शेतकऱ्यांना बोंड अळी नुकसानभरपाईची प्रतीक्षा

शेतकऱ्यांना बोंड अळी नुकसानभरपाईची प्रतीक्षा
शेतकऱ्यांना बोंड अळी नुकसानभरपाईची प्रतीक्षा

मोर्शी, अमरावती : बोंडअळीच्या नुकसानभरपाईपोटी दोन टप्प्यात अनुदानाचे वाटप झाले. परंतु तिसऱ्या टप्प्यातील २.३३ कोटी रुपयांचे अनुदान रखडले. त्याची शेतकऱ्यांना प्रतीक्षा आहे. 

मोर्शी तालुक्‍यातील बोंडअळीच्या उद्रेकामुळे मोठ्या प्रमाणावर कापूस पीकाचे नुकसान झाले. यापोटी शासनाकडून दोन टप्प्यात अनुदानाचे वितरण केले. मदतीचा ६.५ कोटी रुपयांचा तिसरा टप्पा जाहीर करण्यात आला. दिवाळीपूर्वी मदतीची घोषणा करण्यात आल्यानंतरही सात सांज्यातील शेतकऱ्यांचे सुमारे २.३३ कोटी रुपयांचे अनुदान अद्यापही वितरित झाले नाही.  मदत रक्‍कम जाहीर करून दोन महिन्यांचा कालावधी लोटला. तरीही सात सांज्यातील शेतकरी मदतीपासून वंचित असल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र संताप आहे.

शेतकऱ्यांनी महसूल विभागाकडे या संदर्भाने विचारणा केली. वाढीव याद्यांमुळे अनुदान वितरण रखडल्याचे उत्तर दिले जाते, असा शेतकऱ्यांचा आरोप आहे. 

नव्याने निधीची मागणी सिंचनाच्या सुविधा असलेल्या शेतकऱ्यांचे पंचनामे बाकी होते. काही शेतकरी नाल्यावरुन ओलीत करतात, असे सांगण्यात आले. त्यानुसार त्यांच्या शेताचेही पंचनामे करून अहवाल पाठविण्यात आला. त्याआधारे नव्याने २.३३ कोटी रुपयांची मागणी करण्यात आली असून, लवकरच हा निधी शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग होईल, असा विश्‍वास मोर्शी तहसील कार्यालयाच्या सूत्रांनी व्यक्‍त केला.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com