Agriculture news in Marathi, Waiting for compensation to farmers in 335 villages in Khandesh | Agrowon

खानदेशात ३३५ गावांमधील शेतकऱ्यांना भरपाईची प्रतिक्षा

टीम अॅग्रोवन
गुरुवार, 2 एप्रिल 2020

जळगाव : धुळे आणि जळगाव जिल्ह्यात मंगळवारी (ता.३१) झालेल्या पूर्वमोसमी पाऊस व गारपिटीमुळे धुळे जिल्ह्यातील सुमारे ३५ तर जळगाव जिल्ह्यातील २९४ गावांमध्ये पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.

जळगाव : धुळे आणि जळगाव जिल्ह्यात मंगळवारी (ता.३१) झालेल्या पूर्वमोसमी पाऊस व गारपिटीमुळे धुळे जिल्ह्यातील सुमारे ३५ तर जळगाव जिल्ह्यातील २९४ गावांमध्ये पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. जळगाव जिल्ह्यातील ३० हजार २६० हेक्‍टरवरील पिकांचे तर धुळ्यातही सुमारे १० हजार हेक्‍टर क्षेत्रावरील पिकांना फटका बसला आहे. प्रशासनाने पंचनामे पूर्ण केले असून, शेतकऱ्यांना भरपाईची प्रतीक्षा आहे. 

जळगाव जिल्ह्यात चोपडा तालुक्‍यात सर्वाधिक १६ हजार २० हेक्‍टरवरील पिकांना फटका बसला आहे. जिल्ह्यात एकूण २९४ गावातील ३१ हजार ११७ शेतकऱ्यांच्या तोंडचा घास गारपिटीने हिरावला आहे. सुमारे ११० कोटींवर नुकसान झाल्याचा अंदाज यापूर्वी व्यक्त झाला होता. शिरपुरात पिकांचे सर्व नुकसान ३३ टक्‍क्‍यांच्यावर आहे. या नुकसानीचा अहवाल कृषी
विभागाने जिल्हाधिकाऱ्यांकडे दिला आहे.

रब्बी ज्वारी, गहू, मका, बाजरी, हरभरा, कांदा, केळी, भाजीपाला, फळपिके व इतर पिकांना मोठा फटका बसला. सर्वाधिक सात हजार १००
हेक्‍टरवरील मक्‍याचे नुकसान झाले आहे. त्या खालोखाल सहा हजार ७७७ हेक्‍टरवरील गव्हाचे, तर पाच हजार ८७० हेक्‍टरवरील केळीला फटका बसला आहे. 

चोपडा तालुक्‍यातील ९२ गावांमधील २० हजार ६९१ शेतकऱ्यांच्या ३८३२ हेक्‍टरवरील गव्हाचे नुकसान झाले आहे. ३ हजार ७८७ हेक्‍टरवरील मकाही भुईसपाट झाला. अशाच प्रकारे २ हजार ८८ हेक्‍टरवरील केळी, २ हजार ७६ हेक्‍टरवरील हरभरा, २ हजार ७२ हेक्‍टरवरील रब्बी ज्वारीचे नुकसान झाले आहे.

या सोबतच इतरही पिकांचे नुकसान झाले आहे. जळगाव तालुक्‍यातील
३३ गावांमध्ये ३ हजार ४५२ शेतकऱ्यांचे ७ हजार ८२६ हेक्‍टरवर तर अमळनेर तालुक्‍यातील ४४ गावांमध्ये ४ हजार ६१३ शेतकऱ्यांचे ३ हजार ५८९.९१ हेक्‍टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे.

शिरपुरात पपई, गहू, केळी, मका, बाजरी, हरभरा या पिकांची मोठी हानी झाली आहे. भरपाईबाबत सरकारने कार्यवाही करून मदतनिधी द्यावा, अशी मागणी शेतकरी छगन पाटील (शिरपूर), रामसिंग पाटील (चोपडा) यांनी केली आहे. 


इतर ताज्या घडामोडी
सोलापूर जिल्ह्यात पावसामुळे महावितरणचे...सोलापूर ः महावितरणच्या अकलूज, पंढरपूर व...
वळण योजना प्रकल्प पूर्ण करा : भुजबळनाशिक : ‘‘जिल्ह्यातील पाणी पश्चिमेकडे वाहून...
कृषीकन्येकडून शेतकऱ्यांना मार्गदर्शनबदलापूर (जि.ठाणे) ः कृषी कार्यानुभव...
मालेगावात कांदा निर्यातबंदीच्या...मालेगाव, जि. नाशिक : गेल्या महिन्यात कांद्याला...
सोलापुरातील शेतकऱ्यांनो कृषी...सोलापूर : यंदाच्या वर्षासाठीची कृषी यांत्रिकीकरण...
जीवामृत निर्मितीचे प्रात्यक्षिकनशिराबाद, जि. बुलडाणाः येथील कृषीकन्या भाग्यश्री...
हिंगोलीतील सहा मंडळात अतिवृष्टीहिंगोली :जिल्ह्यात मंगळवारी (ता.२२) सकाळी...
द्राक्ष उत्पादकांची व्यापारी,...नाशिक : सुमारे ९५ टक्के द्राक्ष व्यापारी हे...
जळगाव जिल्ह्यात केळी उत्पादकांना विमा...जळगाव : शेतकरी प्रश्‍नी शरद जोशी प्रणित शेतकरी...
दुधना नदीला पूर, पिकांत पाणीच पाणीपरभणी : सेलू तालुक्यातील ब्रम्हवाकडी येथील निम्न...
उदगीरमधील ‘देवर्जन’ सात वर्षांनंतर भरलाउदगीर : देवर्जन (ता. उदगीर) येथील मध्यम...
बीड, लातूरमधील मंडळांत दमदार पाऊसऔरंगाबाद : औरंगाबाद, जालना, बीड, उस्मानाबाद,...
गिरणा पट्ट्यात पूर ओसरताच वाळूचा उपसा...जळगाव : गिरणा परीसरातील शेतकऱ्यांना पूर,...
सेस रद्द करा, अन्यथा बंद पुकारूपुणे ः केंद्र सरकारच्या कृषी आणि पणन विषयक तीन...
जळगावात बाजार समित्या बरखास्तीचे राजकारणजळगाव ः जिल्ह्यात दोन्ही काँग्रेस, शिवसेनेची...
शेतकऱ्यांसाठी सुखावणारा कायदा ः...कोल्हापूर ः शेती उत्पन्न व्यापार आणि वाणिज्य...
बुलडाण्यात दहा हजार हेक्टरवर क्षेत्र...बुलडाणा ः जिल्ह्यात शनिवार (ता. १९) व रविवारी (ता...
सिंधुदुर्ग जिल्ह्याला मुसळधार पावसाने...सिंधुदुर्ग ः जिल्ह्याच्या काही भागाला सोमवारी (ता...
अखेर ६६५ शेतकऱ्यांना विम्याचा लाभअकोला ः  सन २०१९ च्या खरीप हंगामात पंतप्रधान...
संत्रा वाहतुकीसाठी रेल्वेकडून वरूड...अमरावती : किसान रेल्वेच्या माध्यमातून येत्या...