जालना जिल्ह्यात शेततळ्यांच्या अनुदानासाठी निधीची प्रतीक्षा

जालना जिल्ह्यात शेततळ्यांच्या अनुदानासाठी निधीची प्रतीक्षा
जालना जिल्ह्यात शेततळ्यांच्या अनुदानासाठी निधीची प्रतीक्षा

जालना : सामूहिक शेततळ्यांचे उद्दिष्ट जालन्याच्या कृषी विभागाने साध्य केले. परंतु, तीन महिने लोटूनही जिल्ह्यातील सव्वादोनशे शेतकऱ्यांना त्यांच्या पूर्ण केलेल्या शेततळ्यांसाठी अनुदानाची प्रतीक्षा कायम आहे.

एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान व राष्ट्रीय कृषी विकास योजनेंतर्गत सामूहिक शेततळ्यांसाठी खोदकाम, अस्तरीकरण व कंपाउंडसाठी ३४ बाय ३४ च्या शेततळ्यासाठी जवळपास ३ लाख ३९ हजारांचा निधी अनुदान रूपात दिला जातो. या योजनेंतर्गत जालना जिल्ह्याला २०१८-१९ मध्ये ५४८ शेततळ्यांचे उद्दिष्ट देण्यात आले होते.

आर्थिक गणितात १४ कोटी ५० लाख रुपयांचे उद्दिष्ट गाठण्याचे आव्हान कृषी विभागासमोर होते. जिल्ह्यातील जालना, बदनापूर, भोकरदन, जाफ्राबाद, परतूर, मंठा, अंबड व घनसावंगी या आठही तालुक्‍यांत ५४८ सामूहिक शेततळ्यांच्या कामांना कृषी विभागाने पूर्वसंमती दिली. त्यानुसार जिल्ह्यात सामूहिक शेततळ्यांची सर्व कामे पूर्ण झाली. त्यासाठी १४ कोटी ५० लाख रुपयांच्या निधीची अनुदानासाठी आवश्‍यकता आहे. प्रत्यक्षात जिल्ह्याला केवळ ९ कोटी २९ लाख २५ हजार मिळाले. 

जिल्ह्यातील ३२३ शेततळ्यांना दिल्या जाणाऱ्या अनुदानात वितरित तो निधी करण्यात आला; परंतु २२५ शेततळ्यांना अजूनही निधीची प्रतीक्षा कायम आहे. लागणारा निधी व मिळणाऱ्या अनुदानाच्या तुलनेत जमेल तेवढी पदरमोड, कर्ज, उसनवार करून शेततळ्यांची कामे शेतकऱ्यांनी पूर्ण केली. आता अनुदानाअभावी ऐन पेरणीच्या तोंडावर त्यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. 

घनसावंगी तालुक्‍यात सर्वाधिक १४७ शेततळ्यांचे उद्दिष्ट होते. त्यानुसार कामेही झाली; परंतु १४७ कामांपैकी केवळ ५७ शेततळ्यांनाच अनुदान मिळाले. ९० शेततळ्यांना अजूनही अनुदानाची प्रतीक्षा आहे. बदनापूर तालुक्‍यात १११ शेततळ्यांच्या कामांपैकी केवळ ६८ शेततळ्यांनाच अनुदान प्राप्त झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. 

तालुकानिहाय निधीची प्रतीक्षा असलेली शेततळे

जालना ३२
बदनापूर ४३
भोकरदन 
जाफ्राबाद  १७
परतूर
मंठा
अंबड  २८
घनसावंगी ९०

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com