Agriculture news in marathi Waiting for the full-time co-director of agriculture | Agrowon

पूर्णवेळ कृषी सहसंचालकाची प्रतीक्षा

टीम अॅग्रोवन
गुरुवार, 26 नोव्हेंबर 2020

पुणे विभागीय कृषी सहसंचालकाची जबाबदारी राष्ट्रीय फलोत्पादन विभागातील (एनएचएम) प्रकल्प व्यवस्थापक बसवराज बिराजदार यांच्याकडे देण्यात आली आहे. ही जबाबदारी प्रभारी अधिकाऱ्यांच्या खांद्यावर देण्यात आला आहे.  

पुणे : पुणे विभागीय कृषी सहसंचालकाची जबाबदारी राष्ट्रीय फलोत्पादन विभागातील (एनएचएम) प्रकल्प व्यवस्थापक बसवराज बिराजदार यांच्याकडे देण्यात आली आहे. ही जबाबदारी प्रभारी अधिकाऱ्यांच्या खांद्यावर देण्यात आली असून, पूर्ण वेळ कृषी सहसंचालकांची निवड कधी केली जाणार, असा प्रश्न अधिकारी वर्गातून उपस्थित केला जात आहे.  

राज्यात ठाणे, कोल्हापूर, पुणे, लातूर, अमरावती, औरंगाबाद, नागपूर, नाशिक असे एकूण आठ विभाग आहेत. पुणे विभाग हा राज्यात अव्वल असून, पुणे विभागात नगर, पुणे, सोलापूर असे तीन जिल्हे येतात. तिन्ही जिल्हे बागायती जिल्हे असल्याने येथे शासनाच्या सर्व योजना प्रभावीपणे राबविण्यात 
येतात. 

विशेष हा कृषी योजनांना शेतकऱ्यांनाही चांगला प्रतिसाद मिळत असल्याने या विभागाला अधिक महत्त्व प्राप्त झाले आहे. त्यातच पुणे विभागात कृषी आयुक्तालय असल्याने राज्याचे सचिव, कृषिमंत्री, केंद्र व राज्य शासनाचे विविध पथके भेटी देण्यासाठी येतात.  पुणे विभागीय कृषी सहसंचालकांना आयुक्त व जिल्हास्तरीय अधिकारी यांच्यासोबत सतत समन्वय ठेऊन सतर्क राहून काम करावे लागते. त्यातच नुकतीच निविष्ठा व गुणनियंत्रण विभागाचे संचालक दिलीप झेंडे यांची नुकतीच विभागीय कृषी सहसंचालक पदावरून पदोन्नती झाल्याने हे पद रिक्त झाले आहे. त्यामुळे या पदावर पूर्णवेळ अधिकारी नेमण्याची गरज आहे, असे अधिकारी वकर्मचारी यांचे म्हणणे आहे. 

सध्या विभागीय कृषी सहसंचालक कार्यालयात अधीक्षक कृषी अधिकारी पदी रफिक नाईकवडी यांची नुकतीच पूर्ण वेळ अधिकारी म्हणून निवड केली आहे. मात्र, त्याच्याकडेही कृषिमंत्री दादा भुसे यांचे ओएसडी व पोकरा प्रकल्पाची जबाबदारी देण्यात आली आहे. त्यामुळे बहुतांशी वेळा ते मुंबईत कार्यरत असतात. त्यामुळे अनेक वेळा शेतकरी, कर्मचारी यांचे प्रश्न सुटण्यास अडचणीचे ठरत असल्याची चर्चा सुरू झाली आहे. त्यातच श्री बिराजदार यांच्याकडेही प्रभारी पदाची जबाबदारी दिल्याने शेतकऱ्यांच्या प्रश्नाला न्याय मिळेल का नाही, अशी शंका व्यक्त केली जात 
आहे.


इतर ताज्या घडामोडी
रिसोडमध्ये कांदा बीजोत्पादनाकडे कल रिसोड, जि. वाशीम : तालुक्यात यंदा कांदा...
औरंगाबादेत सर्वच पक्षांकडून गुलालाची...औरंगाबाद : मतदानाची प्रक्रिया शांततेत पार...
पुणे जिल्ह्यात संमिश्र निकाल; दावे-...पुणे ः जिल्ह्यातील विविध तालुक्यांमध्ये...
साताऱ्यात स्थानिक आघाड्यांचा जल्लोषसातारा ः दोन दिवसांपूर्वी मतदान झाले. गेले दोन...
नांदेड जिल्ह्यात प्रस्थापितांनी सत्ता...नांदेड : नांदेड जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणुकीचे...
नाशिक जिल्ह्यात प्रस्थापितांना धक्कानाशिक : जिल्ह्यात एकूण ६२१ ग्रामपंचायतीच्या...
माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या...यवतमाळ : माजी मुख्यमंत्री व जलक्रांतीचे प्रणेते...
परभणी जिल्ह्यात संमिश्र यशपरभणी ः परभणी जिल्ह्यातील मतदान झालेल्या ४९८...
भाजपचे ४४, शिवसेनेचे २२ ग्रामपंचायतीवर...सिंधुदुर्गनगरी : जिल्ह्यातील ७० ग्रामपंचायतीपैकी...
नागपुरात संत्रा दरात तेजीनागपूर ः आंबिया बहाराचा हंगाम अंतिम टप्प्यात...
सांगलीत भाजपला धक्का;  महाविकास आघाडीला...सांगली : ग्रामपंचायतींच्या निवडणूक निकालात...
रत्नागिरीत शिवसेनेला कौल रत्नागिरी : जिल्ह्यातील ३६० ग्रामपंचायतींचे निकाल...
सोलापुरात प्रस्थापितांना धक्कासोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील ५९०...
उमरेड येथील महिलांनी स्थापन केली शेतकरी...उमरेड. जि. नागपूर : शेतीमधील विषम परिस्थितीची दखल...
स्वाभिमानीचा विजयासाठी संघर्षकोल्हापूर : कोण म्हणतंय येत नाही, आल्याशिवाय राहत...
‘ब्लॅक राइस’ बियाणे निर्मितीचे काम सुरुरत्नागिरी ः तालुक्यातील शिरगाव येथील कृषी संशोधन...
सोलापुरात वांगी, गाजराला उठावसोलापूर ः सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या...
विदर्भात महाविकास आघाडी, भाजपला संमिश्र...नागपूर : विदर्भात महाविकास आघाडी, भाजप प्रणीत...
वऱ्हाडात महाविकास आघाडीला यश अकोला : ग्रामपंचायत निवडणुकीत महाविकास आघाडीच्या...
जळगाव जिल्ह्यात ‘बर्ड फ्लू’चा शिरकाव...जळगाव : परभणी जिल्ह्यात आढळून आलेल्या ‘बर्ड फ्लू’...