धूळवाफ पेरणीसाठी वळिवाची प्रतीक्षा

धूळवाफ पेरणीसाठी वळिवाची प्रतीक्षा
धूळवाफ पेरणीसाठी वळिवाची प्रतीक्षा

कोल्हापूर : यंदाच्या खरीप हंगामासाठी बियाण्यांची पुरेशी उपलब्धता असल्याची माहिती कृषी विभागाने दिली. जिल्ह्यात वळीव पाऊस नसल्याने पेरणीपूर्व मशागती करणे शक्य होत नसल्याचे चित्र आहे. तरीही शेतकरी बैलांच्या साह्याने कोरड्या वाफशावरच मशागत करत आहेत. त्यांना वळीव पावसाची प्रतीक्षा आहे. 

एखादा वळीव झाल्यास मशागतीला मोठा वेग येतो. जिल्ह्यात अजून पेरणीपूरक वातावरण नसल्याने बियाणे व खताची मागणी फारशी नाही. मात्र अनेक कृषी निविष्ठा धारक बियाणे व खताची उपलब्धता करून ठेवत आहेत. सध्या शेतकरी विविध प्रकारची खते टाकून जमिनीची सुपीकता वाढवण्याच्या प्रयत्नात आहेत. 

सोयाबीनचे २५५६ क्विंटल, तर भाताचे १९९८ क्विंटलचे बियाणे उपलब्ध आहे. ज्वारी व कडधान्याच्या पेरणीस अद्याप वेळ असल्याने त्यांचे बियाणे आलेले नाही. वळवाचा पाऊस नसल्याने खरीप पेरण्यांसमोर अडचणी आल्या आहेत. मशागतीची कामे अद्याप धीम्या गतीने सुरू आहेत. बांधबंधिस्ती करण्यात शेतकरी मग्न आहेत. वळीव पाऊस झाला की मशागतीच्या कामांना वेग येऊन धूळवाफ पेरण्या सुरू होतील. 

कृषी विभागाने तयारी केली असून, बियाण्यांची उपलब्धता करून ठेवली आहे. धूळवाफ पेरणीसाठी भाताचे विविध वाण उपलब्ध आहेत. ३३४५ क्विंटल भात बियाण्यांची मागणी आहे. त्यापैकी १९९८ क्विंटलची आवक झाली आहे. सोयाबीन बियाण्याची २५५६ क्विंटलची आवक झाली आहे. यामध्ये सर्वाधिक ‘जे-३३५’ या वाणाचे १७०४ क्विंटल बियाणे उपलब्ध आहे. 

बियाणे दरांत वाढ  

यंदा बियाण्यांच्या दरात सरासरी ५ टक्क्यांची वाढ झाली आहे. ज्वारी, तूर, मूग, उदीड, बाजरीच्या पेरणीस अद्याप वेळ असल्याने बियाणे आलेले नाही. येत्या आठ-दहा दिवसांत या बियाण्यांची आवक होण्याची शक्यता असल्याचे कृषी विभागाच्या सूत्रांनी स्पष्ट केले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com