मराठवाड्यातील उत्पादकांना जाहीर दूधदराची प्रतीक्षा

मराठवाड्यातील उत्पादकांना जाहीर दूधदराची प्रतीक्षा
मराठवाड्यातील उत्पादकांना जाहीर दूधदराची प्रतीक्षा

औरंगाबाद : दूध दरवाढीसाठीच्या आंदोलनानंतर जाहीर करण्यात आलेला २५ रुपये प्रतिलिटरचा दर मिळण्याची मराठवाड्यातील शेतकऱ्यांना प्रतीक्षा कायम आहे. तूर्त ३.५ फॅट्‌स व ८.५ एसएनएफ असलेल्या दुधाला १९ ते २० रुपये प्रतिलिटरचा दर मिळत असल्याची माहिती दूध उत्पादकांनी दिली.

दूध दरवाढीसाठी औरंगाबाद जिल्ह्यातील लाखगंगा मोफत दधूवाटप सुरू करून शेतकऱ्यांनी दूधदराच्या प्रश्नाकडे सर्वांचे लक्ष वेधले होते. त्यानंतर स्वाभिमानी शेतकरी संघटनेने उठविलेल्या आवाजाला साथ देत मराठवाड्यातील शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात दूध संघ वा डेअऱ्यांना न घालण्याचा निर्णय घेतल्याने मराठवाड्यातील बीड, उस्मानाबादसह जवळपास सर्वच जिल्ह्यांतील दूध संकलनावर मोठा परिणाम झाला होता.

आंदोलनाच्या समारोपाला गायीच्या ३.५ फॅट्‌स व ८.५ एसएनएफला २१ जुलैपासून प्रत्येक संघ व डेअऱ्यांनी २५ रुपये प्रतिलिटरप्रमाणे दर देण्याचे शासनाने आदेशीत केले होते; परंतु त्यानंतरही मराठवाड्यात ३.५ फॅट्‌स व ८.५ एसएनएफ असलेल्या दुधाला १९ ते २० रुपये प्रतिलिटरपुढे दर मिळाला नसल्याची माहिती उत्पादकांनी दिली. याविषयी सुरू असलेल्या बैठकांच्या खलबतांमधून येत्या १ ऑगस्टपासून दर मिळेल, ही आस दाखविली जात असल्याने तूर्त काही बोलण्याऐवजी तेव्हापासून दर मिळतो का याची वाट आम्ही पाहत असल्याचे उत्पादकांनी सांगितले. शासन याविषयी माहिती संकलित करण्याचे काम करते आहे. त्यासाठी जवळपास चार बैठका झाल्या आहेत. येत्या १ ऑगस्टला त्याविषयी अंमलबजावणी होणे अपेक्षित असल्याच्या दूध उत्पादक संघाच्या सूत्रांनी सांगितले.

मराठवाड्यात साधारणत: साडेनऊ लाख लिटर दुधाचे संकलन दररोज केले जाते. त्यापैकी जवळपास एक लाख लिटर शासन, जवळपास सव्वादोन लाख लिटर सहकारी दूध संघ तर उर्वरित खासगी यंत्रणा संकलीत करीत असल्याची स्थिती आहे. दुग्धविकास विभागाचे प्रादेशिक अधिकारी, काही डेअरी, दूध संघाचे प्रतिनिधी आदींची मुंबईत मंगळवारी (ता. ३१) बैठक बोलावली गेली होती. त्या बैठकीच्या खलबतांकडेही सर्वांचे लक्ष लागल्याचे सूत्रांनी सांगितले. त्यामुळे तूर्त जाहीर दर मिळत नसलेल्या उत्पादकांना तो कधी मिळतो याची प्रतीक्षा लागून असल्याची माहिती दूध उत्पादकांनी दिली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com