तेल्हारा तालुक्यात मका, ज्वारीच्या खरेदीची प्रतीक्षा

अकोला : जिल्ह्यात मका, ज्वारी पिकांचे सर्वाधिक उत्पादन तेल्हारा तालुक्यात घेतले जाते. मात्र, हे धान्य खरेदीसाठी अद्यापही शासनाने खरेदी केंद्र सुरू न केल्याने तालुक्यातील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे.
 Waiting for purchase of maize and sorghum in Telhara taluka
Waiting for purchase of maize and sorghum in Telhara taluka

अकोला : जिल्ह्यात मका, ज्वारी पिकांचे सर्वाधिक उत्पादन तेल्हारा तालुक्यात घेतले जाते. मात्र, हे धान्य खरेदीसाठी अद्यापही शासनाने खरेदी केंद्र सुरू न केल्याने तालुक्यातील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. लोकप्रतिनिधींनी या गंभीर विषयाकडे लक्ष देण्याची मागणी शेतकऱ्यांमधून केली जात आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, यावर्षी शासनाने आधारभूत किंमत योजनेअंतर्गत खरेदी करण्यासाठी कोणत्याही संस्थेला आदेश न दिल्याने तेल्हारा तालुक्यात मका व ज्वारी खरेदी सुरू झालेली नाही. मागील वर्षी खरेदी विक्री संघातर्फे करण्यात आलेल्या हरभरा, मका खरेदीमध्ये अनियमितता झाल्याचा ठपका ठेवण्यात आला होता. त्यामुळे शासनाने यावर्षी खरेदी विक्री संस्थेला खरेदी करण्यासाठी आदेश दिलेले नाहीत. 

शेतकऱ्यांना ऑनलाइन अर्ज करण्याची अंतिम तारीख ३० नोव्हेंबर देण्यात आली आहे. नोंदणीसाठी अवघे चार दिवस शिल्लक असताना खरेदी करण्यासाठी संस्था निश्‍चित झालेली नाही.

यावर्षी सोयाबीन, मूग, उडीद, कपाशी पिकांनी आधीच दगा दिल्याने तालुक्यातील शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात हरभरा व तुरीसोबतच मका आणि ज्वारीची पेरणी केली होती. शासनाने खरेदी चालू न केल्यास शेतकऱ्यांना मोठा फटका बसणार आहे. हा गंभीर विषयाकडे लोकप्रतिनिधींनी लक्ष देण्याची गरज आहे.

शासनाने तेल्हारा तालुक्यात मका, ज्वारी खरेदी करण्यासाठी पात्र संस्थेला खरेदीचे आदेश तातडीने देऊन, शेतकऱ्यांचे होणारे नुकसान टाळावे.

- पुंडलिक अरबट, माजी अध्यक्ष, खरेदी विक्री संस्था, तेल्हारा.

आधारभूत किंमत योजनेअंतर्गत खरेदी करण्यासाठी काही संस्थांनी डीएमओ कार्यालयाकडे अर्ज केले होते. हे अर्ज वरिष्ठांना पाठविण्यात आले आहे.  - एच. डब्ल्यू. हजारे, प्रभारी डीएमओ, अकोला

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com