बाजारपेठेत नव्या बेदाण्याची प्रतीक्षा 

गेल्या दोन महिन्यांपासून बेदाण्याला मागणी असल्याने बेदाण्याचे दर टिकून आहेत. सध्या बेदाण्याला १२० ते २३० रुपये प्रति किलो असा दर आहे.
Waiting for new raisins in the market
Waiting for new raisins in the market

सांगली ः गेल्या दोन महिन्यांपासून बेदाण्याला मागणी असल्याने बेदाण्याचे दर टिकून आहेत. सध्या बेदाण्याला १२० ते २३० रुपये प्रति किलो असा दर आहे. बेदाणा निर्मितीचा हंगाम नुकताच सुरू झाला असला तरी व्यापारी नवीन मालाची प्रतीक्षा करत आहे. मात्र, हवामान बदलाचा परिणाम बेदाणा निर्मितीवर झाला असल्याने नवीन बेदाणा फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यात येण्याची शक्यता आहे, अशी माहिती बेदाणा उद्योगातील जाणकारांनी व्यक्त केली आहे.  राज्यातील गतवर्षी १ लाख ८० टन इतका बेदाणा तयार झाला होता. वर्षभर मागणी असल्याने बेदाण्याची कमी अधिक विक्री होते. गतवर्षी तयार झालेला बेदाणा जवळपास संपत झाला आहे. डिसेंबरमध्ये बेदाण्याला बेदाण्याला प्रति किलोस १६० ते २२५ रुपये असा दर होता. मात्र, गेल्या काही दिवासांपासून देशात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला आहे. त्यामुळे पुन्हा लॉकडाउन होतो की, काय अशी भीती निर्माण झाली होती. मात्र, वाढत्या कोरोनाचा फारसा परिणाम बेदाणा व्यापारावर झाला नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे बेदाण्याची मागणी कमी झाली नसल्याने बेदाण्याचे दर टिकून राहिले आहेत. 

बेदाणा निर्मितीचा वेग कमीच  सोलापूर आणि सांगली जिल्ह्यात बेदाणा उत्पादन सुरू झाले आहे. फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यापासून बेदाणा तयार करणाऱ्या द्राक्षापासून बेदाणा निर्मिती होण्यास प्रारंभ होईल. सध्या द्राक्षाची विक्री करून शिल्लक राहिलेल्या द्राक्षापासून बेदाणा तयार होत आहे. त्यामुळे बेदाणा तयार होण्याची गती वाढलेली नाही. अनेक भागातील शेड दुरुस्त झाले असून, बेदाणा तयार करण्यासाठी शेडमालक प्रतीक्षा करीत आहेत. 

नव्या बेदाण्याची प्रतीक्षा  जिल्ह्यात बेदाणा निर्मिती सुरू झाली आहे. परंतु जानेवारीच्या मध्यावर नवीन बेदाणा बाजारात येईल, अशी शक्यता होती. मात्र, हवामान बदलाचा परिणाम बेदाणा निर्मितीवर झाला आहे. त्यामुळे बेदाणा दर्जेदार होण्यास अडचणी निर्माण होत आहेत. परिणामी नवीन बेदाणा बाजारात येण्यासाठी फेब्रुवारी महिन्याच्या मध्यापर्यंत वाट पहावी लागणार असल्याचे बेदाणा व्यापाऱ्यांनी सांगितले आहे. 

बेदाण्याचा दर (प्रति किलोत)  एक नंबर प्रतिचा ः १७० ते २३०  दोन नंबर प्रतिचा ः १२० ते १७० 

प्रतिक्रिया 

बेदाण्याची मागणी असल्याने बेदाण्याचे दर टिकून राहिले आहेत. आता नवीन बेदाण्याची प्रतीक्षा आहे. नवीन बेदाणा फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यापासून बाजारात येईल, असा अंदाज आहे. यंदाही बेदाण्याला चांगले दर मिळतील, असा अंदाज आहे.  -सुशिल हडदरे, बेदाणा व्यापारी, सांगली    

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com