खानदेशात पावसाची प्रतीक्षा

खानदेशात पावसाची प्रतीक्षा आहे. गेल्या पाच - सहा दिवसांत कुठेही पाऊस आलेला नाही. मध्यंतरी पूर्वमोसमी पाऊस आला. पण हा पाऊस सर्वत्र आणि पेरणीयोग्य नसल्याने पेरणीलाही सुरुवात झालेली नाही.
Waiting for rain in Khandesh
Waiting for rain in Khandesh

जळगाव : खानदेशात पावसाची प्रतीक्षा आहे. गेल्या पाच - सहा दिवसांत कुठेही पाऊस आलेला नाही. मध्यंतरी पूर्वमोसमी पाऊस आला. पण हा पाऊस सर्वत्र आणि पेरणीयोग्य नसल्याने पेरणीलाही सुरुवात झालेली नाही. 

काही शेतकऱ्यांनी पावसाच्या अपेक्षेने कोरडवाहू कापूस, उडीद, मूग व तुरीची पेरणी जळगाव जिल्ह्यात चाळीसगाव, अमळनेर, धरणगाव आदी भागांत केली आहे. परंतु त्यावर चांगला पाऊस आलेला नसल्याने ही पेरणी वाया जाईल, अशी स्थिती आहे. पूर्वमोसमी पावसासोबत वादळही होते. त्यात विजेचे खांब वाकले, केळीचे नुकसान झाले. नुकसान सहन करूनही शेतकरी खरिपासाठी उभा राहिला. जूनच्या सुरुवातीला पावसाळी वातावरण होते. यामुळे शेतकरी उत्साहाने कामाला लागले. परंतु गेले पाच ते सहा दिवस कुठेही पाऊस नाही. सुसाट वारा सुटत आहे. जमिनीतील ओलावा घटत आहे. पूर्वहंगामी कापूस, मिरची, केळी आदी पिके जगविण्यासह वाढविण्यासाठी शेतकऱ्यांची सिंचन व इतर बाबींची लगबग सुरू आहे. 

पूर्वहंगामी कापूस लागवड पूर्ण झाली आहे. कापूस लागवड वाढेल, असा अंदाज सुरुवातीपासून व्यक्त केला जात आहे. परंतु पावसाबाबत सकारात्मक माहिती, स्थिती दिसत नसल्याने शेतकऱ्यांचा हिरमोड झाला आहे. गेले दोन दिवस उष्णता वाढली असून, कमाल तापमान दोन अंश सेल्सिअसने वाढले आहे. रात्री सात वाजेपर्यंत सूर्यप्रकाश जाणवतो. सुसाट उष्ण वारा निसवलेल्या केळी बागांचे नुकसान करीत आहे. कमाल तापमान ४३ अंश सेल्सिअसपेक्षा अधिक राहत आहे. जेवढे ऊन मे महिन्यात होते. तेवढेच ऊन या महिन्यातही जाणवत आहे. दिवस मोठा आहे. पेरणीसाठी पूर्वमशागत पूर्ण झाली आहे. पाऊस नसल्याने गेल्या चार - पाच दिवसांत कृषी निविष्ठा, बियाणे बाजारातही फारसा उत्साह दिसत नाही. ज्वारी, मका, बाजरी, कापूस बियाण्याची हवी तशी विक्री झालेली नाही. खतांच्या दुकानातही गर्दी दिसत नसल्याचे चित्र आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com