agriculture news in marathi waiting for the FMD vaccine | Agrowon

लाळ्या खुरकूत लसींची प्रतीक्षाच; तातडीच्या ३० लाख कुपींची मागणी

वृत्तसेवा
शुक्रवार, 17 सप्टेंबर 2021

लाळ्या खुरकूतच्या लागणीच्या घटना समोर येऊ लागल्याने खडबडून जागे झालेल्या पशुसंवर्धन विभागाच्या वतीने आपत्कालीन परिस्थितीत ३० लाख कुपींची तातडीची मागणी केंद्र सरकारकडे नोंदविली आहे.

पुणे ः पावसाळा संपत आला तरी अद्याप राज्यातील दोन कोटी पशुधनाचे लाळ्या खुरकूतच्या लसीकरणाला अद्याप सुरुवात झालेली नाही. त्यामुळे लाळ्या खुरकूतच्या लागणीच्या घटना समोर येऊ लागल्याने खडबडून जागे झालेल्या पशुसंवर्धन विभागाच्या वतीने आपत्कालीन परिस्थितीत ३० लाख कुपींची तातडीची मागणी केंद्र सरकारकडे नोंदविली आहे.

या मागणीचा पुरवठा मंगळवारी (ता. १४) होण्याची शक्यता होती. मात्र, सायंकाळपर्यंत लसीच्या कुपी उपलब्ध झाल्या किंवा नाही याबाबत पशुसंवर्धन विभागाशी संपर्क साधला असता त्यांच्याकडून ठोस माहिती मिळाली नाही. 

या लसी प्राधान्याने नगर, पुणे आणि बीड जिल्ह्यांसाठी वापरण्यात येणार असल्याचे पशुसंवर्धन आयुक्तालयाकडून सांगण्यात आले. पावसाळ्यापूर्वी दरवर्षी लाळ्या खुरकूतची लागण होऊ नये यासाठी पशुधनाचे लसीकरण केले जाते. मात्र, यावर्षी लसीकरणाचा हंगाम संपत आला तरी लसींचा पुरवठा झालेला नाही. केंद्र सरकारकडून लसींच्या चाचण्या सुरू असून, चाचण्या झाल्यानंतर पुरवठा केला जाईल, असे केंद्राकडून वारंवार सांगण्यात आल्याचे पशुसंवर्धन विभागाकडून सांगण्यात आले. 

राज्यात गाय, बैल आणि शेळी मेंढ्यांची सुमारे २ कोटी संख्या आहे. या पशुधनाला वर्षभरात दोनवेळा लसीकरण केले जाते. नियोजनानुसार मे अखेर लस उपलब्ध होणे गरजेचे होते. मात्र, सप्टेंबरचा निम्मा महिना गेला तरी अद्याप केंद्र सरकारकडून अद्याप लसींचा पुरवठा झालेला नाही.

देशपातळीवर विविध राज्यांना ३० कोटी लसींचा पुरवठा केला जातो. यामधील महाराष्ट्राला २ कोटी ९ लाख लसींची गरज असते. दोन लसीकरणांमध्ये सहा महिन्यांचे अंतर असते. एकदा लस दिली की, साधारण ९ महिने पशुधनांमध्ये प्रतिकार क्षमता तयार होते. पावसाळ्यापूर्वी लसीकरण होणे गरजेचे असताना, सप्टेंबर महिना संपत आला तरी अद्याप लसींचा पुरवठा झाला नसल्याचे पशुसंवर्धन मंत्रालयातून सांगण्यात आले. 

दरम्यान पशुधन जर लाळ्या खुरकूतच्या लागणीनंतर तापाने फणफणले तर त्याचा परिणाम पशुधनाच्या आरोग्यावर पुढील सात आठ महिने राहतो. या आजारपणामुळे पशुधनाकडून दूध पण कमी दिले जाते. परिणामी पशुपालक शेतकऱ्यांच्या आर्थिक नुकसानीचा धोका निर्माण झाला आहे. 

  पुरवठ्याबाबत साशंकता
दरम्यान, ऐन पावसाळ्यात लस न मिळाल्यास पशुधन तापाने आजारी पडण्याचा धोका असतो. लाळ्या खुरकूतची लागण झाल्याच्या घटना नगर, पुणे आणि बीड जिल्ह्यात झाल्याने पशुसंवर्धन विभाग खडबडून झाला असून, आपत्कालीन परिस्थितीत ३० लाख कुपींची तातडीची मागणी केंद्र सरकारकडे करण्यात आली आहे. या मागणीनुसार मंगळवारी (ता. १४) लसींचा पुरवठा होण्याची शक्यता वर्तविण्यात येत होती. मात्र ती उपलब्ध झाल्याबाबतची ठोस माहिती पशुसंवर्धन विभागाकडून मिळाली नसल्याने साशंकता आहे.


इतर अॅग्रो विशेष
किमान तापमानात घट होण्याची शक्यतापुणे : राज्यात पावसाने उघडिप दिल्यानंतर किमान...
‘महाडीबीटी’च्या कामात अडथळाअकोला ः कृषी खात्याच्या विविध योजनांचा लाभ...
कृषी निविष्ठा केंद्रांचे परवाने आता...पुणे ः राज्यातील कृषी सेवा केंद्रांना परवान्याची...
आयातीमुळे कडधान्य दर दबावातपुणे ः तुरीचा हंगाम पुढील काही दिवसांत सुरू होईल...
...तर द्राक्षाचे नुकसान टळले असतेनाशिक : गेल्या तीन वर्षांपासून कसमादे भागातील...
साहित्य संमेलनाचे अनुदान शेतकरी,...नाशिक : वामनदादा कर्डक जन्मशताब्दी साहित्यनगरी...
देशी वाणाने सकस उत्पादन ः राहीबाई पोपेरेसांगली : पारंपरिक बियाणाला रासायनिक खताच्या...
शिवरायांच्या स्वराज्यापासून महात्मा...कोल्हापूर : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या हिंदवी...
मराठवाड्यात आंब्यावर संकटाचे ढगऔरंगाबाद : यंदा आंब्यावर संकटाचे ढग कायम आहेत....
पुन्हा उभा राहिलो अन् यशस्वीही झालो...दुग्ध व्यवसायात भरभराट येत असतानाच कुट्टी यंत्र...
पीकबदल, फळबागांसह पूरक उद्योगांची साथऔरंगाबाद जिल्ह्यातील जडगाव येथील भोसले कुटुंबाने...
डेअरी उद्योगातील खरेदीदराचा गोंधळ कायमपुणे ः राज्यातील दुधाच्या बाजारपेठेत विक्रीविषयक...
ऊस उत्पादकांचे अद्याप ४,४४५ कोटी थकीतकोल्हापूर : गेल्या हंगामात उत्तर प्रदेशातील साखर...
कोरड्या हवामानाचा अंदाज, गारठाही वाढणारपुणे : राज्यात पावसाने उघडीप दिली असून, आकाश...
लातूर जिल्ह्यात द्राक्ष बागांना पावसाचा...लातूर ः जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून...
पाकिस्तानमध्ये कापसाचे दर टिकूनपुणे ः पाकिस्तानमध्ये यंदा कापूस उत्पादनात वाढ...
‘पशुसंवर्धन’च्या योजनांसाठी अर्ज...पुणे ः जिल्ह्यातील ग्रामीण भागातील सुशिक्षित व...
मनाच्या वेदना दूर करण्यासाठी संघर्ष ः...कुंडल, जि. सांगली : माणसाच्या अंगाला, कपड्याला...
शेती हा आर्थिक प्रश्‍न ः विलास शिंदेनाशिक : शेतीविषयी चर्चा राजकीय व सामाजिक अंगाने न...
उसाच्या पहिल्या पेमेंटकडे लागले लक्षपुणे ः राज्यातील साखर कारखान्यांनी शेतकऱ्यांकडून...