Agriculture news in marathi Waiting for insurance to cover pomegranate growers | Agrowon

आटपाडीत डाळिंब उत्पादकांना विमा भरपाईची प्रतीक्षा

टीम अॅग्रोवन
सोमवार, 24 फेब्रुवारी 2020

अवकाळी पावसामुळे अतोनात नुकसान झाले. दर वर्षीच्या तुलनेत २५ टक्केही उत्पादन निघाले नाही. उत्पादन खर्चही निघाला नाही.
- गौरीहार पवार, शेतकरी, शेटफळे. ता. आटपाडी.

आटपाडी, जि. सांगली : यावर्षी पावसातील सुरुवातीचा खंड आणि नंतर पडलेल्या अवकाळी पावसामुळे डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. मात्र, स्कायमेटने पावसाच्या चुकीच्या नोंदी केल्या. त्यामुळे शेतकरी विम्यापासून वंचित राहणार आहेत. विमा कंपनी स्कायमेटची का ? महसूलची पावसाची नोंद ग्राह्य धरून नुकसानभरपाई देणार का? याकडे डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांचे लक्ष आहे. 

आटपाडी तालुक्‍यात मृग बहारात जून आणि जुलैमध्ये बहुतांश शेतकरी बागेचा हंगाम धरतात. जवळपास दहा हजार एकर क्षेत्रावर हंगामात बागा धरल्या होत्या. यातील अनेकांनी डाळिंबाचे विमा भरला. विमा कंपनीच्या निकषानुसार पहिल्या दोन महिन्यांत २१ दिवसांपेक्षा जास्त पावसात खंड पडला, तर खंडाच्या दिवसांप्रमाणे नुकसानभरपाईस शेतकरी पात्र होतात. एकाच वेळी ४५ मिलिमीटर पाऊस पडला, तर दुसऱ्या नुकसानभरपाईस पात्र होतात. इतर रोग, अवकाळी पावसामुळे ही नुकसानभरपाई द्यावी लागते. 

श्रमिकचे आनंदराव पाटील यांनी आंदोलन करून लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. पालकमंत्री जयंत पाटील यांची भेट घेतली. शेतकऱ्यांना डाळिंबाचा विमा मिळणार का?, की स्कायमेटची पावसाची नोंद ग्राह्य धरून विमा कंपनी शेतकऱ्यांची फसवणूक करणार, असा शेतकऱ्यांचा प्रश्‍न आहे.
  
बागा गेल्या, किमान भरपाई तरी मिळेल?

यंदा तालुक्‍यात १५ जूननंतर सलग तीस दिवस पावसामध्ये खंड होता. १५ ऑगस्टनंतर सप्टेंबर, ऑक्‍टोबरमध्ये तीन वेळा ४५ मिलिमीटरपेक्षा अधिक पाऊस पडला. तशी नोंद महसूलच्या पर्जन्यमापकात आहे. या पावसामुळे डाळिंबाचे प्रचंड नुकसान झाले. बागा गेल्या, किमान विमा रक्कम तरी मिळेल, या आशेवर शेतकरी होते. मात्र, विमा कंपनीने स्कायमेटची पावसाची नोंद ग्राह्य धरली. स्कायमेटने पावसात खंड दाखवला नाही. तीन वेळा ४५ मिलिमीटरवर पाऊस पडूनही नोंद केली नाही. सप्टेंबर महिन्यात दीडशे मिलिमीटर पावसाची कमी नोंद दाखवली. त्यामुळे शेतकरी विम्यापासून वंचित राहणार 
आहेत. 


इतर ताज्या घडामोडी
औरंगाबाद बाजार समितीत मिरचीची १३०...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार...
'राज्यातील पोलीस पाटील, ग्रामसेवकांनाही...बुलडाणा : राज्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव...
उद्धव ठाकरे परिषदेवर जाणार विधानसभेतून...मुंबई : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव...
मुद्रित माध्यमेच सर्वाधिक विश्‍वसनीय :...नागपूर: कोरोनाविषयी विविध माध्यमे आणि सोशल...
परभणीत पहिल्या दिवशी १७५ किलो...परभणी : कृषी विभागाच्या महाराष्ट्र...
‘कोरोना’च्या सावटातही पैसे काढण्यासाठी...अकोला : कोरोना विषाणू संसर्गाच्या संकटात मदत...
पणन हेल्पलाईनला फोन केला.. अन्‌ ढोबळी...पुणे : पणन मंडळाच्या आंतरराज्य शेतमाल वाहतूक...
बीसीजी लस घेतलेल्यांना कोरोनाचा धोका...पुणे : क्षयरोगाचा (ट्यूबरक्यूलोसिस-टीबी) प्रतिबंध...
प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेच्या...मुंबई: कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे...
पुणे विभागात यंदा कमी पाणीटंचाईपुणे : मॉन्सून कालावधीतील दमदार पाऊस,...
कृषिरत्न फाउंडेशनची ‘आधारतीर्थ’तील...नाशिक : ‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर सध्या...
पुणे विभागात धान्याचा साडेसतरा हजार...पुणे : ‘‘पुणे विभागाात दोन एप्रिल रोजी...
लॉकडाऊनमुळे कृषी यांत्रिकीकरणाचे ९...पुणे: राज्याच्या कृषी यांत्रिकीकरण मोहिमेला...
सांगलीतील नागवेलीच्या पानांना मागणी...सांगली : कोरोना विषाणूमुळे परराज्यातून...
कराडमधील ग्राहकांच्या घरी १४० पेट्या...रत्नागिरी : ऐन हंगामात ‘कोरोना’च्या...
पीकविम्याची रक्कम कर्जखात्यांत जमा करू...अकोला : ‘कोरोना’च्या पार्श्‍वभूमीवर बँकांनी खरीप...
मोफत धान्य देण्यासंदर्भात केंद्राचे...मुंबई: कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी सध्या...
‘जीवनावश्यक वस्तूंच्या दुकानांत ‘सोशल...नाशिक : ‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर राज्यातील...
आठवड्याचा अंदाज : ढगाळ हवामानासह...महाराष्ट्रावर हवेचा दाब १०१० हेप्टापास्कल इतके...
आरोग्यदायी लसूणआपल्या स्वयंपाकघरातील महत्त्वाचा घटक म्हणजेच लसूण...