agriculture news in marathi, Waiting for farmers to improve the rate of Kalingaad | Agrowon

कलिंगडाचे दर सुधारण्याची शेतकऱ्यांना प्रतीक्षा
टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 12 एप्रिल 2019

काढणीसाठी व्यापारीच मजूर आणत आहेत. जामनेरात विषाणूजन्य रोगामुळे कलिंगडात शेतकऱ्यांना नुकसान सहन करावे लागले आहे. एकरी २०० क्विंटल उत्पादन साध्य होत अाहे. 
- विजय पाटील, शेतकरी (पळासखेडा, ता. जामनेर, जि. जळगाव)

जळगाव : खानदेशात कलिंगडाचे दर प्रतिकिलो ५ ते ८ रुपयांपर्यंत शेतकऱ्यांना मिळत आहेत. दर परवडत नसल्याने नफा व खर्च यासंबंधीचे गणित बिघडले आहे. दुसरीकडे किरकोळ बाजारात मात्र २० रुपये प्रतिकिलोचे दर कलिंगडाला असल्याचे चित्र आहे. 

कलिंगडाची लागवड खानदेशात धुळे जिल्ह्यात शिरपूर, धुळे, नंदुरबारमधील शहादा, तळोदा, नवापूर, जळगाव जिल्ह्यात चोपडा, यावल, रावेर, जळगाव, पाचोरा, जामनेर भागात झाली आहे. लागवड सुमारे सहा हजार हेक्‍टरवर झाली होती. सध्या काढणी सर्वत्र सुरू आहे. काढणीवर आलेल्या पिकात पहिले दोन दिवस दर्जेदार फळांची काढणी केली जाते. आकाराने बेढब व लहान फळांची दुय्यम दर्जाची फळे म्हणून दोन-तीन दिवसांत काढणी केली जाते. 

दर्जेदार, चार ते साडेचार किलो वजन असलेल्या, अंडाकार फळाला चांगले दर मिळत अाहेत. कमाल आठ रुपये प्रतिकिलोचे दर थेट शेतात मिळत आहेत. आकाराने लहान व अडीच ते तीन किलोच्या फळाला प्रतिकिलो पाच ते साडेपाच रुपये, असे दर थेट शेतात शेतकऱ्यांना मिळत आहेत. काढणी एकाच वेळी सुरू झाल्याने बाजारातील आवक वाढली आहे. 

जामनेर, शहादा, रावेर, चोपडा, शिरपूर, शिंदखेडा मध्य प्रदेशातील बऱ्हाणपूर, बडवानी व इंदूर येथील व्यापारी कलिंगडाची खरेदी करीत आहेत. बाजार समितीमध्ये किरकोळ आवक होत आहे. थेट शेतात खरेदी करून पाठवणूक उत्तर भारतासह राजस्थान, छत्तीसगड, मुंबई भागात केली जात आहे. 

इतर ताज्या घडामोडी
उजनी धरणातून भीमा नदीत पुन्हा ३० हजार...सोलापूर  ः पुणे जिल्ह्यात पावसाने पुन्हा...
राजापूर, रत्नागिरी, संगमेश्‍वर...रत्नागिरी  ः राजापूर, रत्नागिरीसह संगमेश्‍वर...
कापूस उत्पादकता वाढीसाठी शासनाने...अकोला : महाराष्ट्रात कापूस लागवड क्षेत्र...
पुणे जिल्हयात हलक्या ते मध्यम पावसाची...पुणे : गेल्या दोन दिवसांपासून पावसासाठी पोषक...
मंगळ, चंद्रसदृश मातीमध्ये पिकांचे...नासा या अमेरिकन अवकाश संशोधन संस्थेने चंद्र आणि...
पुणे जिल्ह्यात तीन लाख हेक्टरवर रब्बी...पुणे : मॉन्सूनच्या अंतिम टप्प्यातील पावसाने...
नगर जिल्हा परिषदेमध्ये दूरध्वनीवरील...नगर  : पाणी येत नाही. शिक्षक शाळेत उशिरा...
विधानसभा निवडणुकीसाठी प्रचारतोफा...मुंबई : चौदाव्या विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी...
घाटशीळ पारगाव प्रकल्प कोरडानगर : जिल्ह्यात यंदा पावसाळा संपत आला तरी अजून...
उमेदवारी देऊन केलेली चूक सुधारा : पवारसातारा : ‘‘वरुणराजानेही आपल्याला आशीर्वाद दिले...
काकडा परिसरात सोयाबीन काढणीच्या...काकडा, अमरावती ः परिसरात सोयाबीन...
अकोला येथे पावसाळी वातावरणाने...अकोला ः गेल्या २४ तासांपासून या भागात...
सिंधुदुर्ग जिल्ह्यात वावडिंग खरेदी सुरू सिंधुदुर्ग  ः बहुउपयोगी वावडिंग खरेदीला...
पट्टणकोडोलीला ‘इट्टल-बिरोबाच्या नावानं...पट्टणकोडोली, जि. कोल्हापूर  : ‘इट्टल-...
विश्रांतीनंतर सोलापुरात पुन्हा सर्वदूर...सोलापूर  ः गेल्या काही दिवसांच्या...
शेतकरी, जनतेच्या प्रश्नांची उत्तरे...नगर  : राज्यात पाच वर्षांत १६ हजार शेतकरी...
महायुतीला ऐतिहासिक विजय मिळेल ः...मुंबई ः केंद्र आणि महाराष्ट्रातील भाजप-शिवसेना...
आपण विजयाचा जल्लोष साजरा करू ः...नागपूर : मतदानाचा दिवस युद्धदिन समजून...
भाजप-शिवसेनेने पाच वर्षे  फक्त थापा...मुंबई : पाच वर्षे ज्यांनी विविध आश्वासने...
तुरीवरील किडींचे एकात्मिक व्यवस्थापनमहाराष्ट्रातील प्रमुख कडधान्य पीक असलेल्या तुरीची...