टेंभू, ताकारी, म्हैसाळच्या पूर्णत्वाची प्रतीक्षा

Waiting for the completion of Tembu, Takari, Mhaisal
Waiting for the completion of Tembu, Takari, Mhaisal

सांगली : टेंभू, ताकारी आणि म्हैसाळ योजनांच्या लाभक्षेत्रातील वंचित कायम दुष्काळी भागातील शेतकऱ्यांना या योजनेच्या पूर्णत्वाची प्रतीक्षा आहे. पूर्णत्वाच्या अंतिम टप्प्यातील या योजना जून २०२० पर्यंत पूर्ण करण्याचे आव्हान नव्या सरकारपुढे उभे आहे.

टेंभूच्या ४ हजार ८८ कोटी ९४ लाख रुपयांचा द्वितीय सुधारित प्रकल्प अहवाल व ताकारी-म्हैसाळ योजनांच्या ४ हजार ९५९ कोटी ९१ लाख रुपये खर्चाच्या चतुर्थ सुधारित प्रशासकीय अहवाल देवेंद्र फडणवीस सरकारच्या काळात मंजूर आहे. यामुळे निधी मिळण्याचा मार्ग मोकळाच आहे. परंतु, या कामांना गती देऊन जून २०२० पर्यंत या योजना पूर्ण करायच्या आहेत.

‘टेंभू’द्वारे सातारा जिल्ह्यातील कऱ्हाड, सांगली जिल्ह्यांत कडेगाव, खानापूर, आटपाडी, तासगाव, कवठेमहांकाळ या तालुक्यांसह सोलापूर जिल्ह्यातील सांगोला अशा एकंदरीत ७ तालुक्यांतील २४० गावांमधील ८० हजार ४७२ हेक्टर क्षेत्रास पाणी मिळेल. आतापर्यंत योजनेवर २ हजार ४०० कोटी इतका खर्च झाला. बळीराजा संजीवनी योजनेतून टेंभूसाठी १ हजार २०० कोटी निधी मंजूर आहे. यापैकी ७०० कोटींचा निधी मिळाला आहे. अजूनही ५०० कोटींचा निधी मिळेल. योजनेसाठी ३ हजार १८४ कोटी ८८ लाख इतका प्रत्यक्ष खर्च होईल. उर्वरित ९४० कोटी ६ लाख इतका इतर अनुषंगिक खर्च आहे. 

ताकारी व म्हैसाळ योजनांद्वारे २८८ गावांचा पाणीप्रश्न कायमस्वरूपी सुटेल. या योजनांसाठी २ हजार ३७० कोटींचा खर्च झाला आहे. त्यांच्या पूर्णत्वासाठी १ हजार ४०० कोटींची गरज आहे. इतर अनुषंगिक खर्च वजा जाता, प्रकल्प अहवालानुसार मंजूर निधीतूनही ५०० कोटी रुपयांची बचत होईल. केंद्र सरकारच्या पंतप्रधान कृषी सिंचन प्रकल्प योजनेतून या योजनांसाठी गरजेनुसार तात्काळ निधी मिळत आहे. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com