जळगाव जिल्ह्यात शासकीय धान्य खरेदीची प्रतीक्षाच

जळगाव : कडधान्य व सोयाबीनचे दर बाजारात बऱ्यापैकी आहेत. यामुळे जिल्ह्यात तीन केंद्रांमध्ये सोयाबीन व उडीद, मुगाची खरेदी झालेली नाही.
Waiting for government grain procurement in Jalgaon district
Waiting for government grain procurement in Jalgaon district

जळगाव : कडधान्य व सोयाबीनचे दर बाजारात बऱ्यापैकी आहेत. यामुळे जिल्ह्यात तीन केंद्रांमध्ये सोयाबीन व उडीद, मुगाची खरेदी झालेली नाही. ज्वारी, बाजरी व मक्याच्या शासकीय खरेदीलाही सुरवात झालेली नाही. सध्या नोंदणी सुरू आहे. त्यासही फारसा प्रतिसाद मिळालेला नसल्याचे चित्र आहे. 

मका, बाजरी व ज्वारीच्या खरेदीची १ नोव्हेंबरपासून घोषणा जिल्हा प्रशासनाने केली होती. परंतु, अद्याप नोंदणीच सुरू आहे. त्यातही ज्वारी, बाजरी विक्रीसाठी ऑनलाइन नोंदणीसंबंधी जिल्ह्यात प्रतिसादच नाही. फक्त मका विक्रीसंबंधी काहीसा प्रतिसाद आहे.

जिल्ह्यात ज्वारी, बाजरी व सोयाबीनच्या खरेदीसाठी १९ केंद्रे सुरू होणार आहेत. या केंद्रांमध्ये मका विक्रीसाठी सुमारे दीड हजार शेतकऱ्यांची नोंदणी झाली आहे. खरेदी पुढील महिन्यात सुरू होऊ शकते. 

सोयाबीनचे दर बाजारात हमीभावापेक्षा अधिक आहेत. सध्या बाजारात ४१००  रुपयांवर दर आहेत. यामुळे सोयाबीनच्या शासकीय खरेदीला जिल्ह्यातील तिन्ही केंद्रांमध्ये कुठलाही प्रतिसाद मिळालेला नाही. उडीद व मुगाचे अतिपावसात नुकसान झाले होते. यामुळे उडीद, मुगाचीदेखील खरेदी झालेली नाही.

जळगाव, अमळनेर व पाचोरा येथे उडीद, मूग व सोयाबीन खरेदी केंद्र सुरू करण्याची तयारी गेल्या महिन्यात झाली होती. नोंदणीही सुरू होती. परंतु, नोंदणीलाच प्रतिसाद मिळाला नाही. 

जळगाव येथील केंद्रात फक्त २५ शेतकऱ्यांनी सोयाबीन विक्रीसाठी नोंदणी केली होती. या शेतकऱ्यांना संदेश दिले जातील. त्यांच्याकडून मंगळवारी (ता.१०) सोयाबीनची खरेदी करण्याचे नियोजन असल्याची माहिती जळगाव येथील खरेदी केंद्राच्या सूत्रांनी दिली.

उडीद विक्रीसाठीदेखील फक्त जळगाव येथे नोंदणी झाली होती. परंतु, अनेक शेतकऱ्यांचा उडीद एफएक्यू (विक्रीयोग्य दर्जा) नसल्याने त्याची खरेदी होऊ शकली नाही, अशी माहिती मिळाली. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com