खानदेशात रब्बीसाठी आवर्तनांची प्रतीक्षा

जळगाव : खानदेशात सर्वच प्रकल्पांमधील जलसाठे मुबलक आहेत. अपवाद वगळता सर्वच प्रकल्प १०० टक्के भरले होते. परंतु, अद्याप कुठल्याही प्रकल्पातून रब्बीसाठी पाणी सोडलेले नाही.
 Waiting for the rabbis in Khandesh
Waiting for the rabbis in Khandesh

जळगाव : खानदेशात सर्वच प्रकल्पांमधील जलसाठे मुबलक आहेत. अपवाद वगळता सर्वच प्रकल्प १०० टक्के भरले होते. परंतु, अद्याप कुठल्याही प्रकल्पातून रब्बीसाठी पाणी सोडलेले नाही. आवर्तन सोडण्याची तयारीदेखील दिसत नाही. 

जळगाव जिल्ह्यासाठी महत्त्वाच्या गिरणा, हतनूर व वाघूर धरणातून रब्बी हंगामासाठी पाणी किंवा आवर्तन मिळेल, हे निश्‍चित आहे. परंतु, त्यासाठी अंतिम निर्णय जलसंपदा विभाग घेईल. कालवा समितीच्या शिफारशी, मागणी यानंतर जलसंपदा विभाग निर्णय घेणार आहे. गिरणा, वाघूर, हतनूर हे प्रमुख सिंचन प्रकल्प आहेत.

गिरणा धरणाच्या माध्यमातून ५१ हजार हेक्टर क्षेत्राचे रब्बीमध्ये सिंचन करणे शक्य आहे. हतनूर धरणाद्वारे सुमारे १८ हजार हेक्टर क्षेत्रावरील रब्बी पिकांचे सिंचन करता येते. तर, वाघूर धरणामुळेदेखील सिंचन क्षमता वाढली आहे. 

हतनूर धरणाची साठवण क्षमता नऊ टीएमसी, गिरणाची १८.४८ टीएमसी आणि वाघूरची ८.७६ टीएमसी एवढी साठवण क्षमता आहे. हे प्रकल्प १०० टक्के भरले आहेत. गिरणा धरणाच्या माध्यमातून चाळीसगाव, पाचोरा, भडगाव, एरंडोल, धरणगाव या तालुक्यात सिंचन करता येते.

वाघूर धरणाद्वारे भुसावळ, जामनेर व जळगाव तालुक्यात रब्बीसाठी आवर्तन देता येते. तर, हतनूर धरणाच्या माध्यमातून रावेर, यावल व चोपडा तालुक्यात रब्बीसाठी आवर्तन दिले जाते.  गिरणा पट्ट्यात ज्वारी, हरभरा पिकांची पेरणी झाली आहे. तसेच कोरडवाहू कापूस पिकही अधिक आहे. या पिकासही सिंचनासाठी पाण्याची गरज आहे.

गिरणा धरणातून जळगाव जिल्ह्यातील सुमारे १०० गावांमधील सार्वजनिक पाणीपुरवठा योजनांचे पुनर्भरण करण्यासाठी  नदीत पाणी सोडले जाते. तसेच नाशिकमधील मनमाड, मालेगाव, जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव, पाचोरा व भडगाव शहरांच्या पाणी योजनांनाही गिरणा धरणातून पाणीपुरवठा केला जातो. 

पाण्यासाठी अर्ज मागविले 

धुळ्यातील अनेर, पांझरा, मालनगाव, जामखेड, अमरावती हे प्रकल्पही १०० टक्के भरले आहेत. नंदुरबारमधील दरा, सुसरी आदी पाच प्रकल्पातही मुबलक जलसाठा आहे. परंतु, या जिल्ह्यातही पाणी सोडण्याबाबत घोषणा झालेली नसल्याची माहिती आहे.

फक्त पाण्यासाठी अर्ज  प्रशासनाने मागविले आहेत. डिसेंबरमध्ये पाणी सोडण्याचे सांगितले जात आहे. वाघूरमधून पाणी सोडण्यासाठी अलीकडेच शेतकऱ्यांनी प्रशासनाकडे मागणी केली आहे

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com