खानदेशात हरभऱ्याच्या चुकाऱ्यांची प्रतीक्षाच, शेतकऱ्यांमध्ये नाराजी

जळगाव : खानदेशात हरभऱ्याची शासकीय खरेदी बऱ्यापैकी झाली आहे. परंतु, निम्म्या शेतकऱ्यांना हरभरा विक्रीसंबंधीचे चुकारे संबंधित यंत्रणांकडून प्राप्त झाले नसल्याची माहिती आहे.
 Waiting for the Money of green gram, dissatisfaction among the distraught farmers
Waiting for the Money of green gram, dissatisfaction among the distraught farmers

जळगाव : खानदेशात हरभऱ्याची शासकीय खरेदी बऱ्यापैकी झाली आहे. परंतु, निम्म्या शेतकऱ्यांना हरभरा विक्रीसंबंधीचे चुकारे संबंधित यंत्रणांकडून प्राप्त झाले नसल्याची माहिती आहे. 

खानदेशात सुमारे अडीच लाख क्विंटल हरभऱ्याची शासकीय खरेदी झाली. त्यांपैकी फक्त एक लाख क्विंटल हरभरा खरेदीसंबंधीचे चुकारे शेतकऱ्यांना दिले आहेत. यामुळे चुकाऱ्यांपासून वंचित शेतकऱ्यांमध्ये नाराजी पसरली आहे.

जळगाव जिल्ह्यात एक लाख ३० हजार क्विंटल हरभऱ्याची खरेदी झाली आहे. पैकी ४५ हजार क्विंटल हरभऱ्यासंबंधीचे चुकारे वितरित करण्यात आले आहेत. तर, आणखी ३० हजार क्विंटल हरभऱ्याचे चुकारे संबंधित यंत्रणांकडे पोचविण्यात आले आहेत.

अशीच स्थिती धुळे व नंदुरबारात आहे. धुळे जिल्ह्यातही निम्मे शेतकरी चुकाऱ्यांपासून वंचित असल्याने यासंदर्भात शासनाकडे पाठपुरावा करण्याची मागणी केली जात आहे. परंतु, पाठपुरावा होत नसल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.

खरेदीला मुदतवाढ हरभरा खरेदीसाठी शासनाने मुदतवाढ दिली आहे. खरेदीची अंतिम मुदत १६ जूनपर्यंत होती. जळगाव जिल्ह्यात बोदवड, जामनेरात अनेक नोंदणीकृत शेतकऱ्यांकडून हरभऱ्याची खरेदी पूर्ण झालेली नाही. यामुळे ही खरेदी मुदतवाढीच्या निणर्यामुळे सुरू राहणार आहे. सध्या पावसाळी वातावरण असल्याने एका केंद्रात रोज पाच ते सात शेतकऱ्यांकडूनच खरेदी केली जात आहे. यामुळे खरेदीचा वेग मंद असल्याची माहिती मिळाली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com