नाशिक जिल्ह्यात धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पावसाची प्रतीक्षा

नाशिक : जिल्ह्यात मोठे ७, तर मध्यम १७ असे एकूण २३ प्रकल्प आहेत. यामध्ये जिल्ह्यातील एकूण संकल्पित पाणीसाठ्याची क्षमता ६५.८१ टीएमसी इतकी आहे.
 Waiting for rain in the catchment area of ​​dams in Nashik district
Waiting for rain in the catchment area of ​​dams in Nashik district

नाशिक : जिल्ह्यात मोठे ७, तर मध्यम १७ असे एकूण २३ प्रकल्प आहेत. यामध्ये जिल्ह्यातील एकूण संकल्पित पाणीसाठ्याची क्षमता ६५.८१ टीएमसी इतकी आहे. मागील वर्षी ऑगस्ट २०१९ च्या पहिल्या आठवड्यात जिल्ह्यातील धरणांमध्ये एकूण पाणीसाठ्याच्या तुलनेत उपयुक्त जलसाठा ४४.०१ टीएमसी इतका होता. तर, चालू वर्षी २७.८६ टीएमसी शिल्लक आहे. याचा विचार केल्यास मागील वर्षीच्या तुलनेत उपयुक्त जलसाठ्यात सध्या २५ टक्के घट झाल्याचे माहितीवरून समोर आले आहे. 

जून महिन्याच्या सुरुवातीला पाणलोट क्षेत्रात दमदार पाऊस झाला. मात्र, जुलै महिन्यात पाणलोट क्षेत्रात जलसाठ्यात वाढ झाली नाही. त्यामुळे गतवर्षीच्या तुलनेत पावसाने दडी दिल्याने अपेक्षित जलसाठ्यात वाढ होण्याऐवजी घट होत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. त्यामुळे धरणाच्या पाणलोट क्षेत्रात दमदार पावसाची प्रतीक्षा कायम आहे. 

एकीकडे पाणलोट क्षेत्रात पर्जन्यमान कमी असले तरी लाभक्षेत्रात अधिक पाऊस असल्याची चालू वर्षी स्थिती आहे. मागील वर्षी ५ ऑगस्टअखेर गंगापूर (१८९०९), दारणा (४०३४२), पालखेड (४६१३०) क्यूसेक विसर्ग सुरू होता. तर, नांदूर मधमेश्वर बंधाऱ्यातून २,७६,६०५ क्यूसेक विसर्ग जायकवाडी धरणात सुरू होता. मात्र, सध्या पावसाने दडी दिल्याने चालू वर्षी ही परिस्थिती उलटी आहे.

मागील वर्षीचा पाणीसाठा असल्याने चालू वर्षी टंचाई जाणवली नाही. मात्र, अडचणी वाढू शकतात, अशी स्थिती आहे. त्यामुळे जिल्ह्यातील उपलब्ध धरणसाठा लक्षात घेऊन पिण्याच्या व सिंचनाच्या पाण्याच्या आरक्षणाचे सूक्ष्म नियोजन करण्यात यावे, अशा सूचना पालकमंत्री छगन भुजबळ यांनी यापूर्वीच दिल्या आहेत.

उपलब्ध पाणीसाठा काटेकोरपणे वापरावा. पुढील पाणीसाठा पावसाच्या माध्यमातून भरत नाही, तोपर्यंत सुयोग्य नियोजन करण्याच्या सूचना संबंधितांना क्षेत्रीय पातळ्यांवर दिल्या आहेत. - राजेश गोवर्धने, कार्यकारी अभियंता, पालखेड पाटबंधारे विभाग 

सध्याची परिस्थिती गंभीर आहे. त्यामुळे पाण्याचा वापर काटकसरीने करावा. सध्या उपयुक्त साठ्यात मोठी घट झाली आहे. त्यामुळे ऑगस्ट, सप्टेंबरमध्ये पाऊस झाल्यास हे चित्र बदलेल, अशी आशा करूया. - लक्ष्मीकांत वाघावकर, संचालक, वाघाड प्रकल्पस्तरीय पाणी वापर संस्था

एकूण साठ्याची तुलनात्मक स्थिती : (टीएमसी)

वर्ष शिल्लक  टक्केवारी
२०१९ ४४.०१ ६७
२०२०  २७.८६ ४२

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com