‘गिरणा’, ‘वाघूर’च्या पाण्याची शेतकऱ्यांना प्रतीक्षा

गिरणा नदीच्या पाण्यावर शेती अवलंबून आहे. केळीसह इतर रब्बी पिकांना सिंचनासाठी कूपनलिकांचा आधार आहे. पण त्यांचे पाणी कमी होत असून, नदीत पाणी सोडले तर भूगर्भातील साठा वाढेल. - ज्ञानेश्‍वर चौधरी, शेतकरी, आव्हाणे (जि.जळगाव)
‘गिरणा’, ‘वाघूर’च्या पाण्याची शेतकऱ्यांना प्रतीक्षा
‘गिरणा’, ‘वाघूर’च्या पाण्याची शेतकऱ्यांना प्रतीक्षा

जळगाव : गिरणा धरणासह वाघूर प्रकल्पातून पिण्याच्या पाण्यासाठी, नदीकाठावरील रब्बी पिके वाचविण्यासाठी दुसरे आवर्तन अजूनही सोडण्यात आले नाही. यातच उद्योग व पिण्याच्या पाण्यासाठी हतनूर धरणातील कमाल जलसाठा वापरला जाणार आहे. त्यामुळे  पुढे रब्बीसाठी धरणातून पाणी सोडले जाणार नसल्याची माहिती मिळाली. 

तापी नदीवरील हतनूर धरणाच्या उजव्या कालव्याद्वारे चोपडा, यावल व रावेर तालुक्‍यातील शेतीला लाभ होतो. हे धरण १०० टक्के भरले होते. पण त्यातील जलसाठा गाळामुळे कमी होत आहे. शिवाय विविध नगरपालिका, भुसावळमधील उद्योग, जळगावमधील औद्योगिक वसाहतीला पाणीपुरवठ्याची मदार या धरणावर आहे. अशातच रब्बीसाठी आणखी एक आवर्तन मिळण्याची मागणी महिनाभरापासून केली जात आहे. ती प्रशासनाने फेटाळली. 

गिरणा नदीवरील चाळीसगावनजीकच्या गिरणा धरणातून नदीत पाणी सोडून विहिरी, कूपनलिकांचे पुनर्भरण, पिण्याचे पाणी उपलब्ध व्हावे, यासाठी मागणी केली जात आहे. मध्यंतरी ५ जानेवारीला पाणी सोडण्याची तयारी  प्रशासनाने केली होती. परंतु अजूनही आवर्तन सोडलेले नाही. दिवाळीच्या वेळेस पहिले आवर्तन गिरणा धरणातून सुटले. ते १५ नोव्हेंबरपर्यंत नदीच्या शेवटच्या टप्प्यात पोचले. धरणाच्या पाण्यावर पाचोरा, भडगाव, चाळीसगाव, जळगाव, धरणगाव भागातील शेतकरी पिण्याच्या पाण्यासंबंधी अवलंबून आहेत. हे पाणी नोव्हेंबरमध्ये सोडले होते. ते काही ठिकाणी खड्ड्यांमध्ये साचले. ते आटले आहे. यामुळे नदीकाठच्या विहिरी, गावात पिण्याच्या पाण्यासाठी खोदलेल्या कूपनलिकांतील पाण्याची पातळी घटत आहे. पाण्याची समस्या वाढू शकते. गिरणा काठी लिंबू, केळी, पपईच्या बागा आहेत. त्या वाचविण्याची शेतकऱ्यांची धडपड आहे.

वाघूर नदीवरील कंडारीनजीकच्या (ता.जळगाव) वाघूर मध्यम प्रकल्पातून नशिराबाद व भुसावळमधील गोजोरा, सुनसगाव, वराडसीम भागातील शेतकऱ्यांना सिंचनासाठी पाणी हवे आहे. या भागात मध्यंतरी एकदाच पाणी आले. नंतर ते आले नसल्याने शेतकरी पाण्याच्या प्रतीक्षेत आहेत. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com