जळगाव जिल्ह्यात अनेक तालुक्‍यांमध्ये पावसाची प्रतीक्षा

जळगाव ः जिल्ह्यात पावसाचे आगमन वेळेत झाले. पेरणी वेगात झाली; परंतु सद्यःस्थितीत अनेक तालुक्‍यांमध्ये चांगल्या पावसाची प्रतीक्षा आहे. जिल्ह्यात सरासरीच्या सुमारे २५ टक्के पाऊस झाला आहे. जळगाव, बोदवड, जामनेर, भुसावळ भागांत अनेक शेतकऱ्यांची पेरणी धोक्‍यात आली आहे.
Waiting for rain in many talukas of Jalgaon district
Waiting for rain in many talukas of Jalgaon district

जळगाव ः जिल्ह्यात पावसाचे आगमन वेळेत झाले. पेरणी वेगात झाली; परंतु सद्यःस्थितीत अनेक तालुक्‍यांमध्ये चांगल्या पावसाची प्रतीक्षा आहे. जिल्ह्यात सरासरीच्या सुमारे २५ टक्के पाऊस झाला आहे. जळगाव, बोदवड, जामनेर, भुसावळ भागांत अनेक शेतकऱ्यांची पेरणी धोक्‍यात आली आहे.

जळगाव, भुसावळ तालुक्‍यात तर जून महिन्यात १२ दिवस पावसाचा खंड असल्याने एकदा पीक मोडावे लागले आहे. पेरणीनंतर पुन्हा पावसाने पाठ फिरविल्याने भुसावळ, जळगाव, जामनेर, बोदवड भागातील शेतकऱ्यांसमोर संकट उभे ठाकले आहे. मागील पाच दिवसांपासून रोज सकाळपासून ऊन पडत आहे. दुपारी सुसाट उष्ण वारे असतात. यामुळे जमिनीतील ओलावा झपाट्याने कमी झाला आहे. दुसऱ्या पेरणीनंतर अंकुरलेले कोवळे कोंब होरपळण्याची भीती आहे.

जळगाव, जामनेर, भुसावळ, पाचोरा, भडगाव, बोदवड व यावल तालुक्‍याचा काही भाग कापूस उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे. या भागात कोरडवाहू कापूस पीक अधिक आहे. या पिकाची वाढही पावसाच्या लहरीपणामुळे खुंटली आहे. पिकात नांग्या भराव्या लागत आहेत. शेतकरी पावसासाठी वरूणराजाची आळवणी करीत आहेत. तसेच या भागातील केळी व इतर फळ पिकांचे सिंचन सुरू करावे लागले आहे.

पूर्वहंगामी कापूस पिकाला शेतकऱ्यांनी रासायनिक खतांची पहिली मात्रा दिली. परंतु त्यावर पाऊस नसल्याने पाट व ठिबक पद्धतीने सिंचनही सुरू करावे लागले आहे. या भागातील सिंचन प्रकल्पांमध्येही जलसाठे फारसे वाढलेले नाहीत. जामनेरातील वाघूर, पाचोऱ्यातील बहुळा प्रकल्पाची जलपातळी दोन टक्‍क्‍यांनीच वाढली आहे.

जळगाव तालुक्‍यात जूनमध्ये १२ दिवस पावसाचा खंड होता. आता दुबार पेरणीनंतर पाच दिवसांचा पावसाचा खंड आहे. कांदेबाग केळी (ऑक्‍टोबरमध्ये लागवडीची बाग) पिकाला चांगल्या पावसाची गरज आहे. कारण पाऊस चांगला असल्यास त्याची पुढे निसवण जोमात होईल. जळगाव, जामनेर, पाचोरा भागात कांदेबाग केळी अधिक असते, अशी माहिती मिळाली.

आमच्या भागात पाऊस कमी आहे. पावसाचा खंड व ऊन, यामुळे दुबार पेरणी करावी लागली. सकाळपासून सुसाट वारा सुटतो. यामुळे जमिनीतील ओलावा घटत आहे. - रमेश पाटील, शेतकरी, जामनेर, जि. जळगाव

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com