Agriculture news in Marathi Waiting for insurance compensation to farmers in Wani sub-division | Agrowon

वणी उपविभागातील शेतकऱ्यांना विमा भरपाईची प्रतीक्षा

टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 14 ऑगस्ट 2020

पीक विमा काढल्यानंतरही ही गेल्या तीन वर्षांपासून सतत नुकसान होत असताना भरपाई मात्र मिळत नाही. वणी उपविभागातील ४५७२ शेतकऱ्यांमध्ये या कारणामुळे असंतोष निर्माण झाला असून या विरोधात आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.

यवतमाळ : पीक विमा काढल्यानंतरही ही गेल्या तीन वर्षांपासून सतत नुकसान होत असताना भरपाई मात्र मिळत नाही. वणी उपविभागातील ४५७२ शेतकऱ्यांमध्ये या कारणामुळे असंतोष निर्माण झाला असून या विरोधात आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.

वणी उपविभागातील २६ हजार ८९० शेतकऱ्यांनी पीक विमा काढला होता. त्यातील केवळ २२३१८ शेतकऱ्यांना लाभ मिळाला. चार हजार ५७२ शेतकरी अद्यापही पीक विमा भरपाई पासून वंचित आहेत. शेतमालाचे किती टक्के नुकसान झाले याची चौकशी करण्यासाठी विमा कंपनीचे पर्यवेक्षक कार्यरत असतात. तथापि, नुकसानग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी ते फिरकतही नसल्याच्या शेतकऱ्यांच्या तक्रारी आहेत. याउलट शेतकऱ्यांना त्यांच्याकडून त्रास अधिक होतो, असा आरोपही करण्यात आला आहे.

या विरोधात तीव्र आंदोलन छेडून ग्राहक मंचात दाद मागण्याच्या तयारीत शेतकरी आहेत. वणी तालुक्यात पंतप्रधान पीक विमा योजनेच्या आठ मालेगाव व झरी तालुक्यात प्रत्येकी चार शाखा आहेत. वणी तालुक्यातील पीक विमा काढलेल्या दहा हजार ८४८ शेतकऱ्यांपैकी आठ हजार ५७२, मारेगाव तालुक्यातील ११ हजार १२० शेतकऱ्यांपैकी ९६२४, झरी तालुक्यातील ४९२२ शेतकऱ्यांपैकी ४१२२ शेतकऱ्यांना पीक विमा दावा प्राप्त झाला आहे. परिणामी पीक विमा भरपाई पासून वंचित असलेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्याकरिता जिल्हाधिकारी यांनी स्वतः या विषयात लक्ष घालावे, अशी मागणी शेतकरी करीत आहेत.

कर्जमाफीत अन्याय
महात्मा फुले कर्ज माफी योजनाअंतर्गत दोन लाखापर्यंतचे कर्ज माफ करण्यात आले आहे. या योजनेचा लाभ मिळावा याकरिता वणी तालुक्यातील ६५७, मारेगाव तालुक्यातील ६७८, झरी तालुक्यातील ६२३ शेतकऱ्यांनी दोन लाखांपेक्षा अधिक असलेल्या कर्ज रकमेचा भरणा केला. परंतु या शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ देण्यात आला नाही. नवीन कर्जही त्यांना मिळाले नाही, याची दखल घेत योग्य ती कारवाई करावी, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे जयसिंग गोहोकार दिला आहे.


इतर ताज्या घडामोडी
‘जायकवाडी’तील विसर्गात घटऔरंगाबाद : जिल्ह्यातील जायकवाडी प्रकल्पातून...
निम्न दुधनातून ७१९० क्युसेकने विसर्गपरभणी : सेलु तालुक्यातील ब्रम्हवाकडी येथील दुधना...
अनुदानाअभावी मर्यादित लाभार्थ्यांना...सिंधुदुर्ग ः कोरोनामुळे शासनाने जिल्हा परिषदेच्या...
ऊसतोडणीच्या तिढ्यावर आज चर्चापुणे : दहा लाख ऊस तोडणी कामगारांच्या मागण्यांबाबत...
यवतमाळ जिल्ह्यात सोयाबीन शेंगांना फुटले...यवतमाळ : खोडकीड, चक्रीभुंगा त्यानंतर आता परिपक्व...
संत्रा उत्पादकांना हेक्टरी लाखाची भरपाई...नागपूर : विदर्भात नैसर्गिक आपत्तीमुळे संत्रा,...
पुण्यात विशिष्ट ठिकाणीच लिंबे विक्रीला...पुणे ः गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीने...
गाय एका आठवड्यात दोनदा व्यायली नाशिक ः येथील डॉ. इरफान खान हे व्यवसायाने डॉक्टर...
हवामान बदलाचे सेंद्रिय कर्बावरील परिणामजागतिक हवामान बदल आणि जागतिक तापमान वाढ हे शब्द...
पुण्यात भाजीपाल्याच्या आवकेत घटपुणे : गुलटेकडी येथील पुणे कृषी उत्पन्न बाजार...
काही भागात पावसाच्या उघडिपीची शक्यता महाराष्ट्रावर बुधवार (ता.२३) पर्यंत  १००४...
राज्य द्राक्ष बागायतदार संघाची ...नाशिक: महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार...
पांगरी परिसरात पिकांवर आस्मानी संकटपांगरी, जि. सोलापूर ः पांगरी (ता. बार्शी) परिसरात...
शेतमाल स्थानिक भागात विकला जाणार : भुजबळनाशिक : त्र्यंबकेश्वर तालुक्यात आदिवासी समाज...
परभणी, हिंगोली जिल्ह्यात पावसाचे थैमाननांदेड : मराठवाड्यातील परभणी, हिंगोली जिल्ह्यात...
नाशिक विभागात कांदा लागवडीत ८ हजार...नाशिक : चालू वर्षी खरीप कांद्याच्या लागवडीपूर्वी...
रावेर तालुक्यात सीएमव्ही नुकसानीचे...जळगाव ः कुकुंबर मोसॅक विषाणूमुळे (सीएमव्ही)...
हिंगोली जिल्ह्यात सोयाबीनच्या पिकाला...हिंगोली : जिल्ह्यामध्ये मागील काही दिवसांपासून...
मराठवाड्यात अतिपाऊस खरीप पिकांच्या...औरंगाबाद : मराठवाड्यात गत काही दिवसांपासून...
धुळ्यात लाळ्या खुरकूत रोग प्रतिबंधक...धुळे : धुळे जिल्ह्यात ३० सप्टेंबरपर्यंत...