जगात सर्वाधिक दूध उत्पादनाची टिमकी वाजविणाऱ्या आपल्या देशात मुळातच दुधाचे सेवन फारच कमी आहे.
बातम्या
पूर्णवेळ कृषी सहसंचालकाची प्रतीक्षा
पुणे विभागीय कृषी सहसंचालकाची जबाबदारी राष्ट्रीय फलोत्पादन विभागातील (एनएचएम) प्रकल्प व्यवस्थापक बसवराज बिराजदार यांच्याकडे देण्यात आली आहे. ही जबाबदारी प्रभारी अधिकाऱ्यांच्या खांद्यावर देण्यात आला आहे.
पुणे : पुणे विभागीय कृषी सहसंचालकाची जबाबदारी राष्ट्रीय फलोत्पादन विभागातील (एनएचएम) प्रकल्प व्यवस्थापक बसवराज बिराजदार यांच्याकडे देण्यात आली आहे. ही जबाबदारी प्रभारी अधिकाऱ्यांच्या खांद्यावर देण्यात आली असून, पूर्ण वेळ कृषी सहसंचालकांची निवड कधी केली जाणार, असा प्रश्न अधिकारी वर्गातून उपस्थित केला जात आहे.
राज्यात ठाणे, कोल्हापूर, पुणे, लातूर, अमरावती, औरंगाबाद, नागपूर, नाशिक असे एकूण आठ विभाग आहेत. पुणे विभाग हा राज्यात अव्वल असून, पुणे विभागात नगर, पुणे, सोलापूर असे तीन जिल्हे येतात. तिन्ही जिल्हे बागायती जिल्हे असल्याने येथे शासनाच्या सर्व योजना प्रभावीपणे राबविण्यात
येतात.
विशेष हा कृषी योजनांना शेतकऱ्यांनाही चांगला प्रतिसाद मिळत असल्याने या विभागाला अधिक महत्त्व प्राप्त झाले आहे. त्यातच पुणे विभागात कृषी आयुक्तालय असल्याने राज्याचे सचिव, कृषिमंत्री, केंद्र व राज्य शासनाचे विविध पथके भेटी देण्यासाठी येतात. पुणे विभागीय कृषी सहसंचालकांना आयुक्त व जिल्हास्तरीय अधिकारी यांच्यासोबत सतत समन्वय ठेऊन सतर्क राहून काम करावे लागते. त्यातच नुकतीच निविष्ठा व गुणनियंत्रण विभागाचे संचालक दिलीप झेंडे यांची नुकतीच विभागीय कृषी सहसंचालक पदावरून पदोन्नती झाल्याने हे पद रिक्त झाले आहे. त्यामुळे या पदावर पूर्णवेळ अधिकारी नेमण्याची गरज आहे, असे अधिकारी वकर्मचारी यांचे म्हणणे आहे.
सध्या विभागीय कृषी सहसंचालक कार्यालयात अधीक्षक कृषी अधिकारी पदी रफिक नाईकवडी यांची नुकतीच पूर्ण वेळ अधिकारी म्हणून निवड केली आहे. मात्र, त्याच्याकडेही कृषिमंत्री दादा भुसे यांचे ओएसडी व पोकरा प्रकल्पाची जबाबदारी देण्यात आली आहे. त्यामुळे बहुतांशी वेळा ते मुंबईत कार्यरत असतात. त्यामुळे अनेक वेळा शेतकरी, कर्मचारी यांचे प्रश्न सुटण्यास अडचणीचे ठरत असल्याची चर्चा सुरू झाली आहे. त्यातच श्री बिराजदार यांच्याकडेही प्रभारी पदाची जबाबदारी दिल्याने शेतकऱ्यांच्या प्रश्नाला न्याय मिळेल का नाही, अशी शंका व्यक्त केली जात
आहे.
- 1 of 1495
- ››