, पंकज महाजन, राजू महाजन, राजेंद्र चौधरी, संतोष नारखेडे, तुषार महाजन यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले. 

जिल्हाधिकाऱ्यांचे पत्र 
या उपोषणानंतर समिती सदस्यांनी जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांची भेट घेऊन यासंदर्भात चर्चा केली. धरणातून पिण्यासाठी १५ जुलैपर्यंत साठा आरक्षित आहे. या राखीव पाण्याव्यतिरिक्त धरणात पाणीसाठा असेल तर पाणी सोडण्यास हरकत नाही, असे पत्र जिल्हाधिकाऱ्यांनी पाटबंधारे विभागाच्या अभियंत्यांना दिले आहे, अशी माहिती मिळाली.
 

इतर बातम्या
नांदेड, परभणी, हिंगोलीत पाऊसनांदेड : नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांतील २८...
सांगली जिल्ह्यातील ४६८ गावांमधील...सांगली  : जिल्ह्यात ४६८ गावांमधील गावठाणांचा...
यवतमाळ जिल्ह्यातील सात दुष्काळग्रस्त...यवतमाळ ः जनरेट्यामुळे दुष्काळ यादीत नव्याने...
लातूर, उस्मानाबाद, जालना, बीड...लातूर : लातूर, उस्मानाबाद, जालना आणि बीड...
अकोला जिल्ह्यात दुबार पेरणीचे संकटअकोला ः पावसाचा खंड आणि त्यातच दिवसाचे...
जलसंधारण कामासाठी जलशक्ती योजना :...वाल्हे, जि. पुणे  : राज्यात जलयुक्त...
अनधिकृत बंधारे काढण्यासाठी ‘स्वाभिमानी’...नगर  : भंडारदरा धरणापासून ते ओझर...
बचत गटांना प्रोत्साहनासाठी ‘हिरकणी...सोलापूर  : राज्याच्या औद्योगिक आणि आर्थिक...
केरळच्या धर्तीवर काजू प्रक्रिया ...रत्नागिरी  ः परदेशी चलन मिळवून देणाऱ्या काजू...
`गोकुळ` मल्टिस्टेटमुळे शेतकऱ्यांचा...मुंबई : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक...
संगमनेर तालुक्यातील लिंबू बागांना घरघर संगमनेर, जि. नगर : दर्जेदार कागदी लिंबांच्या...
दूध वाहतुकीतून रेल्वेला ६ कोटी १२ लाख...दौंड, जि. पुणे  : दौंड रेल्वे स्थानकावरून...
कृषक विकिरण केंद्रातून अमेरिका, ...नाशिक  : जिल्ह्यातील लासलगाव येथील कृषक...
आसाम, बिहारमध्ये पुराचे ११४ बळीनवी दिल्ली: आसाम आणि बिहारमध्ये पुराचे थैमान...
सौरऊर्जेमुळे शेतकऱ्यांना मुबलक वीज...कोल्हापूर ः शेतकऱ्यांना दिवसा व उद्योगांना स्वस्त...
परीक्षा शुल्क परतीचा खर्च सात लाख रुपयेयवतमाळ ः परीक्षा रद्द झाल्यानंतर उमेदवारांचे पैसे...
दुबार पेरणीसाठी सरकारची तयारीः डाॅ....पुणे: पावसाचा काही प्रमाणात खंड पडला आहे....
डोणगावात होणार खजूर लागवडअकोला ः पारंपरिक पिकांना पर्याय शोधण्यासाठी...
रक्तक्षय दूर करण्यासाठी लोहयुक्त तांदूळनाशिक : दैनंदिन आहारातून अत्यल्प प्रमाणात लोह...
असंमत बियाणे लागवडीला बोंडअळी कारणीभूत...नवी दिल्ली : देशात २०१८ मध्ये गुलाबी...