वाढीव दूधदरासाठी दहा दिवसांनंतरही प्रतीक्षाच

आता एक ऑगस्टापासून वाढीव दर देणार आहोत, असे सांगितले आहे. वाट पाहण्याशिवाय दुसरा पर्याय नाही? - महेंद्रकुमार बाजारे, दूध उत्पादक, महूद, ता. सांगोला. माझी स्वतःची खासगी छोटी डेअरी आहे. शेतकरी मला सातत्याने दराबाबत विचारणार करतात, पण शासन निर्णयानुसार आम्हाला दर मिळाला, तर पुढे आम्ही तो शेतकऱ्यांपर्यंत पोचवू शकतो. काहीतरी मार्ग काढून दर दिला पाहिजे. - पदमाकर भोसले, अध्यक्ष, मथुरा दूध डेअरी, पापरी, ता. मोहोळ ``शासनाने जाहीर केलेल्या निर्णयानुसार आम्ही दर देणार आहोत. त्यासंबंधी माहिती घेण्याचे काम सुरू आहे. काही खासगी दूध संघासह सहकारी दूध संघांना दूधदर देण्यात काही तांत्रिक अडचणी आहेत. त्याबाबत दुग्ध विभागाशी चर्चा सुरू आहे. शासनाच्या सुधारित निर्णयाची वाट पाहतो आहोत. त्या निर्णयानंतर लागलीच नव्या निर्णयाची अंमलबजावणी केली जाईल.`` - सतीश मुळे, व्यवस्थापकीय संचालक, सोलापूर जिल्हा दूध उत्पादक संघ, सोलापूर
वाढीव दूधदरासाठी दहा दिवसांनंतरही प्रतीक्षाच
वाढीव दूधदरासाठी दहा दिवसांनंतरही प्रतीक्षाच
सोलापूर : राज्यातील दूध उत्पादकांना प्रतिलिटर २५ रुपये वाढीव दर देण्याचा निर्णय शासनाने जाहीर करून आज दहा दिवसांचा कालावधी उलटला; पण सोलापूर जिल्ह्यातील दूध संघ आणि खासगी दूध संघांकडून टोलवाटोलवी सुरू आहे. शिवाय हा दर देण्यासाठीही एसएनएफ आणि फॅटच्या अटी आणि पुन्हा तो कसा द्यायचा, याबाबतही साशंकता असल्याने दूध उत्पादकांच्या पदरी निराशा पडली आहे. त्यामुळे आणखी काही दिवस तरी दूध उत्पादकांना प्रतीक्षा करावी लागणार आहे.
सोलापूर जिल्ह्यात जिल्हा दूध संघ आणि खासगी दूध संघाकडून जवळपास १२ लाख लिटरपर्यंतचे संकलन होते. शासनाकडूनच अद्याप आमच्याकडे दराविषयी काहीच आलेले नाही, त्यामुळे आम्ही दर देऊ शकत नाही, असे दूध संघांतर्फे सांगितले जात आहे. २० जुलै रोजी शासनाने काढलेल्या परिपत्रकातील त्रुटी दुरुस्ती करण्याचे काम सध्या युद्धपातळीवर सुरू आहे. दूध दर कसा द्यायचा, यावरच दुग्धविकास विभाग गोंधळात आहे. त्यामुळेही या प्रक्रियेला वेळ लागत असल्याचे सांगण्यात येते. शासनाने जाहीर केलेल्या निर्णयानुसार ३.५ फॅट ते ८.५ एसएनएफ असणाऱ्या दुधालाच हा दर मिळणार आहे. ...तर कसा मिळेल दूधदर? गाईच्या दुधातील सर्वसाधारण नैसर्गिक फॅटचे प्रमाण हे २.५ ते ४.५, एसएनएफचे प्रमाण हे ७.५ ते ८.७, प्रोटिनचे प्रमाण हे ३३.५ टक्के ते ३४.५० टक्क्यांपर्यंत असते. हे सर्व घटक गाईची जात, वय, वेताचे दिवस आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे खाद्य या बाबींवर अवलंबून असतात. गाय कधीच ३.५ फॅट ते ८.५ एसएनएफ आणि ३४.५० टक्के अशा प्रकारे नैसर्गिकरीत्या दूध देत नाही, असे तज्ज्ञांचे मत आहे. त्यामुळे शासनाच्या निर्णयानुसार फॅट आणि एसएनएफचा विचार करता पुन्हा वाढीव दर मिळण्यात शेतकऱ्यांना अडचण येणार आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com