मराठवाड्यातील रेशीम प्रकल्पाला ग्रीन सिग्नलची प्रतीक्षा

Waiting for the green signal to the Silk Project in Marathawada
Waiting for the green signal to the Silk Project in Marathawada

औरंगाबाद : झपाट्याने विस्तारत असलेल्या रेशीम उद्योगासाठी आवश्‍यक येथील प्रस्तावित संशोधन, प्रशिक्षण व विस्तार प्रकल्पाला ग्रीन सिग्नल कधी मिळणार, असा प्रश्‍न उपस्थित होत आहे. अलीकडे उद्योगमंत्र्यांनी रेशीम उद्योगाचे महत्त्व जाणून घेतल्यानंतर फळबाग व रोहयोमंत्र्यांनी पैठणीला गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी प्रयत्न करण्याची तयारी दाखविली. त्यानंतर विभागीय आयुक्‍तांनी प्रकल्पासाठी मंजूर प्रक्षेत्रावर प्रत्यक्ष जाऊन केलेल्या पाहणीनंतर प्रकल्प मंजुरीच्या अपेक्षा उंचावल्या आहेत. प्रकल्पाला ग्रीन सिग्नल मिळण्याची प्रतीक्षा शेतकऱ्यांना आहे. 

रेशीम उद्योगासाठीचे संशोधन, प्रशिक्षण व विस्तारासाठी औरंगाबाद येथे एकाच ठिकाणी प्रस्तावित प्रकल्पाचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले. या प्रकल्पासाठी २७ कोटी व प्रकल्प मंजुरीची प्रतीक्षा आहे.

आराखड्याचा विभागीय आयुक्‍त सुनील केंद्रेकर यांनी मंजूर २५ एकर शासकीय जमिनीवर प्रत्यक्ष जाऊन आढावा घेतला. उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनीही रेशीम उद्योगासह प्रकल्पाचे गरज जिल्हाधिकारी उदय चौधरी ,रेशीम विभागाचे उपसंचालक दिलीप हाके यांच्याकडून जाणून घेतली.

रेशीम प्रकल्पाची गरज 

राज्यातील रेशीम उत्पादक प्रशिक्षणासाठी कर्नाटकावर अवलंबून, रेशीम फार्मद्वारे तुती, पालानिर्मितीवर संशोधन शक्‍य, अंडीपुंज उत्पादन, कीटक संगोपन तंत्राविषयी संशोधनाची गरज, माती ते कापड म्युझियममुळे सर्व घटकांना असणार समावेशाची संधी, अंडीपुंज गरज भागविण्याची उपलब्ध केंद्रात नाही क्षमता, देशातील दोनपैकी एक रेशीम पर्यंटन कॉरिडॉरची औरंगाबादेत उभारणी सुरू, मराठवाड्याच्या वातावरणाशी समरस अंडीपुजनिर्मिती आदींमुळे रेशीम प्रकल्पाची नितांत गरज आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com