जळगाव : किसान सन्मानच्या लाभाची प्रतीक्षा

किसान सन्मानच्या लाभाची प्रतीक्षा
किसान सन्मानच्या लाभाची प्रतीक्षा

जळगाव ः शासनाकडून राबविण्यात येणाऱ्या प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेचा पहिल्या टप्प्यात  निम्म्या शेतकऱ्यांना अद्यापपर्यंत लाभ मिळालेला नाही. ही योजना केंद्राची असल्याने सत्ताधारी मंडळी दुर्लक्ष करीत आहे. शेतकरी चकरा मारीत आहे. पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या विधानसभा मतदारसंघातील धरणगाव व जळगाव तालुक्‍यातील ७० टक्के शेतकरी या योजनेच्या लाभाच्या प्रतीक्षेत आहेत. या संदर्भात पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी आढावा घ्यावा, अशी अपेक्षा शेतकरी व्यक्त करीत आहे.  चाळीसगाव तालुक्‍यात ७५ हजार शेतकऱ्यांपैकी ४५ हजार शेतकऱ्यांनाच लाभ मिळालेला आहे. जळगाव तालुक्‍यातही ७२ हजार खातेदार शेतकऱ्यांपैकी ५० हजार शेतकऱ्यांनाच लाभ झाला. दुसऱ्या टप्प्यातील कार्यवाहीची प्रतीक्षा आहे. पहिल्या टप्प्यात एवढे शेतकरी का वंचित राहीले? याचा आढावा स्थानिक स्तरावर आमदार घ्यायला तयार नाहीत. ही योजना केंद्र सरकारची असल्याची बतावणी काही सत्ताधारी करतात. यामुळे प्रशासन मस्तालपणा करीत असल्याची नाराजी शेतकरी व्यक्त करीत आहेत. इतर शेतकऱ्यांना या योजनेत सहभाग घेण्यासंबंधी अनेक तांत्रिक अडचणींसह प्रशासनाच्या चालढकल, मनमानी कारभाराला सामोरे जावे लागत आहे. त्यात शेतकऱ्यांचे बॅंक खाते चुकले असल्यास त्याची दुरुस्ती करून घेण्यासाठी तहसील कार्यालयात चकरा माराव्या लागतात. संजय गांधी योजना कक्षाकडे ठिकठिकाणी हे काम सोपविले आहे. हे कर्मचारी गैरहजर, रजेवर असले तर शेतकऱ्यांची अधिकची वणवण होते. दोन-पाच वेळेस चकरा माराव्या लागत आहेत. तलाठी या योजनेबाबत निधी कुठून येतो हे आम्हांलाच माहीत नाही? आम्ही काय काय कामे करणार? अशी उत्तरे शेतकऱ्यांना देऊन परतावून लावतात. नव्या वित्तीय वर्षातील हप्ता बॅंकेत आलेला नाही. त्याचीही शेतकऱ्यांना प्रतीक्षा असून, ते बॅंकेत चकरा मारीत आहेत. यामुळे ही योजना चांगली असली तरी प्रशासनाच्या मनमानी कारभारामुळे शेतकरी त्रस्त असल्याच्या प्रतिक्रिया येत आहेत.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com